माझे पुस्तकः Indian GuideBook: Pre and postnatal care in the USA . Tales of an Indian Granny

हाय मैत्रिणींनो
कश्या आहात? खूप दिवसांनी इथे येत आके. कारणही तसंच आहे.

Indian guidebook (1).jpg

मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते अमेझॉनवर इ-बुक आणि पेपरबॅक अश्या दोन्ही स्वरूपात अव्हेलेबल आहे.
Indian Guide Book: Pre and postnatal care in the USA
Tales of an Indian Granny

हे या पुस्तकाचं नाव आहे.
या पुस्तकात मी साधारणपणे तीन महत्वाच्या मुद्द्यांवर लिहायचा प्रयत्न केला आहे.
१)बाळंतिणीचा आहार: या साठी मी खास बाळंतिणीला देण्यात येणार्‍या काही पदार्थांच्या रेसिपीज, त्यांच्या औषधी गुणधर्मांसह दिल्या आहेत. शिवाय या पदार्थांचे, त्यातल्या घटक पदार्थांचे फोटो ही आहेत.
२)बेसिक शिवणः यामधे अगदी बेसिक शिवणाच्या महत्वाच्या टिप्स आहेत. रीसायकलिंग करून (किंवा नवीन कापड वापरूनही) साधं सोपं शिवण कसं करता येईल या बद्दल माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे.
३)बाळ व बाळंतिणीचे मालिश व अंघोळः या विभागात मालिशचे(याला पूर्वी अंगाला लावणे असं म्हणत.) महत्व, त्यासाठी कोणते आयुर्वेदिक प्रॉड्क्ट्स वापरावे व त्याचे उपयोग या विषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
याच बरोबर पुस्तकाचं सब टायटल "Tales of an Indian Granny" असं आहे. तेव्हा माझ्या मुलीच्या बाळंतपणात अमेरिकेत मला आलेले अनुभव, काही तिथल्या नवीन गोष्टी, पद्धती याबद्दलही बर्‍याच गोष्टी वेळोवेळी येणार्‍या संदर्भानुसार या पुस्तकात सांगितल्या आहेत.
तसेच आपल्या पारंपारिक पद्धती, त्याचे अर्थ आणि महत्व याबद्दलही या पुस्तकात मला सुचेल तसं विवेचन केलं आहे. उदा. बारसं करतानाचे काही विधी, पद्धती आणि त्याची कारणं. थोडक्यात या प्रोसेसमधून जाताना जे काही विचार मनात आले, ते या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१६ मध्ये माझ्या मुलीचं बाळंतपण करण्यासाठी मी अमेरिकेला गेले होते. बाळंतपण झाल्यानंतर, बाळ दोन अडीच महिन्याचं झाल्यावर माझ्या लेकीने मला सुचवलं की, " आई तू माझ्या बाळंतपणासाठी काय काय प्लॅनिंग केलंस, भारतातून इकडे येताना कशी तयारी केलीस ते लिहून काढ. जर एखाद्या विषयावर लिखित स्वरूपात रेडी मटेरियल असेल तर त्याचा नक्कीच उपयोगच होईल."
आता "कोविड"मुळे सगळंच बदललं आहे. पण भारतातील "IT boom" मुळे परदेशी जाणार्‍यांची संख्या वाढत गेली. आणि मग "आपल्या लेकीसुनांच्या बाळंतपणासाठी परदेशी जाणार्‍या आया/सासवा " हेही चित्र हळूहळू कॉमन होत गेलं. म्हणूनही हे पुस्तक मला लिहावंसं वाटलं.
तसं मी अधून मधून लिखाण करतच असते. इथल्या मला "मायबोली"पासून ओळखणार्‍या मैत्रिणींना माहिती आहेच!
सगळ्यातआधी मी "बुकगंगा" वर "अमेरिकेतलं बाळंतपण" हे मराठी पुस्तक लिहिलं ते २०१७ मधे प्रकाशित झालं.
मग लेकीने पुन्हा इंग्रजी आवृत्तीसाठी सुचवलं. नॉन मराठी लोकांनाही वाचता आलं तर त्यांनाही या पुस्तकाचा उपयोग होईल या विचाराने मग भाषांतराची खटपट केली.
आधी Kindle Direct Publishing(KDP) वर अकाउंट उघडून मी स्वता:च माझं इ-बुक फॉरमॅट केलं आणि प्रकाशित केलं.
नंतर मात्र प्रकाशकांच्या मदतीने पेपरबॅकही प्रकाशित केलं.
या पुस्तकाचं कव्हर मी स्वता:च केलं आहे. आणि आतली चित्रं माझ्या सुनेने(गंधाली) काढली आहेत.
जरी पुस्तकाच्या नावात "USA" असलं तरी हे पुस्तक माझ्या मते भारतातल्या भावी माता व त्यांच्या माता यांनाही उपयुक्त आहेच.
इथल्या मैत्रिणींना जर हे पुस्तक उपयोगी पडलं, आवडलं तर मला खूप आनंद होईल.
इथे मी पुस्तकाच्या लिंक्स देत आहे. बहुतेक या लिंक्स उघडता येतील .......!

Clever Store: https://www.cleverfoxpublishing.com/product/indian-guide-book-pre-and-po...

Amazon.in: https://www.amazon.in/dp/B0968QNSKX?ref=myi_title_dp

Google Play: https://play.google.com/store/books/details?id=5_ExEAAAQBAJ

Google Book: https://books.google.co.in/books?id=5_ExEAAAQBAJ&newbks=0&hl=en&source=n...

Goodreads: https://www.goodreads.com/review/new/58293739-indian-guide-book
मराठी पुस्तकाची ( इ-बुक)लिंक
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=061017121754&P...

मला सांगायला फार आनंद होतोय की या पुस्तकाला पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉ आणि लेखिका, फिट्नेस एन्थुझिअ‍ॅस्ट डॉ. लिली जोशी यांचे प्रस्तावना लाभली आहे. त्याप्रमाणे अमेरिकेतल्या वॉशिन्ग्टन डीसी येथील डॉ. अशोक रट्टीहळ्ळी यांनीही या पुस्तकाबद्दल चार शब्द लिहिले आहेत.
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. पुस्तकातले फोटो , पदार्थांचे व काही इतर हे इ-बुकमधेच पहाण्यात मजा आहे. कारण डि़जिटल मीडियममधे फोटोतले रंग आणि सगळंच खूप उठून दिसतं. पण पेपरबॅकमधे हेच फोटो कृष्णधवल दिसत असल्याने "मजा थोडा किरकिरा हो जाता है!" पण पेपरबॅक रंगीत ठेवायचं असल्यास त्याची किंमत अव्वाच्या सव्वा येत होती. हे सर्वांना माहिती आहेच. म्हणून पेपरबॅक कृष्णधवलच करायला लागलं.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle