cord cutting...

आमची गेल्या काही वर्षात सीझन्ड कॉर्डकटर्स होण्याकडे वाटचाल चालली आहे. कॉर्ड कटींग म्हणजे केबल वगैरे बंद. आमचीही वाटचाल करण्यामागे दोन कारणे आहेत अर्थात. १) पैसे वाचवणे. २) आयुष्यातील noise  कमी करणे. सेन्सरी ओव्हरलोड कमी करणे.

इकडे अमेरिकेत विशेषतः केबल भयंकरच महाग आहे! ४०-५० $ पासून सुरवात होत १००-१५०-१८० $ असं कितीही वाढू शकते बील. ह्यामध्ये साधारण १० पासून २५०-४५० इतके चॅनल्स बघायला मिळतात.
सुरवातीची काही वर्षं आम्ही व्यवस्थित ४५०+ वगैरे चॅनल्सचे पॅकेज घ्यायचो. (कारण नीलसाठी स्प्राउट/निक ज्युनिअर, माझ्यासाठी टीबीएस, ब्राव्हो, एचजिटीव्ही, फुडटीव्ही, नवर्‍यासाठी सायफाय, आणि इतर सतराशेसाठ मुव्ही चॅनल्स ह्या सगळ्याची मोट बांधताना असेच पॅकेज हाताशी लागायचे.) पण ओव्हर द यिअर्स, आम्हाला दिसून आले की आम्ही  ४५०+ पैकी लिटरली १० ते १२ चॅनल्स पाहात असू. मग इतके पैसे का द्यायचे? असा विचार करत केबल पूर्णपणे काढून टाकली व आधीपासून असलेले नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम इतकेच ठेवले. इट वॉज वर्किंग आउट ओके. नवरा आधीपासून फक्त मुव्हीज बफ असल्याने त्याला इतकं बॉदर झाले नाही कारण नेटफ्लिक्स वगैरे तर अजून छान, जाहिराती नाहीत इत्यादी. नील तर काय आरामात युट्युबला शिफ्ट झाला. पण मला चॅनल सर्फ करत कधी होम गार्डन तर कधी किचन तर कधी कॉमेडी असे चॅनल्स आवडायचे. आपत्तीच्या वेळेस लोकल चॅनल्सची कमी जाणवायची कारण लोकल महिती मिळवणार कुठून? ऑफकोर्स गुगल करून वगैरे तर झालेच. पण टीव्ही नुसता ऑन केला की पटापट चॅनल्स लागणार - हा कंफर्ट आणि एकंदरीत पॅसिव्ह एंटरेटेनमेंटची कमी जाणवत होती. पण बिलिव्ह इट ऑर नॉट, काही महिन्यात ती सवयही गेली. आणि अर्थातच नेटफ्लिक्सवर मालिका बिंज करणे चालू झाले हे काही वेगळे सांगायला नकोय.

एकंदरीत टीव्ही हा इडीयट बॉक्स आहे हे मनाला पटत होते. कारण लिटरली वेळ हातातून निघून जाताना दिसत होता. मी हळूहळू बिंज वॉचिंग बंद करत आणले.  मी कधीच टीव्हीत तितकी रमणारी नव्हते. मी पुस्तकी कीडा होते. पण अमेरिकेतल्या सिरिअली पाहून मी खरंच टीव्ही पाहण्याच्या प्रेमात पडले होते. नील लहान असताना मला आठवतंय मी सकाळपासून My13 KCOP, किंवा TBS वर कॉमेडी सिटकॉम्स पाहणे हे माझे आवडते काम होते. अजुनही आवडते प्रकरण आहे. मूड सुधारण्याचा इन्स्टंट उपाय! नेटफ्लिक्सवर बर्‍याच सिरिअली पूर्णच्या पूर्ण सीझन्स हाताशी असणे हे भयंकरच खुष करणारे होते. पण जसं टीव्हीचे झाले तसेच नेटफ्लिक्सचे झाले. नील मोठा होत चालला तसा हाताशी वेळही पूर्वीइतका नव्हता, आणि टीव्ही पाहणे कमी होत गेले. मग एका सुंदर दिवशी आम्ही नेटफ्लिक्स बंद करून टाकले. ह्या सर्व्हीसेसचे एक बरे असते की काँट्रॅक्ट नसते. सो महिनाभर बंद करून बघू, फार मिस केले तर घेऊ परत अशा विचाराने बंद केले. (ते परत चालू केले नाही..) अमेझॉन प्राईम मात्र ठेवले कारण त्याचे बेनिफिट्स खूप दिसत होते. फ्री २ डे शिपिंग, प्राईम म्युझिक, प्राईम रीडींग इत्यादी.. कुणास ठाऊक तेही बंद करू. जानेवारीपर्यंत वेळ आहे विचार करायला.

रिकामा वेळ मिळाला तर मी पुस्तक वाचणे व निनादने पॉडकास्ट ऐकणे हे चालू केले. नीलचा ipad  व त्याचबरोबर युट्यूब/नेफ्ली  बंद करून त्याला केवळ गाण्याचे व्हिडीओज लॅपटॉपवर दाखवणे असे वीन करत आता बरेच बंद केले. भयंकर सेन्सरी ओव्हरलोड असलेल्या वातावरणातून असे जरा शांत बरे वाटायला लागले.

पण आगीचा मौसम आला. महत्वाच्या बातम्या कशा कळायच्या? तसेच कायमच काही पुस्तके वाचू नाही शकत. कधीतरी थोडा टीपी हवा कि.  मग थोडा शोध घेत गेलो. काही पर्याय आहेत का?  आणि बरेच चांगले व फुकटात रिसोर्सेस सापडत गेले .  ते इकडे नोंदवून ठेवते.

१) http://Locast.org - लोकल टीव्ही पाहण्याचा उत्तम मार्ग. ह्याचे app  आहे, वेबसाईट वर पाहता येते, कास्ट करता येते इत्यादी. युएसमधील १५-१६ सिटीत  अव्हेलेबल आहे. बरेच चॅनेल्स आहेत. लोकल टीव्ही, न्यूज, सिटकॉम्स, स्पोर्ट्स वगैरे बघता येतात. एकाच अनोयिंग  गोष्ट आहे कि सतत १५ मिनिटांनी ५$ डोनेट करा अशी ऍड येते. पण त्याला इग्नोर करायची सवय होत गेलीय आता. Wink
२) https://pluto.tv/live-tv/ - हे एक खूप सुंदर फुकट अँप आहे. ह्यात लोकास्ट सारख्या  अनोईन्ग ऍड येत नाहीत. मेजर चॅनेल लाईन अप नाहीये. पण काहि वेगळेच चॅनेल्स आहेत. जे एरवी बघितले नसते आपण. बघून बघून बहुतेक आवडायला लागेल.
३) https://tubitv.com - इथे बरेच मुव्हीज व टीव्ही शोज आहेत. फुकट.
४) https://corp.xumo.com/ - हे पण छान आहे.
फुकट.
५) https://www.sonycrackle.com/ ह्यात जाहिराती येतात अधून मधून. पण एरवी फुकट. टीपीला चांगले आहे.

अजून जे आठवेल तसे ऍड करत जाईनच. हॅव फन! & सेव्ह मनी. Wink

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle