Neurographic Art

हाय मैत्रिणींनो,

शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं? Bigsmile Haahaa 2
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?

तर ही आहेत Neurographic चित्रे !!
या चित्र पध्दतीचा शोध २०१४ मध्ये रशियन सायकोलॉजिस्ट आणि क्रियेटीव्ह entrepreneur 'Pavel Piskarev' याने लावला. Neuro म्हणजे brain आणि graphic म्हणजे image यावरुन ह्याचे नाव Neurographic ठेवले गेलं. Neurographica is the method of creating mind and body connections through a combination of art and psychology.

मुळात या चित्र पध्दतीचा शोध आणि विकास एक आर्ट थेरपी म्हणूनच केला गेला. अनेक रेषा, बिंदू आणि त्यांचे जोडकाम करत असताना तुम्ही आत्ममग्न होत जाता... तुमच्या अंतर्मनाशी जोडले जाता... म्हणजे ह्या चित्रांचा उद्देश तोच आहे. बाह्यमनाचा अंतर्मनाशी संवाद असं म्ह्णू शकतो.
हे आर्ट थेरपी तंत्र वापरुन लोकांना त्यांच्या भावनांशी ते नेमके जोडले जातायत असा अनुभव येतो. ही चित्रे मेडिटेशन म्हणून ही काढली जातायत.
शोधकर्त्याच्या शब्दात सांगायचे झालं तर

NeuroGraphics - do-it-yourself positive changes.
NeuroGraphics is a creative method of transforming the world. You can draw everything. Lines of action, patterns of life circumstances, trajectories of movement in time, graphic solutions to complex communication problems... Draw and redraw, removing internal restrictions accumulated over the years of life. Create your own drawing, harmonizing it in such a way that the Universe will accept it as an instruction for use.
Through this unique art method, the dormant neuro connections get activated and energy starts flowing through them changing the way we think and act. It allows us to process negative emotions, anger, fear, and insecurity transforming them into self-love, self-worth, improving relationships, setting intentions, and much much more.

तर एकूणात काय असा चित्र प्रकार वापरून आपण थोडे निवांत होऊ शकतो. आपला ताण कमी होण्यास मदत होऊ शकते, तर वेळ मिळेल तेव्हा काढून बघायला काय हरकत आहे.

सगळ्यात मस्त गोष्ट आहे की ही चित्रे काढायला अगदी सोपी आहेत. कोणीही म्हणजे अगदी कोणीही ज्याला चित्रं काढायला अज्जिबात जमत नाहित ती व्यक्ती ही अशी चित्रे आरामात काढू शकते. पेन, कलर पेन्सिल, जलरंग, कलर ईंक्स, स्केच्पेन्स, ब्रशपेन्स तुमच्या कडे जे आहे ते साहित्य वापरुन काढू शकता. एका बैठकीतच चित्र पूर्ण व्ह्यायला पाहिजे असं ही नाही. तुम्हाला वेळ मिळेल तस तसा पुर्ण करा.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमचे चित्र पुर्ण होते त्या चित्रातून प्रत्येकाला दिसणारे अर्थ, आकार अगदी वेगवेगळे असतात. ते शोधणे, दिसणे मजेची गोष्ट आहे. :)

सो मि वर #NeurographicArt करुन शोधलं तर तुम्हाला खुप चित्रे बघायला मिळतील.

आता ही चित्रे नेमकी कशी काढावीत ह्यासाठी हे व्हिडियो बघा
https://www.youtube.com/watch?v=NoIgdt-uQR0

https://www.youtube.com/watch?v=p4bTnRqUNSM

हा मी केलेला प्रयत्न
106_0.jpg

मी प्रयत्न करणार आहे आठवड्याला एक चित्र तरी काढावं. तुम्ही पण काढणार ना माझ्या सोबत? Smile

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle