लेख

अशीही मानवता

मैत्रिणींनो सध्या सगळीकडे कोरोनामुळे वातावरण भीतीदायक आहे. अशात माझ्या सीए करणाऱ्या मुलाच्या सरांनी हजर व्हा न असं सांगितल्यामुळे नाईलाजाने त्याला पुण्याला पाठवावं लागलं. सध्या बाहेर मेसमध्ये फक्त पार्सलसेवा ती सुद्धा सात वाजेपर्यंत सुरू आहे त्यामुळे शक्यतो घरगुती डबा असलेला बरा म्हणून तो इथून जाण्यापूर्वी दोन्हीवेळा डबा लावला. नाश्त्याला भरपूर सुका खाऊ दिला. चहा, कॉफी वरण भात घरी करता येईल एवढी राईसकुकर वगैरे तयारी दिली.

Keywords: 

रंग माझा वेगळा - भाग शेवटचा

रंग माझा वेगळा - भाग शेवटचा

आयुष्य खूप छोटं आहे*
*हां हां म्हणता मृत्यू येईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल*

सकाळ सकाळी विराजने पोस्ट टाकली . अगदी सकाळ सकाळी

वा क्या बात है . तिने अंगठा दाखवला . आणि सकाळच्या कामाला लागली. आज सुट्टीचा दिवस रविवार . मस्त मजेत आळसाचा दिवस . खूप वेळ मेसेजवर बोलण्याचा दिवस .नेहमी प्रमाणे रविवारच आवरून वगैरे दुपारचा साडेअकरा -बारा वाजत तिने मेसेज केला

"मस्त चारोळी पाठ्वलीस रे सकाळ सकाळी "

." हो मुदामूनच तुला खुश करायला "

"थांब हा जरा मी गिरनार ग्रीन टी घेऊन येते . तुझ्यासारखा हॉट आणि स्वीट . मग माझ्याशी बोल"

Keywords: 

रंग माझा वेगळा- भाग ९

रंग माझा वेगळा- भाग ९

रविवार सुट्टीचा दिवस दोघांनाही त्याला हि आणि तिलाही

सकाळ सकाळीच विराजचा मेसेज . " निघी आय वॉन्ट टू हग यु " दोन मिनिटेच निधी जरा बघत बसली त्याच्या मेसेज कडे . असं काय हा ? डायरेकट हे काय ? लगेच पुढचा विचार आलाच " आजकाल अशी यंग मुलं अशी बरीच असतात बिनधास्त मित्र -मैत्रिणीकडे ह्ग मागणारी . त्यात काय एवढं ? बाऊ करण्यासारखं काही नाहीये." तिने मनाला समजावलं

आणि "थांब जरा . थोड्यावेळाने बोलते " असा मेसेज टाकून मोकळी झाली .

Keywords: 

फिरुनी नवी जन्मेन मी

काsssssय? आतापासून बरोब्बर चार तासांनी माझा मॄत्यू होणार? कसे शक्य आहे हे? काय झालेय काय मला? की मी काही गुन्हा केलाय म्हणून मला ही शिक्षा मिळणार आहे? काहीच कळेनासं झालंय. काय करु? कुणाला विचारु? कसले डॉक्टर हे मेले? असाध्य आजार असलेल्या रुग्णालादेखील तू लवकरच खडखडीत बरा होणार आहेस असं सांगितलं जातं आणि नखात रोग नसलेल्या, अजुन 'यौवनात' असलेल्या मला, तू चार तासांनी मरणार आहेस हे तोंडावर सांगून मोकळे? वेंटीलेटर नाही का हो तुमच्याकडे? निदान त्याच्यावर तरी जगवा मला आणि काही वेगळी ट्रीटमेंट देऊन वाट बघा, जर तुमच्यामते मी आजारी असेन तर. हे म्हणजे माझ्या नावाची सुपारीच दिल्यासारखं की !

Keywords: 

लेख: 

LCHF डाएट, मधुमेह आणि माझा अनुभव - भाग २

मला भात बंद करणे सहज जमले, परंतु चपाती एक तरी खायला हवी असे वाटायचे. पहिला दिवस एका चपातीवर निभावला. करून करायचे तर व्यवस्थितच करायला हवे (करून करायचे तर कच्चे का? अन माळ्यावर बसून अडचण क?) म्हणून मग चपाती ऐवजी भाकरी खावी असे ठरवले. एका जेवणात अर्धी ते पाऊण भाकरी.

गव्हातले आणि ज्वारी, बाजरीतले कर्बोदकांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास ते सारखेच आहे हे तपासल्यावर चौथ्या दिवसापासून मी भाकरीपण पूर्णपणे बंद केली.

सुरुवातीचे तीन महिने पूर्णपणे वर्ज्य केलेल्या गोष्टी :

चपाती
भात
मैदा
गोड पदार्थ (कोशिंबीरसुद्धा
बिन साखरेची)
भाकरी
कडधान्ये
डाळी
बीन्स
मटार
मका (दाणे, पीठ)

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle