युरोप मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात ९५ टक्के वेळा स्वच्छता असते. स्वित्झर्लंड मध्ये तर सुबक सजवलेली अनेक टॉयलेट्स पाहिली होती. मग इथे आता काय वेगळं असेल? मी फोटो पाहिले नव्हते, फक्त गुगल वर याबद्दल वाचलं होतं.
तिथे पोचल्यावर बाहेरून तसे नेहमी सारखेच वाटले. आत टॉयलेट पेपर, hand wash, गरम पाणी, हात पुसायला कागद हेही होतं. आणि एका भिंतीला पूर्ण काचेची खिडकी होती, ज्यातून पलिकडे वाहणारी नदी दिसत होती. And even before I realized I went back to औरंगाबाद एसटी स्टँड.
त्याचा काय संबंध? बुलढाणा पुणे प्रवास मी रात्रीच्या बसने करायचे. बरेचदा मी एकटी मुलगी असायचे. छत्रपती संभाजी नगर मध्यरात्री यायचं. तिथली स्वच्छतागृह भयंकरच होती, पण त्याही पेक्षा तिथल्या छोट्याशा खिडकीतून, वर चढून बायकांकडे बघणारे विकृत लोक अश्या अवेळी सुद्धा कधी असायचे. घाणी पेक्षाही किळस आणि भीती ती असायची, पण पर्याय नसायचा. हे एक प्रतीक, असे अनुभव मुलगी म्हणून दुर्दैवाने इतरही ठिकाणी आले होते.
आणि इथे एक अख्खी आरपार दिसणारी खिडकी, नैसर्गिक विधी करताना निसर्गाकडे बघत करायचे? कुणीच येणार नाही तिथून बघायला? I simply found it overwhelming as a "woman" to think that you can pee here without worrying.
काही गरज आहे का? हे सोडून देऊ. पण आपल्या देशात बायकांसाठी सोय म्हणूनही टॉयलेट्स उपलब्ध नसतात, असतील तरी त्यात क्वचित स्वच्छता असते आणि सुरक्षा? प्रत्येक वेळी गुन्हा घडत नसला, तरी नजरा आणि कुठेही संधी शोधणारे विकृत याचं काय करायचं? खेड्यात बायकांवर अश्या वेळी झालेल्या अत्याचाराच्या बातम्या आठवल्या.
जवळपास आहोत तर गंमत म्हणून जाऊन बघू, असा आमचा विचार होता. But it had a completely different impact. Those faded memories were woken up making me emotional.
Then, while travelling on other Norwegian scenic routes (without planning), we visited some more of these, which are designed not only as facilties, but also for views. किती वेगळाच विचार करणारे हे लोक आहेत हे? नॉर्वेमध्ये एकूणच स्वच्छतागृह इतर युरोपीय देशांपेक्षाही स्वच्छ वाटले, पण हे unique होते. And more than toilets, they represented the country and their mindset.
मधुरा देशपांडे शेंबेकर
०३-०६-२०२६

