बनाना-वॉलनट-चॉकलेट चिप्स लोफ

साहित्य
२ मेजरिंग कप ऑल पर्पज फ्लार
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
१/४ टीस्पून मीठ
१ टीस्पून दालचिनी पावडर
१/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
१/२ कप साखर

३ रॉटन केळी अगदी छान काळी झालेली असलेली चालतात. रादर तशीच चांगली.
२ अंडी
१/२ कप कुकिंग ऑईल
१ टेबलस्पून दही

६० ग्रॅम आक्रोड (मूठभर)
४० ग्रॅम बेकिंग साठीच्या चॉकलेट चिप्स (मूठभर)

कृती

एका मोठ्या बोल मधे आधी सुके घटक एकत्र करायचे. दुसर्‍या बोल मधे केळी नीट मॅश करून घ्यायची. मग अंडी, तेल, साखर वगैरे घालून नीट फेटून घ्यायचे. ओले घटक सुक्या घटक असलेल्या बोल मधे घालून परत नीट मिक्स करून घ्याय्चे. आक्रोड आणि चॉकोचिप्स थोडे आत घालून थोडे वगळून केकवर पण घालायचे.
१६० डिग्री से. वर ४० मिनिट बेक करायचे.

या साहित्यात माझे २ छोटे लोफ झाले.

ही अशी रॉटन बनानाज (मुलाच्या भाषेत)
banana.jpg

आणि हे फायनल प्रॉडक्ट
BB.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle