Art October 2022

हाय मैत्रिणींनो,

खरं तर इन्क्टोबर सुरू होऊन आठवडा झालाय. पण यंदा कार्यबाहुल्यामुळे माझं इन्क्टोबर चित्र काढणं अगदी तळ्यात मळ्यात आहे म्हणून धागा काही काढणं झालंच नाही शिवाय यावेळचे prompts मला जरा जास्तच डेंजर वाटतायत कदाचित मला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून असेल :Biggrin:
पण बस्कु ने आवर्जून धागा काढायलाच लावला :)

मी यावेळी काही inktober आणि काही इतीहा तर्फे आयोजित Folktober च्या prompts वर चित्रं काढेन म्हणतेय बघू कसं किती जमतंय ते.
मी दोन्ही prompts लिस्ट इथे देतंय तुम्ही पण तुम्हला जमेल तस चित्र काढा.

नवीन सदस्यांना इन्क्टोबर म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडला असेल तर खालील लिंक्स वर फेरफटका मारा.

Folktober मध्ये दिलेल्या विषयावर फक्त भारतातले folk आर्ट म्हणजे वारली, मधुबानी, पट्टचित्रे, गोंड, पिचवाई, गंजिफा, चित्रकथी, माता दी पचेडी, भिल चित्रे, टिकुली, संथाली, वृक्षचित्रम, कलमकरी, केरला म्युरल इ. वापरून चित्रं काढायची आहेत.

इन्क्टोबर (Inktober 2021)
https://www.maitrin.com/node/4760
इन्क्टोबर (Inktober 2020) https://www.maitrin.com/node/4380
इन्क्टोबर (Inktober 2019) https://www.maitrin.com/node/3845
इन्क्टोबर (Inktober 2018) https://www.maitrin.com/node/3126

ही iteeha ची लिंक
https://www.facebook.com/iteeha

ही यावर्षीची प्रॉम्प्ट लिस्ट

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle