बेसन-रवा लाडु (पाकातले)

लागणारे जिन्नस:
बेसन-२ कप्
बारिक रवा/सेमोलिना -१कप
दिड कप साखर
१ कप पाणि
साजुक तुप-१ कप
२ टेबल्स्पुन दुध
वेलची पुड/केशर काडि

क्रमवार पाककृती:
१कप तुप वितळवुन त्यातल ४ टेबल्स्पुन तुप वगळुन बाजुला ठेवावे.
जाड पुडाच्या भांड्यात उरलेले तुप घेवुन त्यात बेसन भाजायला घ्यावे.मध्यम आंचेवर एकसारखे भाजत राहावे(आंच अजिबात वाढवु नये) गॅस सोडून इतर कुठेही जाउ नये.खमंग वास सुटला आणि बेसनाचा रंग बदलला की आंच एकदम कमि करुन हळुहळु एक एक चमचा दुध शिपडावे अस केल्याने बेसन फुलत आणि लाडु एकदम अलवार बनतो.दुध घातल्यावर एक मिनिट भर परत भाजावे.
बेसन पसरट भांड्यात काढुन रवा उरलेल्या तुपावर भाजावा,तोही मध्यम आंचेवर रंग बदलुन गुलाबि होइल असा भाजावा.
आता रवा काढुन त्याच भांड्यात साखर-पाणि एकत्र करुन एकतारी पाक करावा.गरम असताना बेसन-रव्यावर ओतावा,ढवळुन ठेवुन द्यावे.
साधारण ५-६ तासांनि सगळा पाक जिरुन मिश्रण हाताला शिर्‍यासारखे कोरडे लागले कि कणिक मळतो तसे सगळ मिश्रण खुप मळुन घ्यावे यावेळि ते हाताला चिकट्त असेल तर अजुन मुरु द्यावे मग वेलची पुड घालुन एकत्र करावे आणि लाडु वळावे.
शोभेसाठि हव असेल तर काजु तुकडे किंवा मनुका लावाव्या.

अधिक टिपा:
१) बेसन जास्त असल्याने हा लाडु मस्त खमंग थोडा पेढा टेक्शरचा लागतो आणी अजिबात टाळुला वैगरे चिकट्त नाहि.
२) एक तारी पाक करण वाटत तेवढ अजिबातच अवघड नाही, साखर आणी पाणी एकत्र करुन गॅस वर ठेवा, मध्यम आचेवर ढवळत साखर विरघळली की हळूच थोडा वाढवा,बुडबुडे येवुन एक उकळी आल्यासारख झाल की भान्ड तत्परेतेने बाजुला करा, थोड दोन बोटामधे घेवुन लाबवुन बघा तार दिसली पाहिजे,नसेल दिसत तर परत गॅस चालु करुन कमी आचेवर ठेवुन एक दोन मिनिटात परत चेक करा...चेक करताना आच बन्द आणी भान्ड बाजुला हे लक्षात ठेवा...नाहितर पाक पुढच्या स्टेजेस पटापट गाठतो.
३) बेसन भाजताना कितिही कटाळा आला तरी आच वाढवायची नाही,गॅस पासुन हलायच् नाही... बेसन जराही करपल तर सगळी मेहनत पाण्यात जाते...ट्रिट इट लाइक अ टॉडलर...नजर हटी दुर्घटना घटी!!
४) पाक जिरला आणी सगळ कोरड दिसतय अस वाटल तर मिश्रण एक मिनिट मायक्रोवेव्ह करा, मग मळा तुप थिजल्याने सगळ कोरड कोरड दिसत.
2c29dbf9-2513-4bd2-9f2a-fdba1f0094ef.jpg

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle