ओट्स नट्स लाडू

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि शाळेतून आल्यावर काहीतरी नवीन खायला दे हि मागणी सुरू झाली
नेहमीचे रवा-नारळ-गुळ लाडू, शेंगदाणे-गुळ लाडू करून झाले.नवीन काय बनवावे म्हणून युट्युबवर पाहताना दोन तीन ओट्स-ड्रायफ्रुट्स रेसिपीज सापडल्या. त्यातलं घरात जे उपलब्ध होतं त्यातून हे लाडू बनवले.

पूर्वतयारीचा वेळ: १ तास
प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
● अडिच वाटी रोल्ड ओट्स, कोरडे भाजून.
● अक्रोड, बदाम,पिस्ता पाऊण वाटी, कोरडे भाजून.
● तीळ पाव वाटी भाजून
● गुळ एक-सव्वा वाटी
● इलायची पावडर-अर्धा छोटा चमचा
● पळीभर तुप

क्रमवार पाककृती:
● ओट्स मिक्सरमध्ये फिरवून घेणे
● ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये अर्धवट फिरवून घेणे
● गुळ मिक्सरमध्ये फिरवून घेणे
● वरील सर्व साहित्य आणि इलाईची पावडर हाताने मिक्स करून घेणे.
● लागेल तसं तुप घालून लाडू वळले कि झाले, खायला लाडू तयार.

वाढणी/प्रमाण: खाल तितके

माहितीचा स्रोत: मी आणि युट्यूब.

Attachmentमाप
Image icon IMG_20220711_190057.JPG156.77 KB
Image icon IMG_20220711_190057.JPG156.77 KB

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle