लाडू

रवा नारळ लाडू

रवा नारळ लाडू.

रेसिपी

अर्धा किलो बारीक रवा दोनशे ग्रॅम तुपात मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात साधारण दोन वाट्या नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.

तीन वाट्या साखरेत ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर दोन येतात त्याच्या.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

बेसन-रवा लाडु (पाकातले)

लागणारे जिन्नस:
बेसन-२ कप्
बारिक रवा/सेमोलिना -१कप
दिड कप साखर
१ कप पाणि
साजुक तुप-१ कप
२ टेबल्स्पुन दुध
वेलची पुड/केशर काडि

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

पाकाशिवाय रवा-नारळ लाडू

खिरिसाठी म्हणून आलेला कन्डेस्ड मिल्क उरले होते ते वापरुन हे लाडु केले.झटपट सुरेख आणी नो- पाक पण नारळी पाकाचे चव देणारे लाडू होतात.
साहित्य
बारिक रवा- १ कप (अमेरिकेत असाल तर फाइन रवा आणी भारतात झिरो नबर आणा)
१/२कप ओला नारळ चव्,किस
१ कप कन्डेस्ड मिल्क स्विट्न्ड
२-३ चमचे तुप
२-३ चम्चे दुध
काजु,बदान्,किसमिस
वेलदोडा पुड

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

गुळपापडी (वड्या/लाडु)

साहित्यः-
२ वाट्या कणीक (जाडसर असेल तर उत्तम),
१ वाटी तूप,
१ वाटी अगदी बारीक चिरलेला/ किसलेला गुळ
वेलची /जायफळ पूड
थोडसं दुध

(optional) वरील प्रमाणाला प्रत्येकी १ टे.स्पु.
तळलेला डिंक पूड करून,
सुकं खोबर भाजून पूड करून,
ड्रायफ्रुट पावडर
खसखस भाजुन पुड करुन

कृती:-
एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा.
जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

ImageUpload: 

Subscribe to लाडू
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle