आप्पे

ह्या रविवारी नाश्त्याला तिखट आप्पे केले होते. म्हटलं बर्‍याच दिवसात कोणतीही नविन पाककृती केली/पोष्टली नाहिये. म्हनुन मग अनायासे आप्पे बनवलेच होते त्याची कृती लिहावी. (अर्थात इकडे सगळ्यांना महितीच असेल ह्याची कृती तरीही माझी पद्ध्त सांगते.)

शनिवारी सकाळी ऑफिसला निघता निघता १ वाटी उडीद डाळ, २वाट्या तांदुळ, आणी पाव्/अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन भिजत घातली.

रात्री झोपताना हे भिजवलेले जिन्नस एकत्र मिक्सिमधुन वाटुन घेतले. डोस्याच्या पिठाएवढी कंसिस्टन्सी ठेवायची.

मग हे पिठ रात्रभर तसंच ठेवायच आंबायला.

सकाळी उठुन त्यात १ छोटा चमचा जिरं, एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आवडीनुसार, मीठ आणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन डावाने खुप फेटुन घेतलं. हवं असेल तर थोडं पाणी घालु शकता. (ह्यात तुम्ही आलं-लसुण पेस्ट सुद्धा घालु शकता.)

एका बाजुला आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवायचं, फार गरम नाही करायचं. त्याला तेलाचा हात लावुन घ्यायचा आणी मग एका चमच्याने ते बॅटर आप्पेपात्राच्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये भरायचं. खुप जास्त नाही टाकायच, कारण हे आप्पे छान फुगतात. (इनो वगैरे न टाकता) आता भांड्यावर १-२ मिनिटं झाकण ठेवायचं. आप्पे चमच्याने सहज सुटत असतील तर त्याची दुसरी बाजुही छान शेकवुन घ्याय्ची. परतल्यावर प्रत्येक वाटीत थोड तेल टाकायला विसरु नका.

हे बनवायला फार वेळ लागत नाही. फक्त आंबवण्यासाठीच वेळ लागतो. अगदी झटपट होते ही पाककृती.

माझ्याकडे हिरवी चटणी नव्हती त्यादिवशी, म्हणुन मी गोड दह्याबरोबर खाल्ले. (दही वड्यासारखे लागले. :ड )

चला तर मग तुम्हीही बनवा आणि सांगा मला कसे झाले ते.

फोटो फार काही प्रो आला नाहीये. जसा आलाय त्यात समाधान मानुन घेणे. Heehee

माहितीचा स्त्रोत : नेटवर बघुन्/वाचुन आणि माझे प्रयोग

20181216_095757.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle