सेव्हन लेअर डिप

७ लेअर डिप हे खरंतर री ड्रमंडच्या "पायोनिअर वुमन" नांवाच्या कुकरी शोमध्ये मी पहिल्यांदा पाहिले. नंतर गूगलवर त्याचे अनेक वेरिएशन्स सापडले. मात्र माझ्या शाकाहारी मैत्रिणींसाठी मी त्यात थोडे बदल करून मागच्या पार्टीत हे डिप बनवले आणि सर्वांना खूप आवडले. त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी.

साहित्यः-
१. रिफ्राईड बीन्स- मी ह्याचा कॅन वापरला. तुम्हांला हवे असल्यास उकडलेला राजमा मॅश करून थोड्या तेलात परतून त्यात जिरेपूड, (ऐच्छिक लसूण पावडर) आणि तिखट घालून ते सुद्धा वापरू शकता.
२. मक्याचे दाणे- कॅन्ड अथवा फ्रेश.
३. सावर क्रीम / आंबट दही.
४. ग्वाकामोल.
५. काळे /हिरवे जे मिळतील आणि आवडतील ते ऑलिव्ज.
६. आईसबर्ग सॅलड / लेट्यूसची पाने.
७. चेडार चीज- किसून.

८. डिपमध्ये बुडवण्यासाठी नॅचोज / चीप्स.

कृती:-
१. सर्वप्रथम अ‍ॅव्होकॅडोचा गर काढून तो मॅश करून घ्यावा. त्यात लिंबू पिळावे जेणेकरून ते काळे पडणार नाही. त्यात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर घालून एकत्र करून ठेवावे.
२. चेडार किसून घ्यावे. कॅन्ड रिफ्राईड बीन्स वापरणार नसल्यास राजमा वापरून साहित्यात लिहिल्याप्रमाणे मिश्रण तयार करुन घ्यावे.
३. ज्या बोलमध्ये हे डिप सर्व्ह करणार आहात त्यात आता हे लेअर्स लावायला घ्यावेत. मी लिहितेय तो क्रम तुम्हांला नको असल्यास त्यात तुम्ही बदल करू शकता. चवीत फरक पडणार नाहीये :)
४. बोलमध्ये सर्वात खाली रिफ्राईड बीन्स घालावेत आणि ते मिश्रण एकसारखे पसरवून घ्यावे. त्यावर मक्याचे दाणे, सावर क्रीम, ग्वाकामोल, सॅल्ड, ऑलिव्ज आणि चीज घालावे.
५. नॅचोज अथवा चीप्स बरोबर सर्व्ह करावे.
६. चमचा घालून सर्व्ह करताना चमचा अगदी शेवटच्या लेअरपर्यंत जातो आहे ना हे बघावे.
७. एंजॉय विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स :)

ता.क.- ही रेसिपी लिहिण्यासाठी वीकएंडला परत हे डिप बनवले. ह्यावेळी कमी प्रमाणात बनवले असल्याने सर्व लेअर्स तेव्हढे नीट दिसत नाहीयेत :)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle