क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते.

मला वाटतं ह्या कलेचा शोध गरजेतुन लागला असेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा तयार कापडाची एवढी मुबलकता नव्ह्ती तेव्हा कापडाचा एखादा लहानसा तुकडा ही फेकुन देववत नसेल .कापडाची चिंधी न चिंधी वाचवण्याच्या उद्देशानेच ह्या कलेचा जन्म झाला असेल. तसेच पाश्चिमात्य देशात जिथे खूप थंडी असते तिथे पांघरुणं अधिक उबदार करण्या साठी सुद्धा ही कला विकसित झाली असेल कारण वर एक कापड मध्ये एक आणि आतल्या बाजुला एक अशी तीन पदरी जाड पांघरुणं ह्याने तयार करता येतात.

काळाच्या ओघात आता खूप बदल झाले आहेत, कपड काटकसरीने वापरण्याची गरज आता उरली नाहिये . अखंड कापडाचे तुकडे कापून ही क्विल्टिन्गची हौस करता येते. आपल्याकडे सामन्यतः लहान मुलांची दुपटी क्विल्टिन्ग ने अशी केली जातात पण परदेशात मोठ्या मोठ्या आकारात ही केली जातात. ह्यासाठी तिकडे क्लासेस ही असतात. असं ही वाचलय की तिकडे मुलगा /मुलगी जेव्हा शिक्ष्णासाठी घरा बाहेर पड्ते तेव्हा आई / आजी स्वतः शिवलेली प्रेमाची उब असणारी अशी एक क्विल्ट मुलाला भेट देते.

क्विल्टिंग ने निरनिराळे देखावे, माणसांचे चेहरे वगैरे ही तयार करतात पण ती एक खूप कौशल्याची गरज असलेली वेगळीच शाखा आहे. पहिल्या महिला भारतीय डॉ आनंदीबाई जोशी याना ही ह्याची आवड होती . त्यांनी केलेली अशी तुकड्यांची गोधडी पुण्याच्या राजा केळकर वस्तु संग्रहालयात पहायला मिळते. तुकडे जोडण्याची कला आणि आनंदी बाई ह्या दोन्हीतही तेवढाच रस असल्याने मी पुण्याला गेले की ही गोधडी बघुन येतेच.

ह्या साठी मुख्यत: तीन गोष्टी लागतात एक म्हणजे. कापड कापण्यासाठी पिझ्झा कटर सारखं दिसणार रोटरी कटर, कात्रीने एवढे तुकडे एक सारखे कापण शक्य होणार नाही . तुकडे सारखे कापले जाण्यावरच पुढचं यश अवलंबून असतं. ह्यासाठीच मिळणारी एक पट्टी आणि एक प्लॅस्टिक चा कटिंग बोर्ड. एवढया तीन बेसिक गोष्टी असल्या की कापडाचे एक साईजचे तुकडे करणं सोपं जातं. परदेशात रंगीबेरंगी कापडाचे असे तुकडे किंवा अशा एका साईजच्या पट्ट्या ही बाजारात आयत्या विकत मिळतात, पण आपल्याकडे मात्र नाही मिळत .

माझ्याकडे वरील तिन्ही गोष्टी असल्या तरी शिवण मशीन नसल्याने मला काही करता येत नव्हतं. शेवटी मी हातानेच शिवायचं अस ठरवलं आणि कामाला लागले. पिन व्हील किंवा मराठीत भिंगरी चा pattern माझा आवडता असल्याने तोच करायचा अस नक्की केलं. त्याप्रमाणे हातानी शिवून लाल गुलाबी पिन व्हील तयार ही केली पण ती फारच एकसुरी दिसत होती. तसेच एवढी पिनव्हील हातानी करणं कठीण ही गेलं असतं म्हणून मग मध्ये दुसऱ्या रंगाचं काही तरी लावायचं ठरवलं. अस म्हणतात की क्विल्ट च 90% श्रेय कापडावर अवलंबून असत.त्यामुळे कापड घेताना मी पण confused आणि doubtful होते. क्विल्ट झाली की हे रंग कसे दिसतील ह्याचा ही असज मला येत नव्हता . म्हणून पिवळं निळं कापड कसं लावू या म्हणून खूप डोकं चालवलं, खूप उसवा उसवी झाली. आणि सरते शेवटी एक पॅटर्न फिक्स केला.

वेळ मिळेल तेव्हा टीव्ही बघताना वैगेरे शिवणकाम राहिले आणि शिलाई मशीन नसताना ही हा क्विल्ट टॉप मी पूर्ण केला म्हणून खूप आनंदात आहे.

हा फोटो

IMG_20190329_235634_0.jpg

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle