एक विलक्षण अनुभव - होमलेस किड्स कॅम्प - भाग ४

माझ्या कामाच्या वेळा आणि राहिलेल्या वेळात फॅमिली टाइम ह्या कसरतीत ड्रेन आऊट व्हायला झालंय. मागच्याच आठवड्यात पाच आफ्टरस्कूल कँपस ऑर्गनाईझ करुन शिकवावेही लागले.ऐन वेळी टीचर्स बॅकआऊट झाले.असे अनकमिटेड टिचर्स मुलांना कसे मोटीवेट करतील. पुढच्याच आठवड्यात टेस्ट आहे. शेवटी कँप कॅन्सल करणे ह्या उपायापेक्षा मी शिकवणे हा ऑप्शन घेतला. फार फार तारांबळ उडाली.पण शेवटी 'इट्स ऑल अबाऊट द किड्स ' हे माझं ध्येय समोर ठेवलं आणि धकून नेलं. हे सगळं सांगायचं कारण, मला लेख पूर्ण करायचा आहे हे माहिती होतं. सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ ह्या कामानंतर इमोशनली आणि मेंटली ड्रेन आऊट व्हायला होतेय.
आज लेख पूर्ण करुनच कामाला सुरुवात करेन असं ठरवलंय

त्याआधी काही जणींनी प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर-

१) ह्या मुलांचं सिलेक्शन कसं होतं ? - होमलेस ही फ्लुईड क्रायटेरिया आहे ह्या कँपसाठी. जेणेकरुन जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा व्हावा.ज्या मुलांची घरं हरिकेन हार्वीमुळे अफेक्ट झाली अशी काही मुलं ह्या कँपमधे होती. काही नातेवाईकांच्या घरी राहतात.काही मुलं फॉस्टर केअरमधे राहतात कारण आईवडील जेलमधे आहेत किंवा रिहॅबमधे आहेत. काही आईवडिलांसोबतच पण शेल्टरमधे हतात.शिवाय अ‍ॅकेडमिक लेवलवर ही मुलं अ‍ॅट रिस्क ह्या कॅटेगरीत आहेत. म्हणजे मागच्या वर्षीच्या स्टेट टेस्ट आणि ह्या वर्षीच्या डिस्ट्रीक्ट लेवल टेस्टमधे ह्या मुलांचा परफॉर्मन्स अगदी लो लेवल आहे.शिवाय बिहेविअर राईट अप्स रेकॉर्ड्स मोठ्या प्रमाणावर आहेत. तर अशा मुलांची लिस्ट शाळेला पाठवली जाते आणि स्कूल कौन्सिलर आणि इन्स्ट्रक्शनल स्पेशलिस्ट मिळून लेटर्स पाठवतात आणि फोन कॉल्स करुन पाठपुरवा करतात. अशी ही प्रोसेस आहे.

दिवस दुसरा -
आजही मुलांना बसमधून उतरवून रिसिव्ह केल्यावर जाणवलं आज मुलं खुशीत आहेत. उत्सुक दिसताहेत.ब्रेकफास्टला वाफल्स आणि सिरप आणि मिल्क असं होतं. ब्रेकफास्ट संपवून आम्ही मुलांना सोशल स्किल्स सेशनला घेऊन गेलो. आज क्रिसचा वेगळाच मूड होता. आजचा गेम मजेदार होता. पत्याचा कॅट साधाच पण त्याने त्यातून एक शहर निर्माण केलं. प्रत्येक कार्ड म्हणजे डॉक्टर, मेयर, सिटीझन, थिफ इ. प्रत्येकाने हेड डाऊन करुन बसायचं. आम्ही टिचर्सनी ह्यात भाग घेतला होता. कोणालाच दुसर्‍या कोणाचं कार्ड माहिती नव्हतं. प्रत्येक राऊंडला वोट करुन एकेक प्लेअर वोट आऊट करता यायचा. गंमत म्हणजे शेवटी सगळे थिफ्स राहिले.मुलांना खूप मजा आली. विशेष म्हणजे इतके बिहेविअर राईट अप्स झालेली मुलं पूर्ण एक तास इतक्या पीन ड्रॉप सायलेन्स मधे गेले एक तास हा गेम आमच्याबरोबर खेळत होती.

आता माझ्या ग्रुपला क्लासमधे घेऊन जायची वेळ झाली.आज मी मुलांसाठी जेल पेन्स आणली ती.सहज डोक्यात आलं आज हॉलमधे शिकवावं. मुलांचे डोळे विस्फारले.' यु मीन ऑन द फ्लोअर? कॅन वी ले डाऊन?' मी म्हटलं हो. मग काय एक तास मुलं हॉलवे मधे फ्लोअरवरती ले डाऊन मस्त फ्रॅक्शन शिकले. आज मी थोडे क्लिष्ट प्रॉब्लेम्स निवडले होते त्यामुळे डेस्कची फॉरमॅलिटी आज चालली नसती. आज जरी स्किल अवघड असलं तरी वातावरणामुळे फ्रस्ट्रेशन नव्हतं.ह्या प्रोग्रॅमची ऑर्गनायझर वॉकला जाताना आम्हाला पाहून थबकली एक क्षण पण नंतर पटकन येऊन कानात बोलली ' यु आर प्रिटी कूल' आणि जाऊन फोटोग्राफरला घेऊन आली. मग काय मुलं जाम खुश. आज प्रत्येक स्टेपला मी जेल पेन देत होते. त्यामुळे मुलांना जाम कॉन्फिडन्स येत होता. आजचा लेसन बर्‍यापैकी यशस्वी झाला होता.

लंचला आज मुलांना तिरॅमसू केक, फळं आणि गरम गरम ग्रिल्ड चीज सँडविचेस होते. मुलं जाम खुश होती. जेवण झाल्यावर क्रिसने अनाऊन्स केलं प्रत्येक ग्रेडने येऊन डान्स करायचा मगच प्राइझेस मिळतील. काही मुलं पटकन आली आणि आम्ही त्यांचे डान्स टॅलेंट बघून थक्क झालो.काही मुलं लाजत होती.क्रिसने त्यांना हाताला धरुन आणलं.आता पुढची वीस मिनिटं नुसता दंगा सुरु होता. मग नंतर परत मुलांना जागेवर बसवून नावं ड्रॉ करायला सुरुवात झाली. जसजसं नावं अनाऊन्स केली जात होती तसा टाळ्यांचा कडकडाट होत होता. आणि टाळ्या वाजवणारी मुलं ती होती ज्यांची नावं झाली अनाऊन्स झाली नव्हती ती मुलं. किती मोठं मन असतं नाही मुलांचं?

ह्यानंतर मुलांना आम्ही बाहेर घेऊन गेलो. आणि तिथे एक मोठं पांढरं कापड पसरलं होतं आणि खूप सारे रंग. मुलांना त्यांच्या ग्रेड लेवलचा मोटीवेशन बोर्ड तयार करायचा होता. तेही अ‍ॅज अ ग्रुप. दुसर्‍यांच्या आयडिया ऐकून घेणे, अ‍ॅक्सेप्ट करणे,प्लॅन करणे हे सगळे स्किल्स आम्ही त्यांना शिकवले. आता रंग आणि त्यांची क्रिएटिविटी. फार छान अनुभव होता तो. ह्यानंतर परत एक तास मॅथ.इतकी मजा केल्यानंतर मला वाटलं आता मुलं कंटाळतील. मग मला परत एक आयडिया सुचली.आज आम्हाला गोल्ड फिश क्रॅकर दिले होते. मी त्या बॅग्ज मुलांसमोर ठेवल्या आणि सांगितलं' आस्क मी व्हॉट आय कॅन हेल्प यु ऑन.आय विल टीच यु अँड गिव्ह यु ए प्रॉब्लेम.व्हाईल सॉल्वींग यु कॅन इट युअर क्रॅकर्स'. यातून मला त्यांना सांगायचं होतं' इटस ओके इफ यु डोन्ट नो समथिंग.अँड आय एम हिअर टू हेल्प'. हे सेशन खूपच छान झालं.' मिस कुलकर्णी नाऊ मॅथ इज फन अँड यु आर फनर' समँथा चिवचिवली.

आज शिकवताना ऑरगायनायझर टीम माझ्याशी बोलायला आली.'आज पॅरेंट नाईट आहे.तू बोलशील का? तू ज्या प्रकारे मुलांशी रिलेट करतेस ते आम्हाला फार आवडलं आहे.' मला जाम टेन्शन आलं.

मी हो म्हटलंय खरं पण काय बोलू? होमलेस असलेल्या पेरेंटशी मी कशी रिलेट करु शकेन?
त्याच विचारात घरी आले...

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle