हवाई - भाग १ - बीज आणि ठिणग्या

IMG_3287_0.jpg

मी लहान होते, म्हणजे अगदी बालवाडीत तेव्हा हवाहवाई हे गाणे सगळीकडे सारखे वाजायचे. श्रीदेवीचा नाच आणि गाण्याचे वेडेवाकडे शब्द, धमाल यायची पहायला. तेव्हाच कुणीतरी सांगितलेले की हवाई नावाची खरंच एक जागा आहे. ते मनात झालेले हवाईचे बि़जारोपण. नंतर शाळेत कधीतरी दुसर्‍या महायुद्दातील पर्ल हार्बर अ‍ॅटॅकविषयी वाचताना हवाई परत कानावर आले.काय असावे हे हवाई असा विचार तेव्हाही आला मनात. नंतर मग ऑफिसला जायला लागले तेव्हा एका रिट्रीटच्या निमित्ताने गोव्याला गेले होते तेव्हा ऑफिस सेलेब्रेशनची पुर्ण थीम हवाईयन होती. गोव्याचे मॅरिअट तसेही सुंदर आहे. म्हणजे तेव्हातरी होते. आणि आमच्या थीमच्या नुसार त्यांनी आमचे वेलकम, रुम सजावट, कॉन्फरन्स रुम अ‍ॅरेंजमेंट, फुड, एंटरटेनमेंट सगळी हवाईअन केली होती. भरपुर चाफ्याची फुले, ऑर्किड्स, हवाईअन कपडे घातलेले अटेंडंट्स, माई टाई ड्रिंक्स, पायनापल डीझर्ट्स, पपाया, असा सगळा एक्झॉटिक मामला होता. तेव्हा मनात आले खरंच हवाईला हे सगळे असे असेल? या प्रश्नाचे उत्तर मिळायला १२ वर्षे जावी लागली.

लग्न झाले तेव्हा अमेरिकेत आले आणि कंटाळुन वर्षाच्या आतच भारतात निघुनही गेले.तेव्हा फक्त ३/४ प्रसिद्द शहरे फिरलो होतो. हवाई तर दुरच. मग अमेरिकेत परत आले ती डायरेक्ट मुलाच्या जन्मानंतर. दोन राज्ये फिरुन एकाठिकाणी स्थिरावलो. ईथे थंडीचा नुसता वैताग यायचा मला. अजुनही येतो. नोव्हेंबर ते मार्च तर अगदी भारतात पळुन जावेसे वाटते आणि मुलगा शाळेत जात नव्हता तोपर्यंत मी दरवर्षी भारतात जायचेही. एक दोन थंडीत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा अशी वॉर्म ठीकाणे फिरुन आलोही. तेव्हाच काही कपल्स हवाईला जाउन आल्याचे कळले. त्यांच्या माहितीनुसार हनिमुनर्ससाठी बेस्ट आहे,फॅमिलीजसाठी छान आहे, रिझनेबल आहे, महागडे आहे, वर्थ आहे, वर्थ नाही असे परस्परविरोधी डिटेल्स कळत होते. यांतले सगळे बरोबर्/चुक असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा अनुभव, द्रुष्टी, अपेक्षा वेगवेगळ्या असतात. पण ते अतिशय सुंदर आहे याबाबत सगळ्यांचेच एकमत होते.

आपण पण हवाई प्लॅन करु या का असे मी उत्साहाने नवर्‍याला विचारले. त्यावर त्याने "छे, काहीतरीच काय, हा किती लहान आहे आणि घरही घ्यायचंय, त्याच्या डाऊन पेमेंटचे पैसेही साठवायला हवे" अशी नेहमीची टेप वाजवायला सुरुवात केली. त्यावर मी "हवाई प्लॅन करुया असे म्हणाले, बेबी नव्हे" एवढेच ऐकवले आणि विषय तेथेच संपला. ठीणगी पडताच विझली Sad

४ वर्षांपुर्वी घर झाले तेव्हा दर सुट्टीत कुणी ना कुणी आमच्याकडे घर पहायला यायचेच. आईबाबा, सासरचे, मित्रमैत्रिणी वगैरे. त्यांच्याबरोबर अमेरिकेत खुप फिरलो पण हवाईचे नावही काढत नव्हतो. नव्या घराची नवलाई संपली, मुलगाही पुर्णवेळ शाळेत जाऊ लागला तेव्हा मी परत ठीणगी टाकली. "अरे ते अमके तमकेपण जाऊन आले हवाईला, आपण कधी जायचं"? आता मुलानेही मला दुजोरा दिला. त्याला हवाईशी काहीही देणेघेणे नाही. तो हॉटेलात रहायला जायचे म्हणुन कुणालाही सपोर्ट करु शकतो. मग भले त्याला कर्जत, कसार्‍याला नेले तरी चालेल. नवर्‍याने हो बघुया असे मोघम उत्तर दिले. त्यावर मी माझे नेहमीचे डायलॉग्स चालु केले. "मीही कमावते, मला प्रवासाची आवड आहे, मी मनात आणलं तर एकटीही जाऊ शकते". मुलाने लगेच सांगितले की तु एकटी जाऊ नको मॉम, मी पण येतो. त्याचा कनवाळुपणा (?) पाहुन डोले पाणावले (हसुन). परत नवर्‍याला पिडले, "तुला विचारतेय तर काहीतरी इंटरेस्ट दाखव". मग थोडी आदळापट, आरडाओरडी केली. मुलाचा इंटरेस्ट एव्हाना संपल्याने त्याने अंग काढुन घेतले. नवरा समजावत होता मग मीही म्हंटले जाऊदे, तसेही त्यावर्षी आम्ही सगळेच भारतात जाणार होतो. तेथे काही कौटुंबिक कारणाने बराच खर्च होणार होता. वक्त से पेहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता. ठीणगी नं २ ही विझली.

सप्टेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ मी अतिशय वाईट मनस्थितीत होते. माझ्या आधीच्या बोक्याचे हरवणे फार टोचले मनाला. रोजच त्याला शोधत फिरणे, रडणे, कुणांत न मिसळणे या सगळ्याने खुप निराश होते. पर्यायाने घरावरही अवकळाच होती. नवर्‍यानेच यावेळेस हवाईचा विषय काढला आणि मला सगळा रिसर्च करायला सांगितले. या डिसेंबरात जाऊया म्हणाला. त्याच सुमारास आमचा हा बोकाही आमच्या आयुष्यात आला आणि सगळ्यांचेच मनस्वास्थ्य सुधारु लागले.

तर, हवाईला जायचे म्हणजे महत्त्वाचा निर्णय हा आहे की हवाईच्या प्रमुख ६ बेटांपैकी कुठल्या बेटावर जायचे. सहापैकी चारच बेटे टुरिझमसाठी प्रसिद्ध आहेत आणि तीही वेगवेगळ्या कारणांमुळे. रिसर्च करताना मला लक्षात आले की हवाईबद्दल वेगवेगळी मते येतात कारण प्रत्येक बेटावर वेगवेगळे अनुभवायास मिळते. मी आम्हा तिघांच्या आवडी लक्षात घेउन 'बिग आयलंड' हे डेस्टिनेशन नक्की केले. कॉस्कोतुन विमानाचे आणि हॉटेलचे चांगले डील मिळाले. आता तयारी सुरु केली ती प्रत्येक दिवसाच्या प्लॅनिंगची. त्यासाठी ट्रिपॅअ‍ॅडवायझर या साईटची मला खुप मदत झाली. शिवाय आमच्या हॉटेलला फोन करुनही बरीच माहिती आधीच मिळवली.

पुढील भागात डीटेल्स लिहीते आणि अजुन फोटोही टाकते. माझा स्पीड पाहता १०/१२ भाग तरी होतीलच. पुढील भाग मोठे टाकायचा प्रयत्न करेन.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle