मेथी-पनीर-मसाला

साहित्यः एक वाटी निवडून बारिक चिरलेली मेथी. पनीरचे चौकोनी तुकडे अर्धी वाटी, एक मोठा कांदा चिरून, दोन मध्यम लाल टोमाटो, जिरे चमचाभर, गरम मसाला व फोडणीचे साहित्य नेहमी प्रमाणे, तेल, मीठ धने जिरे पावडर एक बारीक चमचा, लाल तिखट चवी नुसार, आले लसूण पेस्ट एक बारका चमचा.

कृती: कढईत तेल दोन चमचे टाकून गरम झाल्यावर त्यात जिरे, कांदा घालून परतावे, कांदा चाम्गला
परतल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे घालून परतावे. हे गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.

आता परत कढईत, ज्यात आधी कांदा परतलेले तेल असेल, त्यात आले लसूण पेस्ट , किंचित
हळद घालून वरील पेस्ट घालून मंद गॅसवर परतावे. बारीक चिरलेली मेथी घालून झाकण घालून दोन तीन मिनिट ठेवावे. पनीरचे तुकडे, गरम मसाला, धने जिरे पूड, तिखट व चवीनुसार मीठ घालावे व परत झाकण ठेवून मंद गॅस वर पाच मिनिटे शिजवावे. मेथी पूर्ण शिजली पाहिजे. भाजीला आपसूक केशरी रंग येतो. मूळ रेसीपीत तिने फुड कलर घातला आहे.पण मी त्या पक्षात नाही.

गरम खरपूस भाजलेल्या पोळी किंवा अजवैनी पराठ्या बरोबर सर्व्ह करावे. अजवेनी पराठा म्हणजे
त्रिकोणी घडीचा पराठा लाटू न त्यात ओवा व थोडेसे मीठ भुरभुरायचे.

ही कमी मेहनतीची पण फॅन्सी दिसणारी व चवीची भाजी होते. पालकाला एक त्याचा वास असतो तो इथे येत नाही. मेथी मलाई मटर इतकी हाय फॅट व हेवी नाही. पार्टीत एक पान पूरक.

सोर्स : युट्युब मेथी मलाई मटर शोधत होते पण मग त्यासाठीचे पदार्थ पक्षी काजू नव्हते मग ही केली. मटार अलग से बनाए.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle