बाली ट्रीप- कुटा बीच

बालीला आम्ही रात्री बारा वाजता पोहोचलो होतो. रात्री बारा वाजता सुद्धा विमानतळावर उकडत होते. विझाबद्दल चौकशी केली होती त्याप्रमाणे भारतीय पासपोर्टधारकांना विझा लागणार नव्हता. तसेच झाले आणि प्रत्येकी US$35 वाचल्याचा आनंद झाला. बाहेर येउन आमच्याकडचे चलन बदलुन घेतले. तर तिथेही 'टॅक्सी टॅक्सी' ओरडणारे होतेच. आमचे हॉटेल ५ किमीवरच होते त्यासाठी आम्हाला १००k लागले (k = हजार). आजुबाजुचे रस्ते, वाहतुक बघुन आपण भारतातल्याच कोणत्यातरी भागात आलोय असे वाटले. हॉटेल मात्र छान होते. पण वातावरणाशी जुळवुन घ्यायला थोडा वेळ लागला.

दुसर्‍या दिवशी निवांत उठुन कुटा बीचला जायचा प्लॅन होता. प्रत्यक्षात फार लवकर जाग आली. मग पटकन आवरुन नउ वाजताच बाहेर पडलो. तिथले सीम कार्ड नसल्याने हॉटेलमधेच मोबाइलवर रस्ता बघुन घेतला होतो. तरीही साग्रसंगीत रस्ता चुकायचा कार्यक्रम झाला. मग परत हॉटेलवर येउन व्यवस्थीत रस्ता बघुन निघालो. जेव्हा भरपुर दुकाने आणि स्पाज् दिसायला लागले तेव्हा आम्ही बरोबर रस्त्यावर पोहोचलो हे जाणवले. थोडासा शॉपिंगचा शुभारंभ करुन पोहोचलो एकदाचे कुटा बीच वर.

(आम्ही जरी सकाळी गेलो असलो बीच वर तरी फोटो मात्र सनसेटचे आहेत. ट्रिपमधे वेळ मिळेल तेव्हा आम्ही बीचवर जाउन बसायचो).

हा बीच खरतरं सर्फिंगसाठी प्रसिद्ध आहे. जागोजागी लोग तुम्हाला सर्फिंग लेसन घेण्यासाठी मागे लागलेले असतात.
कुटा बीच बराच मोठासुद्धा आहे. जवळ जवळ १.५ किमी असावा. बीच सुंदर आहे आणि स्वच्छही. पण आंघोळीची वगैरे व्यवस्था नाही (पैसे देउन मात्र तुम्ही इथे आंघोळीसाठी पाणी विकत घेउ शकतात). इथे तुम्ही बसण्यासाठी खुर्ची आणि ती मोठी छत्री रेंट करु शकता. जर तिथल्या विक्रेत्याकडुन काहीतरी विकत घेतले तर तुम्हाला तो फ्रिमधे बसुन देतो.
आम्ही बीच वर चालत जात असताना एक गंमतच झाली. चार पाज तरुण लोकल मुलं पळत पळत, 'सारुख सारुख, काजोल काजोल' ओरडत आली आणि हात मिळवुन परत गेली. हात मिळवताना एक जण 'मी अमिता बचन' असे पण म्हणाला. आम्हाला खुप मजा आली. हा 'सारुख सारुख' चा अनुभव मात्र रोज एकदा तरी यायचाच. कोणा संत पुरुषाने म्हणल्याप्रमाणे, 'शारुख्,बस नाम ही काफी है' या उक्तीचा प्रत्यय आला. :lol:
kuta beach
1877
1878
1879
1880

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle