गोड पदार्थ

ओट्स नट्स लाडू

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि शाळेतून आल्यावर काहीतरी नवीन खायला दे हि मागणी सुरू झाली
नेहमीचे रवा-नारळ-गुळ लाडू, शेंगदाणे-गुळ लाडू करून झाले.नवीन काय बनवावे म्हणून युट्युबवर पाहताना दोन तीन ओट्स-ड्रायफ्रुट्स रेसिपीज सापडल्या. त्यातलं घरात जे उपलब्ध होतं त्यातून हे लाडू बनवले.

पूर्वतयारीचा वेळ: १ तास
प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
● अडिच वाटी रोल्ड ओट्स, कोरडे भाजून.
● अक्रोड, बदाम,पिस्ता पाऊण वाटी, कोरडे भाजून.
● तीळ पाव वाटी भाजून
● गुळ एक-सव्वा वाटी
● इलायची पावडर-अर्धा छोटा चमचा
● पळीभर तुप

पाककृती प्रकार: 

आंबा मलई डबलडेकर फज

मागे मायबोली वरील गणेशोत्सवातील पाककॄती स्पर्धेत मी ही पा . कॄ. दिली होती. सध्या आंब्याचा सिझनही आहे म्हणून आज इथे आणतेय मैत्रिणींकरता.

साहित्य
१. दूध - ३ पेले
२.ओल्या खोबर्याचा किस/चव - २ पेले
३. आमरस - अर्धा पेला
४. साजूक तूप - २ ते ३ मोठे चमचे
५. साखर - २ ते ३ मोठे चमचे
६. केशर काड्या - ६ ते ७
७. पिस्ते (साधे, खारवलेले नाहीत) ७ ते ८
८. व्हाईट व्हिनेगर - दोन चहाचे चमचे
९. वेलची पावडर - एक ते दोन चिमूटभर

क्रमवार कॄती

पाककृती प्रकार: 

द्राक्षांची स्लशी

ही पूर्णपणे लाराच्या डोक्यातून निघालेली पाककृती आहे.

घटक पदार्थ : बीया नसलेली द्राक्षं.

कृती : द्राक्ष स्वच्छ धुऊन, काड्या काढून बोल्स मधे ठेऊन फ्रीजरमध्ये घट्ट बर्फ होईपर्यंत ठेवायची. चांगले टणक गोटे झाले की मिक्सरमध्ये घालून बारीक होईपर्यंत पटकन फिरवायची. जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही. पटापट बोल्/मग मध्ये काढून खायची.

हवं तर या स्लशीवर लिंबू पिळायचं.

फार फार मस्त लागतं. साखर वगैरेची गरज अजिबात नाही. द्राक्षांसारखीच स्ट्रॉबेरीची देखिल करता येईल. स्ट्रॉबेरी काहीशी आंबट असल्यानं द्राक्षं- स्टृऑबेरी एकत्र करूनही करता येईल.

हिरव्या द्राक्षांची स्लशी :

पाककृती प्रकार: 

काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या

काळ्या तिळाची गूळ पोळी:IMG_20160113_125917_647.JPG संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.

पाककृती प्रकार: 

सफरचंदाचे घारगे

IMG_20190103_152038minalms_0.jpg

सफरचंदाचे घारगे

सफरचंद जरी काश्मीरला होत असलं तरी त्याला आमच्या कोकणी हुकमी एक्के वापरून अगदी कोकणी करून टाकलं! तांदूळ पिठी, गूळ आणि खोबरं मग चव काय अफलातून येणारच!

साहित्य :
एक सफरचंद
पाऊण वाटी गूळ
मीठ
पाव चमचा हळद
पाव वाटी ओलं खोबरं
दीड वाटी तांदूळ पिठी
एक वाटी कणिक
दोन चमचे तेल पिठात घालायला
तेल तळणीसाठी

कृती:

  • सफरचंद धुवून साल काढा. सफरचंद किसून घ्या.

पाककृती प्रकार: 

गुळपापडी (वड्या/लाडु)

साहित्यः-
२ वाट्या कणीक (जाडसर असेल तर उत्तम),
१ वाटी तूप,
१ वाटी अगदी बारीक चिरलेला/ किसलेला गुळ
वेलची /जायफळ पूड
थोडसं दुध

(optional) वरील प्रमाणाला प्रत्येकी १ टे.स्पु.
तळलेला डिंक पूड करून,
सुकं खोबर भाजून पूड करून,
ड्रायफ्रुट पावडर
खसखस भाजुन पुड करुन

कृती:-
एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा.
जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

ImageUpload: 

Subscribe to गोड पदार्थ
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle