इन्क्टोबर (Inktober 2021)

येत्या ४ ५ दिवसातच तोच तो आपला लाडका ऑक्टोबर सुरु होतोय आणि २०१८ पासुन मैत्रिणवर दर ऑक्टोबरला इन्क्टोबरचे वारे वाहतायत त्यालाच अनुसरुन यंदा ही ती प्रथा पाळावीच लागेल ना Biggrin
पण ही प्रथा जाचक नाही हा नवनिर्मितीचा आनंद देणारी, उत्साहाने भारलेली अशी प्रथा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तयार आहात ना इन्क्टोबर चॅलेंज साठी?? आपापली आयुधे तयार ठेवा बघू.. म्हणजे आपले स्केच बुक, पेन्स, ईन्क्स, ब्र्श ई... ३१ ऑक्टोबर पर्यंत धम्माल करु.

इन्क्टोबर म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडला असेल तर खाल्च्या लिंक्स वर फेरफटका मारा.

इन्क्टोबर (Inktober 2020) https://www.maitrin.com/node/4380
इन्क्टोबर (Inktober 2019) https://www.maitrin.com/node/3845
इन्क्टोबर (Inktober 2018) https://www.maitrin.com/node/3126

ही यावर्षीची प्रॉम्प्ट लिस्ट
2021promptlist.jpg
लै भारी भारी प्रॉम्प्ट हैती Sheepish-laugh ३० सप्टेंबरपर्यंत डोके खाजवायला तितकाच वेळ मिळेल. Haahaa 2
यानुसारच केले पाहिजेत असे काही नाही पण केले तर मस्त!!

चला मग भेटूया १ तारखेला Thumbsup

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle