म्युचुअल फंड- -२ - थोडा है थोडे की जरुरत है

"अरे पण मला गरजच काय गुंतवणुकीची?? बँकेत खात्यात रक्क्म आहे, एफ डी केल्यात,कशाला हवी आहे अजुन गुंतवणुक??"

"दोन फ्लॅट्स घेतलेत आणि भाडं घेत निवांत बसलो आहे, रियल इस्टेटम्ध्ये घातलेत पैसे! मला काय गरज नाही पैसा गुंतवायची"

"तुमचं सगळं बरोबर, पण आता मी रिटायर होणार, मला काय उपयोग गुंतवणुकीचा??

"छे छे! नकोच ते मार्केट अन शेयर्स अन फंड वगैरे! आपण आपली सोन्यात गुंतवणुक करावी बास्स!!"

"मला काही कळत नाही यतलं, कशाला उगाच कष्टाने कमवलेल्या पैशाला मोहापोटी जोखमीत घाला, उगाच कमी झाला रेट तर काय करता"

"आता आम्ही सिनियर सिटिझन! पॉलिसिज आहे इन्श्युरन्स्च्या, कशाला मोहात पडा, त्यापेक्षा ठेविले अनन्ते तैसेचि रहावे!"

"अरे, तुला कळलं का, त्या पव्याने कोणत्यातरी फन्डात टाकले पैसे अन लै कमावले, चल आपणही टाकुयात"

..................................................................................................

ओळखीचे वाटतायत ना हे सगळे संवाद? कधीतरी आपणही असं काही बोललो असतो, ऐकलं असतं किंवा विचार तरी केला असतोच. मुळात गुंतवणुकीची गरज काय?? या प्रश्नापासुन या महत्वाच्या विषयाला पॉसिटिव्ह अन नेगेटिव असे फाटे फुटतात अन अपुर्‍या, ऐकिव महितीमुळे आपण एका खुप मोठ्या, गहन आणि अत्यंत अभ्यासपूर्वक काम करणार्‍या या शास्त्राकडे कानाडोळा करतो.

चला तर मग, आज आपण वर उल्लेखलेल्या शंकासुराला नि:शंकसुरात बदलुन टाकु!!

संवाद १: "अरे पण मला गरजच काय गुंतवणुकीची?? बँकेत खात्यात रक्क्म आहे, एफ डी केल्यात,कशाला हवी आहे अजुन गुंतवणुक??"

मुळात तुमच्या बॅन्केच्या खात्यात भरपुर रक्क्म आहे याचा अर्थ तुम्ही बचत उत्तम करता असा होतो.पण फक्त बचत करून महागाईशी सामना करणं कठिण आहे हे तर आपण जाणतोच. सेविन्ग्मध्ये ठेवलेल्या त्या रकमेचं आजच्या तारखेचं मुल्यांकन बघणं तितंकच महत्वाचं आहे.
उदा. २००८ मध्ये साखर २० रुपये किलो होती, आज तीच साखर जवळ्पास ४० रुपये किलो झाली आहे. म्हणजे दहा वर्षात एकाच वस्तुच्या तितक्याच प्रमाणासाठी आपण दुप्पट पैसे मोजतोय. पण २००८ ठेवलेल्या २० रुपयाला आज किती मूल्य मिळतं आहे?

एफ डी वर मिळणारं व्याज बघितलं तर त्याचा आलेख उतरता आहे, त्यामुळे या ठेविंवर मिळणार्‍या व्याजाला आपण उत्पन्न म्हणु शकत नाही. ते फक्त तुम्हि बँकेला वपरायला दिलेल्या रकमेचं भाडं आहे. त्यामुळे अचानक आलेल्या खर्चासाठि त्या कोणत्याही पैशाचा वापर तुमचं बजेट बिघडवू शकतं.

त्यामुळे वाढत्या महागाईशी दोन हात करायला केवळ सेविन्ग किन्वा ठेवी कमी पड्तात.
आठवा, गव्हाच्या पोत्याचं पहिलं समिकरण

संवाद२: "दोन फ्लॅट्स घेतलेत आणि भाडं घेत निवांत बसलो आहे, रियल इस्टेटम्ध्ये घातलेत पैसे! मला काय गरज नाही पैसा गुंतवायची"

रियल इस्टेट मधली गुंतवणुक कायमच अपल्याला भुरळ घालते. वरच्या संवादात एक फ्लॅट कर्ज घेउन अन एक कर्ज न घेता घेतला आहे असं गृहित धरुयात.
कर्ज घेतलेल्या घराचे हप्ते अन त्या घरावर मिळणारं भाडं याचं प्रपोर्श्न जर बघितलं तर हे गणित कळेल.
कर्ज घेण्यासाठी आधी तर तुम्हाला किमान २०% रक्क्म स्व्तः भरावी लागते. उरलेल्या रकमेच्या कर्जाच्या परतफेडीत मुद्दल अधिक व्याज असं मिळून सरासरी दिडपट (जास्तच पण कमी नाही) रक्क्म तुम्ही बँकेला परत देता. जरी हे घर भाड्याने दिले, तरीही त्या भाड्याची रक्क्म हप्त्याच्या रकमेपेक्षा अगदीच कमी असते. त्यामुळे हे भाडं ईएमआयचा भार थोडा कमी करतं, उत्पन्नात भर घालत नाही. जरी, अगदीच नशिबाने तुम्हला ईएमाआय ईतकंच भाडं देणारं कोणि भेटलं, तरीही त्याबदल्यात तुमचं घर तो वापरतो आहे. म्हणजे मुळ भांडवलात कुठंच भर नाही. घर विकताना त्यला मिळणारी किंमत म्हणाल तर ती किंमत वजा कर्ज फेडलेली रक्कम यसाठि लागलेला वेळ हेही बघा. परत वाढिव किंमतीच्या बदल्यात घर देताय.
हे म्हणजे गव्हाच्या पोत्याच्या उदाहरणातलं दुसरं समिकरण झालं

घरावर कर्ज नसल्यास काही प्रमाणात मिळ्णारं घरभाडं लघु प्रमाणात उत्पन्न म्हणुन गृहित धरू शकतो. खासकरुन ज्यांचं वडिलोपार्जित घर आहे त्यांना. पण उत्पन्न म्हणून घरभाडं मिळवण्यासाठी घर घेणं कितपत शक्य आहे?

याउपर,काही इमर्जन्सी आल्यास, रियल इस्टेटमध्ये गुन्तवलेला पैसा लिक्विफाय करणे किचकट ठरतं.

संवाद ३: "छे छे! नकोच ते मार्केट अन शेयर्स अन फंड वगैरे! आपण आपली सोन्यात गुंतवणुक करावी बास्स!!"
बरोबर, सोन्यात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरते, पण लाँगटर्मसाठी. या गुंतवणुकीचं महत्व ठाऊक असल्यामुळेच म्युचुअल फंडात खास गोल्ड स्किम असतात.
म्हणजे बघा, समजा १ तोळा सोन्यात आज गुंतवणुक करायची ठरवली, तर ३१,०५१ रुपये लागतील. अगदी कमीत कमी म्हंटलं तरी १ ग्रॅम, अर्धा ग्रॅमचं वेढ्णं तरी घ्यावं लागणार. ते सांभाळायची जोखिम. परत ते लिक्विफाय करायचं, किन्वा रिप्लेस करायचं म्हंटलं तरीही सराफाच्या त्यावर लागणार्‍या अटी, मजुरी वगैरे वेगळं. त्यापेक्षा सोन्यात गुंतवणुक करणार्‍या स्किमने हि जोखिम कमी होते, घट-घडणावळ, सराफ या सगळ्यातून सुटका होते अन सर्वात महत्वाचं म्हणजे सराफ देतोय त्याभावात सौदा न करता अक्च्यल मार्केट रेट्ने सौदा होतो.

संवाद ४: मला काही कळत नाही यतलं, कशाला उगाच कष्टाने कमवलेल्या पैशाला मोहापोटी जोखमीत घाला, उगाच कमी झाला रेट तर काय करता"
"आता आम्ही सिनियर सिटिझन! कशाला मोहात पडा, पॉलिसिज आहे इन्श्युरन्स्च्या, कशाला मोहात पडा, त्यापेक्षा ठेविले अनन्ते तैसेचि रहावे!"
त्यापेक्षा ठेविले अनन्ते तैसेचि रहावे!"

जोखिम!!! रिस्क!!! अब आया ना उंट पहाड के निचे!!! आता काय ??***

मला सांगा, रिस्क कशात नसते? गाडी चालवण्यात रिस्क नसते? पोळ्या करण्यात रिस्क नसते?? रिस्क ही सगळीकडेच असते. तरीही आपण ती घेतो कारण त्या रिस्क्ला कंट्रोल करण्यात आपण सराईत झालो असतो. कितीही ऊन, पाऊस, वारा, प्रतिकुल परिस्थिती आली तरिही, शेतकरी पेरणी करतोच, रिस्क घेतोच. तेव्हाच तर नवंकुर जन्मण्याची शक्यता निर्माण होते.

ज्येष्ठ मंडळींनो, तुम्ही आधीच आयुष्यात खुप चढ उतार बघितलेत, तावुन सुलाखुन निघालात. आता या महागाईमुळे तुमची मनःशांती टिकुन रहावी. विमा तुम्हाला इमर्जन्सिमध्ये कामी येइल, तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबियांना ते कामी येतील. पण वाढत्या महागाईशी 'न सर झुका है कभी, ना झुकाएंगे कभी' होण्यासाठी तुमच्यासाठी खास गुंतवणुकीच्या स्किम्स आहेत.
तसंच या मार्केट्च्या, गुंतवणूकीच्या रिस्क कंट्रोल करायलाच आमच्यासरखे गुंतवणुक सल्लागार कामी येतात. ज्याप्रमाणे एखादा स्पोर्ट्स ट्रेनर खेळाडूला वेळोवेळी गरजेनुसार मार्गदर्शन करतो, त्याच प्रमाणे आम्ही तुम्हाला या रिस्कमधुनदेखिल सहजगत्या तरुन नेतो, केवळ तुमच्या संयम, विश्वास आणि चिकाटीच्या भरवश्यावर.

संवाद : "अरे, तुला कळलं का, त्या पव्याने कोणत्यातरी फन्डात टाकले पैसे अन लै कमावले, चल आपणही टाकुयात"

एव्हाना मला वाट्तं, या वरच्या संवादापर्यंत तुमचा प्रवास आला असेल.. पण परत एक सांगते, जसं प्रत्येक दुखण्याला एकच औषध नसतं, तसंच एकाला फायदा देणारा किंवा तोट्यात नेणारा फंड दुसर्‍यालाही तसाच फळेल असं काही नाही. त्यामुळे जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच गरजा तितके पर्याय!!!!

...............अपल्या या 'अर्थ'पूर्ण प्रवासात, एक सल्लागार म्हणून माझ्यासाठी अजुन एक महत्वाची गोष्ट आहे, या अर्थिक प्रगतीच्या वाटेवर चालताना तुम्ही नि:शंक, निश्चिंत आणि आत्मविश्वासाने या सार्‍याकडे बघावं. त्यासाठी तुमच्या मनात येणार्‍या कोणत्याही प्रश्नाला मनात ठेऊ नका, व्यक्त व्हा! उत्तर द्यायला मी आहेच!!

***यावर डिटेल पुढिल भागात
क्रमशः

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle