पुस्तक / कथा ओळखा

हा एक खेळ आहे. खेळही आणि ज्ञानवर्धन / ज्ञान आदान प्रदानही!

एखाद्या पुस्तकातील / कथेतील वाक्य, उतारा, सारांश देऊन ते बाकीच्यांनी कोणत्या पुस्तकातील आहे हे ओळखायचं. हा खेळ अजूनही सर्वसमावेशक करायचा असेल तर त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरेल अशी काहीही हिंट द्यायची. उदा एखाद्या पात्राचं नाव, पुस्तकातील एखादी घटना, पुस्तकातील घटना कोठे घडल्या आहेत ते लिहिणे, पुस्तकाशी संबंधित खर्‍या जगात जर एखादी घटना घडली असेल तर ती, लेखिका/लेखकाचे वैशिष्ट्य असं काहीही.

प्रत्येक प्रश्न विचारताना त्या प्रश्नाला योग्य तो अनुक्रमांक द्या. उत्तर देणारीनेही कोणत्या प्रश्नाचे उत्तर ते नमुद करा.

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून हा धागा काढला आहे. खेळ सुरूच राहिल.........

/* */ //