बुकक्लब

मैत्रिणींनो,

आपल्या सर्व जणींचं आयुष्य प्रचंड बिझी असतं. मनात असूनसुद्धा पुस्तकं वाचायला जमत नाही. माझा एकेकाळी प्रचंड आवडायचं वाचायला. आता कित्येक वर्षात काही धड वाचलं नाहीये आणि त्याहून दुर्देव म्हणजे वाचायचा कंटाळा करायला लागल्ये मी.
हा बुक-क्लब काढायचा उद्देश हाच की काहीतरी चांगलं वाचायला आपण उद्युक्त व्हावं. वाचून त्यावर विचार-चर्चा व्हावी. एक-मेकींना वाचायला प्रोत्साहन द्यावं.
तर काय करूया? एका महिन्याला एक किंवा दोन पुस्तकं ठरवून त्यातलं हवं ते किंवा दोन्ही वाचून त्यावर इथे चर्चा करायची. असं माझ्या डोक्यात आहे पुस्तक-गप्पा म्हणा! कोणाला वेगळं काही सुचत असेल तर सांगा.
तर ऑक्टोबर करीता कुठलं पुस्तक घ्यावं, काही सजेशन्स?

वर
0 users have voted.