म्युचुअल फंड्स- फंड का फंडा

हाय मैत्रिणीनो, कशा आहत??

गुंतवणुक म्हणजे काय आणि गुंतवणुकीची गरज याबाबत आपण मागील लेखात बघितलं.

आता वळुयात 'म्युचुअल फंड'कडे.

१. म्युच्युअल फंड म्हणजे काय??

म्युचुअल फंड म्हणजे शेयर्स, बाँड्स, दिबेन्चर्स, गवर्मेंट सिक्युरिटिज या आणि अशा प्रकारच्या गुंतवणूकीच्या पर्ययात, वेगवेगळ्या काँबिनेशनमधे एकाच वेळी गुंतवणुक करण्याची संधी देणारा पर्याय आहे.
"Mutual fund is a basket of investments.. as its name suggests it offers investment in mutual options"

एखाद्या फळांच्या बास्केट्मध्ये ज्याप्रकारे वेगवेगळी फळं रचुन ठेवली जातात त्याचप्रमाणे म्युचुअल फंड अपल्याला आपल्या गरजेनुसार, हेतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या स्किम्स मध्ये गुंतवणुक करायची संधी देतात. आपली गरज, रिस्क घेण्याची क्षमता, किती काळ गुंतवणूक करु शकतो, कशा प्रकारे गुंतवणूक करायची आहे या आणि अशा घटकांनुसार स्कीम निवडली जाते.

२. फंड्सचे प्रकार : म्युचुअल फंड्स अनेक प्रकारचे आहेत. त्यातील काही प्रचलित फंड्स म्हणजे :
• इक्विटी फंड्स: या प्रकारात एकूण रकमेच्या ८० ते १०० टक्के भाग* हा शेयर मार्केटमध्ये आणि उर्वरित भाग government बॉन्ड्स, मनी मार्केट इत्यादीमध्ये गुंतवला जातो.
• डेट फंड्स: या प्रकारात गवर्मेंट बॉन्ड्स, कंपनी बॉन्ड्स अशा प्रकारात गुंतवणूक केली जाते.
• balansed फंड्स: या प्रकारात शेयर मार्केट गुंतवणुकीचे प्रमाण कमी (जास्तीतजास्त ६५%) आणि उर्वरित डेट, बॉन्ड्स इत्यादीत गुंतवल जातं.
• goal oriented funds: मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, रिटायरमेंटची तजवीज, घर- वाहन घेण्यासाठी तयारी, पर्यटनासाठी तजवीज या आणि अशा उद्दिष्टांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने तयार केलेले खास फंड्स असतात.
• या व्यतिरिक्त सोन्यात गुंतवणूक करायला गोल्ड फंड्स, एखाद्या ठराविक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सेक्टर फंड्स, अत्यंत कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी लिक्विड फंड्स-हे आणि असे अनेक पर्याय म्युचुअल फंडात समाविष्ट असतात.
३. कसे इंवेस्ट करावे?
यात २ प्रकार आहेत: एक तर तुम्ही lumpsum गुंतवणूक करू शकता, किंवा SIP- Systematic Investment planning च्या माध्यमातून.
lumpsum प्रकारात ज्या रकमेची गुंतवणूक करायची आहे त्या रकमेचा चेक देऊन गुतवणूक केली जाते. यात किमान ५००० रुपयाची प्राथमिक गुंतवणूक करावी लागते.
SIP प्रकारात दर महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या बँक accountमधून ठराविक रक्कम फंडमध्ये ट्रान्स्फर होते. यात मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक असेही पर्याय असतात. काही स्किम दैनिक, साप्ताहिक SIP चि देखील सुविधा देतात. SIP सहसा किमान १००० रुपयांपासून सुरु होतात. काही स्कीममध्ये १०० पासूनही SIPकरायची सुविधा असते.
कोणत्याही प्रकाराने गुंतवणूक सुरु केल्यानंतर तुम्ही कधीही त्यात addition करू शकता.
४. मला जर एखदी स्कीम बदलावी वाटली तर? पैसे काढायचे असले तर?
दोन्ही गोष्टी- स्कीम बदलणे, पैसे काढणे या अत्यंत सुलभ आहेत.गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्याच्या आधी स्कीम बदल किंवा पैसे काढल्यास १ % exit load बसतो. १२ महिन्यानंतर हा लोड ० होतो.
काही स्कीमला लोकिंग पिरेड असतो, म्हणजे या काळापर्यंत पैसे काढता येत नाहीत किंवा त्यावर जास्त लोड भरावा लागतो.
५. यात रिस्क काय असते?
*Mutual fund investments are subject to market risks. Please read the offer document carefully before investing.
हे तर सगळ्यांनी ऐकलंच असेल, आता याचा अर्थ समजून घेऊयात.
म्युचुअल फंड्समधल्या गुंतवणूकीत केवळ एक रिस्क असते, ती म्हणजे मार्केट रिस्क. MF गुंतवणूक कमी जास्त प्रमाणात शेयर मार्केटमध्ये पैसा गुंतवते. त्यामुळे काही कारणाने मार्केट खाली आल्यास आपल्या गुंतवणुकीत काही काळ तोटा दिसायची असते. अशा काळात इन्वेस्टरच्या धीराचा खरा कस लागतो. मार्केट खाली वर होण हि अत्यंत नॉर्मल गोष्ट असते पण आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळण्यासाठी शान्तपणे पावलं उचलून, धीराने गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
मग ही रिस्क कशी ओळखायची? आपल्यासाठी योग्य फंड कसा शोधायचा याबाबत माहिती मिळते ऑफर डॉक्युमेंट म्हणजे स्कीम बाबत माहिती देण्यार्या पत्रकात. म्हणून गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आणि ऑफर डॉक्युमेंट नीट समजून घेऊन केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते.
मैत्रिणींनो, या भागात मी जरी म्युचुअल फंड्सबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला असून शक्य तितक्या सोप्या भाषेत मांडायचा हेतू ठेवला आहे. या विषयाबाबत तुमच्या काहीही शंका असल्यास जरूर विचार. त्यातून हा विषय अधिक उलगडत जाईल. तुमचे काहीही प्रश्न असल्यास मला इथं, निरोपवहीत, फोनवर कुठही गाठा.

तुमची कल्याणी
९०९६०२१२७४

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle