अलकोलचा( नवलकोल) पळवा

अलकोलचा( नवलकोल) पळवा

aalkol.jpg

साहित्य: 12/ 15 नवलकोलची पाने, दोन टीस्पून चिंच कोळ, दोन टीस्पून गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी ओलं खोबरं,कोथिंबीर

alkolll.jpg

कृती: नवलकोलची पानं स्वच्छ करून पुसून घ्यावीत. त्याच्या मधल्या शिरा काढून घ्याव्या. चिंच पाण्यात भिजवून कोळ काढावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. तीन वाट्या पाणी घ्यावं. त्यात गूळ, मीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद घालावं. चव बघावी. आता भाजणी मिसळावी. पीठ पानावर पसरून लावता येईल इतपतच सैल करावे.

aa11.jpg

लागल्यास पाणी घालावे. नवलकोलचे पान उलट करावे. त्यावर पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवावे. अशी चार पाच पाने उलट सुलट ठेवून पीठ लावावे. समोरची बाजू आणि कडा आत दुमडून परत पीठ लावावे.

alkkol.jpg

आता वडी घट्ट गुंडाळून घ्यावी.

aallkol.jpg

मोदकाप्रमाणे 20 मिनीटं वाफ काढावी.

alkoll.jpg

उंडे छोट्या चौकोनी फोडी करून चिरावे. कढईत तेल तापत ठेवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे तिखट घालून त्यात चिरलेल्या नवलकोलवड्या घालाव्यात

aaalokl_0.jpg.

ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी. छान परतावं. तयार आहे नवलकोलचा पळवा!

alkol.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle