खर तर मीच द्वाड :)

खर तर मीच द्वाड :)
रात्रीचे आठ - साडे आठ तरी वाजले असतील. आमचं अवाढव्य "शिप" पोर्ट मध्ये उभ होत पण आजूबाजूच्या शांततेमुळे धडकी भरत होती. आजूबाजूच्या पाण्यावर काळोख तर होताच पण पाण्याचा डुबुक डुबुक असा अधून मधून येणारा आवाज चांगलाच अस्वस्थ करत होता. एक प्रकारची वातावरणात निरव शांतता होती आणि त्या अपुर्या प्रकाशात आम्ही शिप ला लावलेल्या तात्पुरत्या जिन्यावरून आमची दिवस भरात केलेली खरेदी ( दोन अवाढव्य बॅगा ) शिप वर चढवत होतो. एक प्रकारे खूप मुश्किल काम आणि घाम काढणार काम होत ते. पण नेटाने आम्हाला करण भागच होत. इतकी आम्ही त्या जिन्यावर बॅगा चढवण्यासाठी झटापट करत होतो तरी सुद्धा आजूबाजूला आम्हाला बघणारा एकही मनुष्य आसमंतात कुठेच दिसत नव्हता. काहीतरी प्रचंड गूढच वातावरण होत ते. शेवटी त्या झटापटीत आम्ही यशस्वी झालो शिप वर आमच्या बॅगा चढवण्यात पण आणि त्या आमच्या केबिन पर्यंत नेण्यात पण.

दिवसभर हॉंगकॉंग मध्ये अगदी शब्दशः " गरा गरा "भटकत होतो. आजवरच्या माझ्या आयुष्यात मी जितकी खरेदी केली नसेल तितकी खरेदी त्या एकाच दिवसात केली होती म्हणून तर एवढी प्रंचंड खरेदी ठेवण्यासाठी बॅगा विकत घ्याव्या लागल्या . केबिन वर आल्यावर कसे बसे "मेस" मध्ये जाऊन जेवलो आणि जे मेल्यासारखे झोपलो ते दुसर्या दिवशी सकाळीच जागे .

आज मला शिप सोडायचं होत तर . शिप पुढच्या प्रवासाला जाणार होत पण मला हॉंगकॉंग मध्ये सोडून.मी परतीच्या प्रवासाला जाणार होते. संध्याकाळच पाच-साडे पाचच डिपारचर होत. पण सकाळ पासून तो पर्यंतचा सगळा वेळ बॅगा भरण्यातच गेला. मी काय काय न्यायचं. काय न्यायचं नाही हे ठरवण्यातच आणि त्या प्रमाणे ब्यागांची उचका उचकी करून मी न्यायच्या बॅगा तयार करण्यातच. चार वाजता कंपनीचा "एजंट" येउन मला घेऊन जाणार होता आणि शेवटी ती वेळ आलीच . एक्झाक्ट चार वाजता "एजंट" आला आणि मला घेऊन त्याने शिप सोडलं.पोर्ट च्या अगदी जवळ असलेल्या 'फाइव्ह स्टार" हॉटेल मध्ये मला व्यवस्थित सेटल करून " उद्या सकाळी नऊ वाजता येतो. तयार रहा" अस सांगून तो निघून गेला.आत्ता या पुढे "मी" म्हणजे त्याची जबाबदारी होते . हॉटेलच्या रूमवर आले आणि खिडकीचे पडदे सारले. खिडकीतून सगळा पोर्ट चा परिसर दिसत होता. मनात आल तिथेच कुठेतरी आमची शिप उभी असेल आणि आत्ता निघेल सुद्धा.आणि तेवढ्यातच शिपचा तो भोंगा ऐकायला आला . आता आमच शिप निघणार तर. एक प्रकारची हुरहूर उदासी वाटायला लागली. अगदी डोळ्यातून पाणीच आलं . या शिप वरच मागचे तीन महिने मी काढले होते ना

बऱ्यापैकी उदास उदास वाटत होत पण कालच्या " गरा गरा " फिरण्यामुळे आणि आज सकाळ पासून बॅगा भरण्यात इतका वेळ गेला होता कि दमायला पण झालं होत . झोप येत होती. डोळे जड झाले झाले . .इतकी दमले होते - इतकी दमले होते कि जी ताणून दिली ती एकदम रात्री नऊ वाजता जाग आली ती थोडी भुकेची जाणीव झाल्यामुळेच . मग काय आमची स्वारी हॉटेलच्या कॅफेटेरियामध्ये . माझ्या योग्य ( व्हेज ) काय असेल त्याचा अंदाज घेत घेत मेनू वरच्या पदार्थांवर बोट ठेवत ठेवत ओर्डर केली आणि जो समोर पदार्थ आला तो खाऊन परत रूमवर.

सकाळी लवकरच जाग आली. नऊ वाजता एजंट येणार होता . सगळं आवरून झाल्यावर पहिलं "लगेज" मला हॉटेलच्या लाऊंज मध्ये पोचवायच होत म्हणून फोनच्या यादीत बघून बघून मला जो नंबर योग्य वाटला तो फिरवला आणि काम सांगितलं . हॉटेलचे कर्मचारी येउन लगेचच "लगेज" घेऊन गेले आणि मी खाली लाउंज मध्ये आले. खाली आले तर खरी पण लगेज? लगेज कुठेच दिसेना. अरेच्या गेल कुठे ? धातीत धस्स का काय म्हणतात ते झाल . हार्ट बिट्स चांगलेच वाढले . काउंटर वर जाऊन चौकशी केली तर माझ इंग्लिश त्यांना समजेना आणि त्यांची भाषा आणि त्याचं तोडक मोडक इंग्लिश मला समजेना. एकमेकांना समजून घेण्याचे अक्षरशः पराकोटीचे प्रयत्न केले पण व्यर्थ. शेवटी काउंटर वरच्याने नीट इंग्लिश बोलता येणाऱ्या कर्मचार्याला बोलावण धाडलं पण तो पर्यत मी अस्वस्थच. अरे बापरे. काय हा प्रोब्लेम ? विचित्र. आत्ता काय करायचं ? चांगलीच विचारातच पडले तेवढ्यात लांबून "एजंट" येताना दिसला आणि मला सोन्याचा का काय तो हार मिळाल्याचा आनंद. धावत जाऊन लगेच त्याला माझी "गमंत" सांगितली. हो खरच गंमतच होती ती. नाहीतर काय .एजंटना नेहमीच चांगलं इंग्लिश येत असत त्यामुळे त्याने त्यांच्या भाषेत बोलून फटाफट सगळी सूत्र फिरवली आणि पाचच मिनिटात माझ " लगेज" माझ्या समोर हजर केल . "लगेज" बघितल्यावर इतका आनंद झाला - इतका आनंद झाला म्हणून सांगू . तो म्हणाला "ग्रेटच आहेच तू. ते लगेज चक्क "गो डाऊन "मध्ये पोचत केलस तू .कमालच आहे ". अच्छा म्हणजे असा घोळ झाला होता तर . पण काय करणार म्हणून गप्पच बसले .

ह्या सगळ्या घोळात जरा जास्तीच वेळ गेल्याने हॉटेल सोडण्याच्या सगळ्या फोर्मेलिटीझ पटापट आवरल्या आणि एकदाचे एयरपोर्ट वर जायच्या टॅक्सीत बसलो. टॅक्सी सुरु झाली आणि एक दोन च मिनिट पुढे गेली नाही तो काय जिवाच्या आकांताने मी ओरडायला लागले " स्टॉप - स्टॉप . एजंट माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला . अरे हॉटेल च्या "रूमची चावी" माझ्या पर्स मध्येच राहिली होती . पर्स मध्ये "पासपोर्ट" आहे कि नाही ते शेवटचं चेक करायला म्हणून हात घातला तर काय "चावी" च हाताला लागली. अरे बापरे सरसरून काटा आला अंगावर. परत प्रश्नार्थक चेहऱ्याने बघणाऱ्या एजंट ला सांगितलं. त्याने मनातल्या मनात कपाळावर दहा -वीस वेळा तरी हात मारून घेतला असेल नक्कीच . धावत जाऊन तो हॉटेल वर किल्ली देऊन आला आणि टॅक्सीत बसता बसता म्हणतो " आत्तापर्यतच्या माझ्या करियर मध्ये तुझ्या सारखी धांदरट बाई मी बघितली नाही " मनातल्या मनात मी पण म्हटलं " अरे माझ्या आत्तापर्यतच्या आयुष्यात फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये मी तरी कुठे राहिले होते आणि ती पण एकटीने ? स्वप्नात तरी वाटल होत का? होणारच अस " शेवटी आमची स्वारी सुखरूप हॉंगकॉंग एयर पोर्ट वर पोचली.

पण आत्ता मी विमान प्रवासाच्या बाबतीत "शेर" झाले होते ( येतानाही एकटीच आले होते ना ) त्यामुळेच एयर पोर्ट वर पोचल्या पोचल्या ताबडतोब एजंट ला बिचार्याला सांगितलं " आत्ता तू जाऊ शकतोस. करेन मी एकटी मॅनेज ."पण आत्ता पर्यंतचा माझा अनुभव बघता त्याला रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे तो गेला तर नाहीच पण अगदी एयरलाईन काउंटर वर "लगेज" देइपर्यत आणि "बोर्डिंग पास" हातात घेई पर्यत तो अगदी माझ्या बरोबर बरोबर राहिला . खर तर माझा स्वाभिमान का काय तो डीवचला गेला होता( हा हा ).मनातल्या मनात " अरेच्च्या आत्ता मी मॅनेज करेन की" . पण त्याला कशी खात्री देऊ ? शेवटी आत्ता या गेटच्या पुढे तो काही येऊ शकणार नाही अशी फायनली परिस्थिती आल्यावर मात्र त्याने मला नाईलाजाने सांगितलं "आत्ता तुझ तुलाच जायला पाहिजे" . मनातल्या मनात "अरे मी पण तुला तेच सांगत होते ना" ( बिचारा खर तर मीच द्वाड ) असो . मी बिनधास्त पुढच्या लायनीत लागले आणि पाठी वळून वळून त्याच्या कडे बघत होते. गेला का तो ? गेला का तो? दर वेळी मी पाठी वळून बघत होते आणि तो मला हात हलवून दाखवत होता. अरेच्या म्हणजे अजून गेलाच नाही का तो ? पण शेवटी ती वेळ आलीच .आत्ता मात्र मी या गेट च्या पलीकडे अंतर्धान पावणार आणि त्याला दिसूच शकणार नाही अशी परिस्थिती आल्यावर सुहास्य का काय ते वदनाने पाठी वळून आणि जोरजोरात हात हलवून मीच त्याला आश्वस्त केल आणि परतीच्या प्रवासातल विमानातलं पाउल टाकल :)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle