अस्तित्व

"पिल्लू , भुतं असतात का रे??" मीतू च्या प्रश्नावर अंशुल चमकला...
"ऍ ??? हे काय नवीन???" त्याने विचारलं
"ऑ... सांग ना ! "
" हो तर, भुतं असतात...खूप भयानक असतात ,मला दिवसा पण दिसतात ! "
"ऑ ???? "
"हो एक भूत तर आता माझ्या इकडे च बसलंय ! "
" शटअप , इडियट... मी आपलं काहीतरी सिरीयस विचारतेय आणि तू माझी च मस्करी चालवली आहेस"
मीतू उठली रागारागात आणि चालू लागली...
अंशुल ही मागेमागे गेला, तिचा हात धरून थांबवलं आणि बोलला , " काय ग, थोडी शी मस्ती तर केली .. सॉरी हा! आता हस पाहू.."
मीतू गोड हसली....
मीतू आणि अंशुल एक क्युट कपल. ८ महिन्यांपूर्वी च एकमेकांच्या प्रेमात पडलेले. सगळी कडे त्यांना फक्त आणि फक्त प्रेम च दिसत होतं...
अंशुल शेजारच्या गावातल्या सारपंचाचा मुलगा तर मीतू त्याच गावात राहणाऱ्या एका सध्या बँक कर्मचार्याची मुलगी .
अगदी मुव्ही मध्ये शोभेल अशी गोष्ट नै !
अंशुल आणि मीतू घरी माहीत नसल्याकारणाने लपून छपून गावाबाहेर एक किल्ला होता ,तिथे भेटत असत.
मीतू तर सरळ कॉलेज ला दांड्या मारून अंशुल ला भेटायला जायची. मजेत दिवस चाललेले.
यथावकाश मीतू च कॉलेज संपलं. सुट्ट्या चालू होत्या ... रिझल्ट लागला की तिला जॉब वगैरे करायचा होता... तिने एक दिवस असंच अंशुल ला विचारलं, "अंशुल मला तुझ्या ऑफिस मध्ये च काम देशील का? मग आपल्याला असं चोरून भेटायची गरज राहणार नाही "
तिचं बोलणं ऐकून अंशुल विचारात पडला. त्याचे वडील जरा कर्मठ होते. गावचे सरपंच असल्याने त्यांचं ऑफिस त्यांच्या घरात चं थाटलेलं होतं. मीतू ला ऑफिस मध्ये यायची परवानगी दिली तर बाबा कसे रिऍक्ट होतील हे त्याला पक्कं माहीत होतं. पण त्याला मीतू च मन ही दुखवायचं नव्हतं.
तो तेव्हढ्यापुरता हो बोलला तिला. मीतू चं ही समाधान झालं.
एक दिवस मीतू घरी च होती. ती अंशुल चा कॉल एक्सपेक्ट करत होती. पण नेमकी तिला आई ने जेवणात मदत करायला बोलवलं. आता आई समोर तर फोन वर त्याच्याशी बोलायला जमणार नव्हतं. तिने फोन सायलेंट वर टाकला. आणि किचन मध्ये येऊन पीठ मळू लागली.
मध्येच आई ने विचारलं ," मीतू , कामत काकांचा विराज कसा वाटतो गं तुला??"
"का गं, काय झालं? " मीतू.
" नाही काही नाही , ते तुझ्याबद्दल चौकशी करत होते. " आई
" माझ्याबद्दल?? का ते?? " मीतू.
" चल , आता आडून बोलण्यात काहीच अर्थ नाहीय, बाबा आणि मी तुझ्यासाठी विराज च स्थळ स्वीकारावं हा विचार करतोय" आई.
" आई, काही काय अग... आताच तर टी वाय ची परीक्षा संपलीय, मला अजून पुढे जॉब करायचाय, तुमच्यासाठी कमवायचं आहे, इतक्यात काय लग्नाचं घेऊन बसते आहेस.. नाही हा , आय एम नॉट इंटरेस्टेड ". मीतू.
" हे बघ , मान्य आहे थोडी घाई होतेय , पण एकदा भेटून तर घे त्याला , आणि नोकरी लग्नानंतर पण कर च की" . आई
" मला मैत्रिणी कडे जायचंय, मला नाही बोलायचं या विषयावर आणि इतक्यात लग्न नाही करायचं" इतकं बोलून मीतू हात धुवून बाहेरच्या रूम मध्ये गेली.
" अग ऐक मीतू, थांब " आई इतकं बोलेपर्यंत मीतू फोन घेऊन घराबाहेर पडली सुद्धा.
बाहेर आल्यावर फोन बघितला तर 3 मिस्ड कॉल अंशुल चे.
तिने कॉल केला आणि त्याला भेटायला बोलवलं , त्याच पडक्या किल्ल्यात.
ती तिकडे पोहोचे पर्यंत अंशुल आलेला तिकडे.
त्याला लवकर आलेला पाहून मीतू थोडी गोंधळली. तिने जाऊन त्याला आई आणि तिचं जे बोलणं झालं ते सर्व सांगितलं. आणि म्हटलं , " तू घरी सांग तुझ्या आणि मी पण सांगते माझ्या घरी. अटलिस्ट मला घरातले पुन्हा लग्न या विषयावरून काही विचारणार तरी नाहीत".
" हो , हो अग का घाई करते आहेस, इतकी पॅनिक का होते आहेस.. थांब आपण यावर काही सोल्युशन काढुया. मी आता घरी नाही सांगू शकत, निवडणुका ,प्रचार वगैरे तोंडावर येऊन ठेपले आहेत. घरात वाद चालू होतील उगाच. थोडा वेळ थांबुया"
"अर्रे पण सांगून तर टाक न, आज न उद्या बोलावं तर लागेल च ना?? बरं आई ला तरी सांग तुझया".
" बरं बाई सांगतो, आज च सांगतो बस?? आता हस पाहू ."
मीतू हसली, तिच्यावरचा ताण संपला नसला तरी कमी नक्की च झालेला.
अंशुल बोलता बोलता म्हणाला, " मीतू , मला सांग , जर एखादा माणूस मेला , आणि त्याच्या काही अपूर्ण इच्छा असतील तर त्याला मुक्ती मिळत असेल का ग?? की तो भूत बनत असेल?? "
मीतू हसायला लागली, " बावळट , भूत काय ... आत्मा म्हण ! मला तर भूत म्हटलं की ईव्हील डेड मधली भुतं आठवतात "
अंशुल पण हसला... " हो तेच आत्मा ,, सांग न "
मीतू बोलली " बघ आत्मा , भूत हे सर्व माणसाने बनवलेले प्रकार आहेत. असं काही नसतं अर्रे ! "
अंशुल परत बोलला , " तरी पण, म्हणजे बघ न, एखाद्याला अकाली मरण आलं म्हणजे अगदी 17 किंवा 18 व्या वर्षी, आणि त्याची कोणावर तरी प्रेम करायची इच्छा राहून गेली. तर तो आय मिन त्याची आत्मा ते प्रेम मिळवायला भटकत राहू च शकते ना??"
मीतू ला हसायला आलं " का रे आज तुला काय झालंय ? भूत , आत्मा वगैरे... मला नाही वाटत की असं काही अस्तित्वात आहे.. त्या दिवशी मी तुला भूत असतं का विचारलं ते गंमत केली मी तुझी , असं आत्मा बित्मा नसते काही.. आपण दुसरं बोलू काही... "
" मगाशी मी तुला 4 वेळ फोन केला , तू का उचलला नाही?? "
" ए 4 नाही 3दा च आलेला फोन, हा बघ....अर्रे...."
" काय गं, ?? " अंशुल
" मिस्डकॉल लिस्ट मधला तुझा नंबर कुठे आहे?? म्हणजे तुझे मिस कॉल दिसत च नाहीत " मीतू.
" डब्बा झालाय फोन, नवीन घे ! " अंशुल
" हो , म्हणे नवीन घे ! खाऊ आहे का?? चल सोनू आता 6.30 होऊन गेले मला निघायला हवं " मीतू
" काय ग तू, इतक्या लवकर चालली. चल मी त्या सोडायला येतो तुला " अंशुल
" ए बाबा, नको हा, कोणी पाहिलं वगैरे तर प्रॉब्लेम होईल उगाच. " मीतू.
" राहिलं ! त्या तुटलेंल्या गेट पर्यंत आलं तर चालेल का राणी साहेबांना??? "
आता मात्र मीतू हसली आणि बोलली, " तू एक बाईक घे न "
" घेतलेली बाबांनी माझ्यासाठी, पण ऍकसिडेंट झाला एकदा तेव्हा तिची वाट लागली पार " अंशुल
" क्काय?? कधी??? "
" मी तुला प्रपोज केल्याच्या बरोबर 3 रया दिवशी "
" अंशुल????? "
" अग काय मला काही झालं नाही वेडी " अंशुल.
" इतकी मोठी गोष्ट मला का नाही सांगितली तू?? अंशुल whats wrong with you?? "
"अग ए बाई , काही नाही झालं ग... मी नीट आहे ना?? असल्या 50 बाईक घेऊ ग नंतर. चल तू जा बराच वेळ थांबलोय आपण आता अंधार पडेल. ते तुमचे कामत काका का??" अंशुल
" ओह शीट, त्यांनी पाहिलं आपल्याला... आता???" मीतू
" आता काय?? घरी जा . विचारलं तर सांग की मी ओळखते अंशुल ला, मित्र आहे माझा "
" बघते, चल तू पण जा घरी, इकडे तिकडे टीवल्या बावल्या करत राहू नकोस . लव्ह यु"
" लव्ह यु टू बेबी "

मीतू घरी आली तेव्हा तिला अपेक्षा होती त्या प्रमाणे कामत काका घरी आलेले च.
" मीतू , पडक्या किल्ल्या जवळ का गेलेली तू इतक्या संध्याकाळी?? कोणासोबत बोलत होतीस?? " बाबांनी विचारलं
" बाबा , तो अंशुल होता ! शेजारच्या गावातले सरपंच , त्यांचा मुलगा." मीतू
बाबा उठले आणि मीतू च्या खाडकन थोबाडीत मारली.
" काय बोलते आहेस तू??? डोकं ठिकाणावर आहे का तुझं??? " बाबा
मीतू ला अचानक झालेल्या या प्रकाराने रडायला आलं, पण तिने काही विचार केला आणि ती पटकन बोलली ," बाबा , आमचं प्रेम आहे एकमेकांवर "
आई मटकन खाली च बसली. बाबा आणि कामत काका डोळे विस्फारून पाहू लागले....
" कधी पासून चालू आहे हे सर्व बेटा?? " कामत काकांनी जरा प्रेमळ पणे विचारलं
तशी मितू ला रडायला आलं....
तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत कामत काका म्हणाले, " सांगशील तुझ्या काकांना सर्व??"
मीतू बोलली ," काका गेले 8 महिने आम्ही रिलेशन मध्ये आहोत. मला हे कोणाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून ना मी कोणाला काही बोलली ना त्याला कोणाला काही सांगू दिलं... काका त्याच पण माझ्यावर खूप प्रेम आहे.. आणि माझं पण.. आम्ही लग्न करणार आहोत"
बाबा आणि आई तर काय बोलू अश्या परिस्थितीत बसले होते...
कामत काका मीतू च्या बाबांना बोलले, " चल अशोक , आपल्याला अंशुल च्या घरी जायला हवं"
मीतू धडपडत उठली ," नको काका , आता नका जाऊ प्लिज "
" बेटा, आज न उद्या हा विषय काढावा च लागेल ना?? घाबरू नको जयवंत पाटील माझा मित्र आहे , मी सांभाळून घेईन सर्व "
मीतू ने ते गेल्यावर पटकन अंशुल ला वॉट्सअप्प केलं, " अंशु , बाबा आणि काका तिकडे येतायत तुझ्या घरी. त्यांना कळलंय सर्व. आय ऍम सो टेंस्ड "
अंशुल चा रिप्लाय आला , " डोन्ट वरी जान, आय विल हँडल"
मीतू थोडी रिलॅक्स झाली.
रात्री साडे नऊ च्या सुमारास , बाबा , काका आणि अंशुल चे वडील आले आणि मीतू ला बाहेर बोलवलं.
मीतू घाबरत च बाहेर आली.
" काय वाढून ठेवलंय पुढ्यात कोण जाणे "
" बेटा तू माझ्या अंशुल ला कधी पासून ओळ्खतेस?? " सरपंच काकांनी प्रेमाने विचारलं
"8 महिने झाले काका ." मीतू
" किती?? " सरपंच
मीतू ने चमकून वर पाहिलं आणि परत मान खाली घालून म्हटलं , " 8 "
" बेटा तुम्ही परत केव्हा भेटणार आहात? " सरपंच
मीतू ने वर पाहिलं...सरपंचाच्या डोळ्यात पाणी होतं.
मीतू ला काही कळेना. बाबांनी पण डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न केला.
" एक मिनिटं , काय झालं?? असे काय बोलताय सर्व तुम्ही??" मीतू
कामत काका पुढे आले, " मीतू मी काय सांगतोय ते कान उघडे ठेवून ऐक नीट ! तुझा काही गैरसमज होतोय कदाचित, कारण ज्या अंशुल च्या तू प्रेमात आहेस असं म्हणते आहेस , तो अंशुल 8 महिन्या पूर्वी च एक बाईक अपघातात आपल्याला सोडून गेलाय कायमचा ! "
" काका ???? " मीतू जोरात किंचाळली
ती अचानक पॅनिक झाली , अंशुल ला फोन करायला नंबर शोधू लागली , पण नंबर नव्हता त्यात, वॉट्सअप्प चे मेसेज पाहिले ते ही नव्हते त्यात... काय होतंय , नक्की????? मीतू ला चक्कर अली.......

बऱ्याच वेळाने तिला शुद्ध आली. आई , बाबा , कामत काका जयवंत पाटील सगळे रडत होते... दरवाज्यात अंशुल उभा होता...
मीतू झपाट्याने उठली , " बघ न , अंशुल काय बोलतायत सगळे , तू गेलास वगैरे सांगतायत मला बघ न, हसतो काय आहेस , सांग न यांना... बघ ना......... "
" मीतू नीट बघ ते का रडतायत" अंशुल चा आवाज खूप खोल गेलेला
बाहेर ऍम्ब्युलन्स आलेली ,आणि स्ट्रेचर वर मीतू च प्रेत ठेवलेलं......
" ज्यांची इच्छा पूर्ण नाही होत ना , ते आत्मे भटकतात मीतू... भूत.... oops आत्मे अस्तित्वात असतात ! ".....

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle