भटकंती -११ कच्छच रण

भटकेपणा पक्का मुरलेला आहे माझ्यात. अन वर्ष सहा महिन्यातल एखादं भटकण काही मनाला पुरेस वाटेना. आणि अचानक धनलाभ म्हणतात तसा अचानक सायकल लाभ झाला मला. एका मैत्रीणीची, तिला उंच वाटणारी सायकल उर्फ रेड रायडींग बडी उर्फ रामप्यारी माझ्या घरी आली. It is said Car is too fast and walking is too slow , so cycling is the best way to see the world! रामप्यारी बरोबर ते अगदी पटायला लागल! पुणं चाकाक्रांत करता करता सिमोल्लंघनाचे वेध लागले. २०२१ च्या दसर्‍याच्या दिवशी कारला सायकल लटकवून मी अन रामप्यारी नाशकात पोचलो.एका ग्रुप बरोबर नाशकाच्या आजूबाजुचे रस्ते फिरले, विनयार्ड्स पाहिली , वाईन टेस्टिंग केल. अडीच दिवसात सव्वादोनशे किमी भटकून झाल! अन जरा हुरुप आला.

cb4c73c9-9014-4bd6-84c9-c1b3ef4f9115.jpg

गोदावरी घाट

IMG_1570.JPG

नाशकाच्या पाण्याकाठी

02b8e36a-83fd-4b24-ab0a-ea2575f6e772.jpg

उन्हातान्हाची सायकल अन संध्याकाळी वाईन टेस्टींग

0cb50e17-9f88-4c76-babc-dbc29ae40af2.jpg

IMG_1635.JPG
हा मला सगळ्यात आवडलेला रुट. घोटीरोड !

IMG_1572.JPG

मी एरवी आपापली एकटी चालवते सायकल पण अश्या राईड्स ना ग्रुप बरोबर जाण्यात खरी मजा. पण समधर्मी हवा हा ग्रुप! सायकलवर का भटकायच याच उत्तर सेम हव! मला आजुबाजुला पहात थांबत फोटो काढत जायला आवडतं, डेस्टीनेशन बरोबरीनी प्रवास पण आनंददायी हवा!! नाशकातली राइड, हा माझा ग्रुप बरोबर जाणं जमतय का? आवडतय का,हे पहायचा पायलट होता! पण उत्तम जमलं, माझ्यासारखेच येडे जमा झालेले , असा स्पिकिंग व्हिल्स नावाचा ग्रुप होता हा. अन एकदा त्या 'ट्राइब' ची मेंबर झाल्यावर भटकेपणा पुण्याबाहेर वारंवार होणार याची खात्रीच पटली.

बकेट च्या ऐवजी मोठ्ठा बॅरल लिस्ट तयार व्हायला लागली. या लिस्ट मधे फार वर ,पण यंदा शक्य नाही अस एक ठिकाण होतं कच्छ च रण! सहसा जानेवारी शेवटचा आठवडा ,फेब पहिला आठवडा या दरम्यान असते ही राईड. माझा दोन वर्ष येउ न शकलेला लेक यायचा होता त्याच दर्म्यान! माझं चित्त, तो येणार त्याची तयारी , खादाडी लिस्टा, गेट टू गेदर्स ठरवणे यात होत .माझा पन्नासावा वाढदिवस एकत्र (लेकाबरोबर) करायचा हा मुख्य प्लान . एक्साइट्मेंट ची मोजदादच नाही. पण माशी , नव्हे करोना शिंकला. लेकाची प्रवासा आधी करायची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सगळच ओमफस्स! जरा सैरभैरच झाले मी. जरा जास्तच. मग त्या तिरीमीरीत ,ही कच्छ ची राईड ,जी पुढच्या ५ दिवसात होती तिच्यात जागा शिल्लक आहेत का विचारल. (परत एकदा) करोन्याच्या च करणीनी एकाचं जाणं रहित झाल होतं तिकडे माझी वर्णी लागली. मी मला दिलेल हे माझ्या पंनाशीच गिफ्ट! राईड टू रण ऑफ कच्छ!

तिरीमिरीत खरतर काही करु नये, अश्या राइड्स तर नक्किच नाहीत. पण जरा डोकं टिकाणावर आल्यावर लक्षात आलं ते. भुज ते भुज अशी राईड होती. त्यामधल सगळ ( सपोर्ट व्हेईकल , जेवण खाण ,रहाण) ,ऑर्गनाय्झर ग्रुप करणार होता. म्हणजे मला तातडीनी ;मला स्व्तःला अन सायकल ला भुज पर्यन्त नेण्याची व्यवस्था करणं भाग होतं . सायकल सर्व्हिसिंग करुन आणली . मुंबई कांडला फ्लाईट च तिकिट काढल .पुण्यातल्या सगळ्यांच्या सायकली टेम्पोमधुन पाठवायच ठरलं होतं . तिकडे सायकल पोचती केली . अन मग इतर जमवाजमव सुरु केली . लेकाच्या येण्याच रहित होण , अन आजूबाजूला ज्या वेगानी करोना फैलावत होता, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध मला प्रचंड अनिश्चितता वाटत होती. इतकी की नवरा ,लेक वगळता कोणालाही मी या राईडबद्दल बोलले नव्हते. तरीही माझ्या घट्ट मैत्रीणींना लागलीच खबर अन लेक नाही तरी आम्ही आहोत म्हणून सर्प्राइज दिलं वाढ्दिवशी , मला चांगलच ओळखून असल्यानी, सायकलींग अन या येणार्‍या राईड्ला उपयोगी वस्तु ,इतर गिफ्ट्स बरोबरीनी दिल्या. मळभ जरा हटल मनावरच .

7E2B44F9-456B-410C-9920-892F9A701168.jpg

हे त्यागिफ्ट्स पैकी सगळ्यात आवडलेल!!

बाकी तयारी म्हणजे सायकलींगचे वगळता लागणारे किरकोळ कपडे गोळा करुन घेतले कारण सायकल बरोबर, रायडींगचे कपडे चार दिवसाचे चार रोल करुन , हेल्मेट , राईड्च्या वेळी लागणारे इलेक्ट्रोलाइट सॅशे , स्पेअर ट्युब्स, पंक्चर किट्स हे सगळ टेम्पोमधुन पुढे पाठवल होतं .
IMG_0633.jpg.

टेम्पोमधे लोड केलेल्या सायकली अन सामान .

मुंबईला जाउन फ्लाइट बोर्ड करेपर्यंत मला करोन्याच्या अपरंपार कर्तॄत्वाची धास्ती होती. ती अगदी शेवटी कांडला खाडी खाली दिसल्यावर हळूहळू विरुन गेली.
IMG_2583.JPG

एस्टी स्टॅड पण मोठा असेल अस विमानतळ! अन हातात मारे प्रिंट काढुन तयार कोव्हिड टिकाकरण सर्टीफिकिट , पण ते चेक करायलापण कोणी नाही असा माहौल. आम्ही टॅक्सी करून भुज च्या दिशेनी निघालो. गेल्यावर पहील काम म्हणजे टेम्पो अनलोड करून आपापल्या सायकली असेंबल करणे. या ग्रुपचा हा एक अलिखित नियम आहे. सायकलच काम आपापल करायच. मदत करणारे , तांत्रीक सल्ले देणारे असतात पण आपापले हात काळे करायचे .
IMG_0661.jpg

भुजला स्वामीनारायण विश्रान्तीग्रुह या अत्यंत साध्या पण उबदार ठिकाणी रहायच होतं त्या दिवशी! आत हे सुंदर मंदिर, अत्यंत सात्विक वातावरण ,अन सात्विक बिना कांदा लसणीच जेवण.

IMG_0662.jpg

सायकली असेंबल केल्यावर एक ट्रायल राईड करुन मिनी भुज दर्शन केलं जडेजांचा राजवाडा पाहिला , वाटेत दिसणारं जुन भुज , भुकंपाच्या खुणा असलेलं वाळूच्या रंगाच भुज,
IMG_0632.jpg

IMG_2595.JPG

IMG_2606.JPGIMG_2591 2.JPG

परत आल्यावर संध्याकाळी , उद्या काय ? बाकीचे रायडर्स कोण कोण आहेत ( म्हणजे सायकल चालवत नसतात तेव्हा काय करतात ) अश्या गप्पा झाल्या. स्वामिनारायण विश्रांतीगॄहातली बेस्ट खिचडी कढी खाल्ली! अन गुडुप झोपलो. थंडी असण अपेक्षित होतं पण तिचा काय पत्ता नव्हता. सकाळी ए बी सी चेक करुन सवार्‍या निघाल्या! ए- एयर ( हवा चेक करणे) बी - ब्रेक . सी -चेन

भुज पासून उत्तरेच्या दिशेनी सुरु केला प्रवास. सकाळी किंचीत गार हवा . सुंदर रस्ते हळूहळू शहर मागे पडायला लागल

IMG_2630.JPG
निळशार आकाश , मातकट लँड्स्केप , काळ्या रस्त्यांच्या रिबीनी अन त्यावर ही रंगीत माणसं

हा ब्रिज लागला मधेच . अन त्या खालच्या नदीपात्रात त्याची सावली अन त्यातले आमचे ठिपके पाहून फोटोचा मोह आवरला नाही.
IMG_0636.jpg

मग वाटेत असे काही नजारे टिपत सापकल्च्या पेडलींग चा आपल्या श्वासाचा अन डोक्यातल्या विचारांचा मेळ बसायला लागतो! अन जी काय तंद्री लागते ! आहा!

अशी भटी जमल्यावर या भटीतला चहा मिळाला वाटेत तर मज्जाच.

IMG_0666.jpg

तर पहिल्या दिवशी पहिले ५० किमी नखतराना - लोरिया रोडनी निरोना नावाच्या गावी गेलो. हे कारागीर लोकांच गाव. तिथे रोगन आर्ट नावाचा कलाविस्।कार पाहिला. वाटेत रस्ताभर दिसलेल्या एरंडाच्या उंचच उंच काड्यांची शेतं दिसली होती . त्याच एरंडेल महिनाभर ,उन्हात गरम करुन सावलीत गार करुन जेल स्वरुपाच करतात. याचे गोळे हा कच्चा माल. त्यात नैसर्गिक रंग मिसळून हातावर मळून , हाताच्या उष्ण्तेनी जरा तार येईल अस प्रवाही करतात. अन कोणतही स्टेन्सिल न वापरता , फ्रेमवर ताणुन बसवलेल्या कापडावर , डिझाइन काढतात. मेंदी काढतो तस काहीसं हे प्रवाही जेल परत सेट व्हायच्या आधी , कापड दुमडून /दुसरं कापड त्यावर ठेउन , रेप्लिकेट करतात. ही पिढ्या न पिढ्यांची कला वारसा म्हणून मिळालेले अब्दुल गफुर खत्री यांनी भरपूर प्रयोग करुन , या कलेला एक वेगळ्या स्तरावर पोचवल. प्रसार केला . त्याना या योगदानाबद्दल पद्मश्री नी स्न्मानीत केल गेल . त्यांच्या पुतण्यानी आम्हाला प्रात्यक्षिक करुन दाखवल . स्टोल, दुपट्टे, फ्रेम करता येतील अश्या कलाकॄती . डोळ्याच पारणं फिटल.

IMG_2637-1.JPG

IMG_0664.jpg

यानंतर त्याच गावातल्या घंटा बनवणार्‍या लोहाराकडे गेलो. ३ ठरावीक साइझ चे पत्र्याचे ( अलॉय्/ पितळ /तांबं ) तुकडे घेउन अगदी जुजबी अवजारांच्या सहाय्यानी त्यानी घंतेचा सिलेंडर , वरचा गोल सेमीस्फिअर्,अन अडकवायची कडी बनवल. कडा एक्मेकात गुंतवण ं , सपाट पत्र्याचा घुमट बनवणं हा घुमट अन सिलेंडर एक्मेकाना फिक्स करणं हे सगळ निव्वळ अवजारांच्या सहाय्यानी. दहा ते बारा मिनीटात हे होताना पाहाणं भारीच होतं .

2D699FE8-D1D5-48D7-8646-EDFF699D0EEF.jpg

या बनलेल्या घंतेच्या आत एक लाकडी लोलक लावतात. पण घंटेचा आवाज बद्द्ब्द्द येत होता . या घंटा मग वाळू एक ठरावीक माती अन एरंडाचा पाला घेउन भटीत टाकतात. कार्खान्यात सर्फेस ट्रीट्मेंत करतात तसच वाटल मला. कारण त्या घंटा , मग एकदम चकचकीत झाल्या अन ३ जोडलेल्या पट्या न रहाता एकसंध होउन आल्या बाहेर अन आवाज पण मस्त किणकिण.! खरी कमाल तर या पुढे होती. या फोटोतल्या कारागिराच्या आजोबांनी खास छिन्नी घेउन नाजुक हातानी असे काही ठोके मारले घंटेवर की ती सुरात गायला लागली . सरगम करुन दाखवली त्यांनी अन म्हणे तुला ह्व्या त्या सुराची बनवतो घंटा! ही पण एक वारश्यानी आलेली कला. घंटेचे लोहार खास सुराच्या कानाचे असतात! आजूबाजुच्या गायी गुरं , शेळ्या मेंढ्यांचह्या कळपांचे खास ठरलेले सुर असतात! लांबूनही कळपांचे कानोसे कळावे म्हणून. अन हे कळपमालक आपापली फॅमीली घंटा घेउन येतात. अन हे घंटीवालेलुहार त्याना नव्या घंटा त्याप्रमाणे ट्युन करून देतात. आपणही हेच करत असतो. कुटुंब , शिक्षण , कामधंद्याच्या पट्या. एकत्र सांधत असतो , आवाज कणसुरच येतो. हे असे प्रवासाचे अनुभव मग पुटं चढवतात त्यावर. , घंटा किणकिणते. आपापल्या कबिल्याचे सुर नाहीतर भटके अन मुक्त सुर! ते आपण जसे ठोके मारू तसे!

किणकिण ऐकता टळटळीत दुपार झाली अजुन जरासच राहिलय , मघाशी आलो त्याच मेन रोड वरून पुढे जायचय. एक डावीकडच वळण आल की दोन किलोमिटर ला आजचा हॉल्ट! खुणेसाठी आमचा सपोर्ट टेम्पो डाव्या वळणाशी थांबणार होता. त्या डाव्या वळणाची चातकासारखी वाट पहात जवळपास २०-२२ किमी हाणली सायकल अन एकदाचा दिसला टेम्पो! राइड करतानाचे हे स्पेशल अनुभव असतात. आयुष्यातल सगळ्यात महत्वाच तेव्हा काय ,तर ते डावं वळण असतं . अन ते मिळाल्यावर स्वर्गाची अनुभुती! अन हा स्वर्ग कधी डावं वळण, कधी मोठ्या चढानंतरचा उतार असतो , कधी वाळवंटात लांब दिसणारं मिराज , अन कधी सावलीच झाड.

तर ही डावं वळण आल्यावर मुक्कामी पोचलो. फॉसील पार्क नावाची जागा होती . सायकली टेकवल्या , कावळे कोकलत होते पोटात , मस्त जेवणाचा वास येत होता. पण पहिल्यांदा स्ट्रेचिंग. १५ मिनिटं झकास हलके केले सगळे शिणलेले स्नायु! मग मांडलेल्या जेवणावर हमलाबोल केला. साधसच कच्छी जेवण! गुजराथी जेवण गोडसर असतं पण हे कच्छी मस्त तिखट! इथल्या प्रत्येक जेवणात मस्त अन हवं तितक ताक असत! गारेगार तिकडेच आडवं व्हावं अस वाटत होतं . पण फॉसिल्स आणि सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन पाहायला जायची टूम निघाली. आकाश इतकं निरभ्रं की मिल्कीवे दिसु शकते . सपोर्ट व्हेइकल ( तुफान नावाचा १० सिटर) आणि एक गावातली गाडी घेउन आम्ही सगळे निघालो. संध्याकाळचा कलता जादुचा उजेड , अन ते सेडिमेंटरी रॉक्स . काय एकेक शेड अन कंपोझिशन्स . फोटो काढू तितके कमी .
IMG_2664.JPG

IMG_2666.JPG

हे सगळ केल्यावर चहा हवा वाटतच होतं तर हा सरंजाम सादर झाला.आदल्या दिवशी भुज मधे खास कच्छी दाबेली खायची राहिली होती तर तीही हाजिर!!

IMG_0669.jpg

परत आल्यावर आंघोळ उरकुन गप्पा सेशन झालं एक , अन दाल खिचडी जेवण. दुसर्‍या दिवशीच ब्रिफिंग मिळाल. बाय रुल सगळ्यांनी एकत्र जायच . हा त्यातला महत्वाचा भाग. छारी धांद या वाळवंतातुन जायच होतं .सगळच वाळ्वंट, रस्ते असे नाहीत , अन २९-३० किमी यातुन जायच होतं . हरवू नका पाकिस्तानात जाल वगैरे गप्पा झाल्या .( खरतर हरवून तिकडे जाण्याइतकी जवळ नाही बॉर्डर पण सायकल च्या टप्प्यात आहे ) पण तसही एकत्रच जायचो म्हणून गावांची नावं काही फार लक्षात ठेवली नव्हती.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून तयार होउन एक चहा , वॉर्म अप झाल. सगळे निघाले, मी चटकन जाउन येते म्हणून एक टॉयलेट व्हिजीट करुन आले तोवर बाकिचे पुढे गेले होते आमचा एक ऑर्गनायझर होता थांबलेला. अन काल ची गावातली कार परत निघाली होती. मी होते पुढे म्हटल त्याला अन निघाले. ही गाडी वळली तशी मीही लागले तिच्या मागे जवळपास किलोमिटर्भर गेल्यावर लक्षात आलं , चुकलय! जो काही काटा आला सरसरून! कारण मागे फिरुन उलट्या दिशेनी गेले पण आमच टोळ्कं बरच पुढे अन ऑर्गनायझरही एव्हाना गेला होता. अन तोही याच भ्रमात की मी पुढे आहे. मोबाइल ला रेंज शुन्य! ती भुजपासूनच नव्हती. माझ्यापाशी जेमतेम ३०-३५ रुपये . एरवी जी मोबाइल्वरून पे करण्यावर भिस्त असते त्याचा काहीच उपयोग नाही. सायकल चालवत चालवत आता काय चा विचार चालू होता. औषधाला माणूस दिसत नव्हता , अन दिसला तर पत्ता तरी काय विचारायचा ते पण लक्षात नव्हत. रस्ता सरळ होता तोवर हाणली सायकल , पण मी फास्ट चालवूनही २ किमी चा लॅग भरून काढण अवघड होतं , वाळवंटाच्या आधी आमचा ग्रुप सापडू दे अशी प्राथना करत होते अन एक वळण दिसल. पोटात खडा पडला आता कोणता रस्ता घेउ? ऱोड नॉट टेकन कविता आठवली , अन मिच टप्पल मारली मला , ही वेळ आहे का कविता आठवायची बावळट! मग सरळ उतरले सायकल वरून अन लांब श्वास घेतला . कोणी भेटल तर ठीक नाही तर मुक्कामी पोचल्याशिवाय ऑर्गनायझर्पैकी कोणाचे फोनही लागणार नव्हते. मग जवळपासच गाव शोधुन कोणाच्या तरी मोबाइल वरून संपर्क करता येइल आजची राईड हुकली बहुतेक , सध्या अ‍ॅडव्हान्स पैश्याशिवाय शेवटच्या मुक्कामाला सायकल सकट नेणारा टेम्पो वगैरे शोधावा असा ढोबळ विचार केला . तितक्यात एका मोटर सायकल चा आवाज आला. मी रस्त्याच्या मधे जाउन थांबवल त्याला . म्हटल सायकल चा ग्रुप दिसला का कोणता? ( मी विचार केलेला , कि नसेल कोणी दिसल तर दुसरा रस्ता पकडावा , मेथड ऑफ निगेशन) तो म्हणे हो एक ग्रुप होता . मग म्हटल हे असले कपडे अन असल्या सायकली होत्या ? तर हो ! गावके छोरे नही , हाल्मीट वाले लोग थे ( हेल्मेट ) हुश्श म्हणून आनंदानी त्याला दोन खजूर अन बदाम दिले खाउ म्हणून अन मी परत सुसाट निघाले.किलोमिटरभरंतरावर एकीची सायकल पंक्चर झाली म्हणून ती अन एक ऑर्गनायझर दिसले. जितं मया म्हणून उरला सुरला जीव भांड्यात पाडून थांबले मी. त्यांना वाटलेल मी पुढे आहे अन पुढचे समजत होते मी मागून येतेय. मी हरवले आहे हे पहिल्या रिग्रुपिंग शिवाय कळलही नसतं कोणालाच. मी पुढे गेले, अडीच किमी वर सापडलं टोळकं आमच. आता आल्बेल झाल्यावर ही सिचुएशन स्टोरी मधे बदलली होती .

छारी धांद च्या आधी च वांग नावाच गाव होतं . पहिलं रिग्रुपिंग! आमचे कपडे पाहून बायका ओढणीमागे खुसुखुसू हसत होत्या अन बाप्ये गावाच्या चौकात आम्च्या सायकली , ग्रुप पहात उभे होते.

IMG_0663.jpg
मग जरा गप्पा झाल्या,
पुण्याहून सायकल ?
नाही भुजपासून चालवतोय.
कंपणीमें पर्मोसन होगा क्या?
नही
गवर्मंट्का स्किम है क्या
नही
पैसे मिलेंगे क्या?
नही
फिर छोरे छोरी क्यो धुपमे सायकल चला रहे हो!
सरपंच म्हणे बावले होते है सहर के लोग.
तेव्हा हसलो खरं पण नंतर विचार करताना जाणवल , खरच रोजच्या जगण्याची गणितं सोडवणच जिकिरीच होत असेल त्यांना आम्ही बावलेच वाटणार. अन हे खरच भरल्या पोटाच्या , खिशाच्या लोकांच्या करमणूकीचा भाग आहे!

तिथून पुढे निघालो खर्‍या वाळवंटात. रस्त्याच्या रिबीनी संपल्या. आता पुढचे २७-३० किमी ऑफरोड! काही ठिकाणी वाळूत चाकं रुतत होती तिथे चक्क उचलून नेल्या सायकली. हा रस्ता रस्ता नव्हताच ! वाळूवर गुरं गेल्यानी उठलेले मार्ग! ही पण एक गंमतच ५०-६० म्हशी रेड्यांचा एक घोळका चालला होता. जवळजवळ किलोमिटर भर अंतर यांच्या मागून सायकली हातात घेउन चालवल्या. पुर्ण वाट अडवून रवंथ करत जात होत्या या , अन पुढे जायच्या बेतात असलेल्या एका सायकल्स्वाराच्या जे काही मागे लागली एक म्हैस की बाकीचे निमुट उभे राहिले.
IMG_2680.JPG

मग वाळवंट विस्तारल , वाटच उरली नाही अन वाट अडवणारे ही

IMG_2698.JPG

IMG_2693.JPG

IMG_2689.JPG

आमच्या तुफान मधे चहा घेतला होता मधे वाटला तर प्यायला . वाळवंटातल्या चांदण्यात मस्त चहा पान विद मिनीबाकरवडी झाल!

IMG_0642.jpg

येताना सिगल फाइल मधेच चालवायच असा एक नियम पाळत होतो इथे होल वावर वॉज आवर! मग ठरवून गठ्यानी चालवली सायकल ! अगदी गाणी म्हणत ! फोटो बीटो काढत

aae68998-56db-4ff9-8648-1d3b83c4f1d3.jpg

नजर पोचेल तिथवर स पा ट !! हा नजारा वेगळा होता! वाळू नाहीतर भेगाळलेली जमिन, खुरटी झाडं ! निसर्गाच वेगळाच रुप!

परत रस्त्याच्या रिबिनी आल्या तेव्हा एका गावातल्या शाळेत बसून दुपारच जेवण केलं . जेवण म्हणजे ठेपले, आलू ,दही आणि केळी ! पॅक करून आणलेल अन उभा उभ्या हाताच ताट करून खाता येइल अस!

IMG_0665.jpg

यानंतर परत रिबीनी आल्या. एक डाव वळण येई पर्यंत सरळ रस्ता होता अन मग हायवे. इथे अहमदाबादेच्या सफेद रण ला जाणार्‍या टुरीस्ट गाड्या १०० पेक्षा कमी स्पीड नी जात नाहीत अशी किर्ती होती. म्हणजे सायकली कडेकडेनी , सिंगल फाइल. या मेन रोडला लागल्यावर एक लहानसा ढाबा दिसला. सरबत हॉल्ट घेतला मग! आमच्या बडीचे फोटो काढले!

IMG_2701.JPG

परत रस्त्याला लागलो! आता धोरडो तालुक्यातल गोरेवाली नावाच गाव अंतिम डिस्टीनेशन होतं तिकडे एका कच्छी घरात रहाणार होतो.
पोचल्यावरच पहिलं रुटीन स्ट्रेचिंग अन शवासन!
05b6aee3-0e2f-4455-a0d8-b3752f5e2eaa 2.jpg

हे त्या घरांच अंतरंग. भुंगा म्हणतात याना. वाळूची वादळ झेलायला गोल असतात ही घरं अन मुबलक मिळणार्‍या एरंडाच्या काठ्यांच छप्पर.

IMG_2714.JPG

8C113891-67F7-4060-8A12-3CFC5D3ED0AB.jpg.

अन ही सुंदरा त्या घरमालकाची लेक!

आजपण संध्याकाळ रिकामी नव्हतीच. आज रंगीत 'बरे' कपडे घालून सफेद रण पहायला जायच होतं. सखल भागात पाणी साठतं अन मग ते पाणी एव्हॅपोरेट होउन शुभ्र मिठ उरतं ! अन सुर्यास्ता च्या वेळी हा नजारा अद्भूत होता! मी जायच्या आधी किंचितही अभ्यास न केल्यानी इथे काय पहायला मिळू शकणारे याची अजिबातच कल्पना नव्हती! खरतर त्यामुळे जास्त भावले सगळे नजारे!

507F6719-739F-45F7-A528-1AE3AED196D3.jpg

'नमक कच्छ का '

3E8BE052-A4C5-4040-908B-15551A22D907.jpg

हेच आपले बरे कपडे! खरतर , यश चोप्रांच्या सिनेमातल्या रंगित प्लेन शिफॉन साड्या अन उडते पदर झकास दिसले असते इकडे

IMG_0638.jpg

मावळता सुर्य असा , आधी कधीच दिसला नव्हता!!

परत आल्यावर छान भाकर्‍या ताजं लोणी , आलू की सब्जी , एक भारी लोणच! अन एक खीर! अंगणात जमून गाणी गप्पा , होस्ट बरोबर फोटो सेशन झाल .

IMG_2787.JPG

दुसरा दिवस म्हणजे सरहद की ओर जानेवाला सिधा रास्ता! सरळ म्हणजे रेष आखल्यासारखा सरळ २९-३० किमी . याला आम्ही ठेवलेल नाव इंफिनीटी रोड!

IMG_2755.JPG

ही त्या रस्त्याची सुरवात!

193134b3-ba75-46f1-b5f0-1dc0614fc279.jpg

न संपणारा रस्ता ! मेडिटेटिव्ह!!

IMG_0641.jpg
हा आपला उगाच टिपी!

IMG_2772.JPG

वाटसरू!

हा रस्ता संपल्यावर मोठा रस्ता झेरो ब्रिज ला जातो! सिव्हिलियन्स जाउ शकतील असा शेवटचा पॉइंट. बॉर्डर सिक्युरीटी पोस्ट आहे तिकडे. फोटोला मनाई ,पण तिकडे बसून जेवायला परवानगी दिली त्यांनी. जेवण सेम ठेपले अन आलू! मग परत इंफिनीटी रोड पकडून गोरेवालीला आलो. जराशी थंडीची चाहुल वाटली तर आम्ही कँपफायर पेटवून घेतली. गप्पा गाणी रंगली परत. उद्याची राईड या ट्रीप्मधली शेवटची असणार होती.

हा दिवस उजाडलाच मुळी दाट धुकं घेउन . व्हिजीबीलीटी २० मिटर ! मग जरा रेंगाळत नाश्ता केला . हे अस वेगळ वातावरण असल ना की नेहेमीचे पदार्थ ही वेगळे लागतात. हांडी भरून पोहे अन हवा तितका चहा असा ब्रेकफास्ट झाला. होस्ट बरोबर फोटो झाला

. IMG_2804.JPG

IMG_2797.JPG

आठ वाजत आले तरी धुकं हटेना मग लाइट लाउन निघालो कडेकडेनी .

IMG_2806.JPG

सुर्य वर यायला लागल्यावर मात्र डायरेक्ट वटारलेच डोळे. जरा एका धाब्यावर थांबलो होतो रिग्रुपिंग्साठी . तर एक भारीच शोध लागला.
मी अन एक रायडर ,कल्पना , कशावरुन तरी बोलत असताना आडनावांवर आलो. माझ माहेरच अन सासरच दोन्ही आडनावं दोन पिढ्या आधी बदलली आहेत अस काही तरी सांगत होते. , माहेरच आडनाव पै च बदलून तिर्थळी ( तिर्थहळ्ळी ) अस म्हटल्यावर ती म्हणाली माझी एक चुलत मैत्रीण आहे या नावाची! ( मैत्रीणीची मैत्रीण) . तिला म्हटाल शक्याच नाही हे आमचच आहे आडनाव! दुसर कोणी नाहीये . डीटेलात शिरल्यावर लक्षात आलं की ती माझ्या सख्या बहिणीबद्दल बोलतेय अन मैत्रीण आपली वरदा! मिठीच मारली दोघींनी! लग्गेच फोटो काढला वरदाला पाठवला! जग अगदीच बारकसं आहे अन पुण्यातल्या दोघींना इतक जवळच मैत्र तिकडे कच्छ्च्या कोणत्यातरी रस्त्यावरच्या ढाब्यावर उलगडावं यापेक्षा भारी काय !!

IMG_2809_0.JPG

पुढच गाव होतं भिरंडियारी , इथे मावा अत्यंत भारी मिळतो अस सांगितलं होतं. मावा करणारे ठिकठिकाणी दिसत होते. आळीपाळीनी चुल्हाण्यावरच मोठी काहिलीभरोन दुध ढवळत रहायच , जवळपास अर्धा दिवस! आस्वाद घेणे मस्ट!!
IMG_2812.JPG

B172523E-D090-403E-8E1B-86D9D71E27F9.jpg

मला आजोळच्या कुंद्याची आठवण आली !

आता वाटेत कर्कवॄत्त ओलांडणार आहोत अस समजल! ,आहे नोशनल लाइन पण रामप्यारीचा फोटो हवाच की!
IMG_2815.JPG

आता भुज २५ किमी राहिल होतं सगळ्याना चटकन एकदा मुक्कामी पोचुन संध्याकाळ शोपिंग नी साजरी करायची होती. पण पॅक करुन आणलेल जेवण करुन मगच पुढे जावं अस ठरल! एक जुनी जेल ची वापरात नसलेली इमारत होती जरा झाडं सावली ह्या अप्रुपाच्या गोष्टी पाहून थांबलो इथे अन टेकलो.
IMG_2816.JPG

गप्पा ऐकायला हे पण आले घोळक्यात!. यापुढचा रस्ता मात्र जीवघेणा होता! प्रचंड हेडविंडस, उन्हाचा तडाखा अन नुकतच जेवलेलो! सगळ्या गोष्टी एकत्र! त्यात जे काही २५ या आकड्यावर स्वर्ग सापडणार अस वाटत होतं ते प्रत्यक्षात होतं ३२ . गाव ओलांडून पुढे स्वामिनारायण विश्रांतीगृहात पोचलो एकदाचे मग मात्र ही भावना होती!

IMG_2822.JPG

अनिश्चितता , जमेल का? झेपेल का? , कोण कोण असतील काय माहित बरोबर, करोन्याच विघ्न नाही ना येणार मधेच? सायकल साथ देइल ना? सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, म्हणजे हा फोटो!
डन! वेल डन!
मीच नाही तर संपूर्ण ग्रुप नी झकास समाप्ती केली! रण ऑफ कच्छ काँकर्ड!

समाप्त !

( पण रायडिंग स्टोरीज क्रमशः )

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle