घरबसल्या पक्षीदर्शन...

रत्नागिरीच्या घराची हल्ली खूप वेगवेगळ्या कारणांसाठी आठवण येते. आडोने टाकलेले किंगफिशरचे फोटो पाहिले आणि आमच्या घराच्या आजूबाजूला वावरणारे किंगफिशर दिसले. खंड्या हे त्याचे स्थानिक नाव. छोटासा डौलदार पक्षी. बेडरूममधून दिसणार्‍या माडावर नाहीतर हॉलमधून बाहेर असलेल्या वायरवर बसलेला असायचा. समोरच्या साचलेल्या पाण्यात मासा किंवा किटक दिसला की झूमकम सूर मारून पकडायचा आणि परत मूळ जागी येऊन खात बसायचा. व्हाइट थ्रोटेड तर दिवसाला एकदा दिसायचाच. एकदा तिबोटी पण दिसला.

अर्थात, आपला मोबाईल कॅमेरा आणि तो वापरायची अक्कल दोघांच्याही मर्यादेचे भान ठेवत काही फोटो काढले आहेत. अगदीच वाईट आहेत याची कल्पना आहे पण... हौस!!

bird_1.jpeg

हा तुर्रेबाज पक्षी पण दोन तीनदा दिसला. क्रेस्टेड हॉक ईगल. याचा अजून एक छान फोटो होता. तो मिळाला तर टाकेन. bird2.jpeg

हा मलाबार पाय्ड हॉर्नबिल उर्फ धनेश. याचे घरटे घराजवळच्या एका झाडावर होते. पण त्या दिवशी हा अगदी बाल्कनीमध्ये येऊन जवळ बसला होता. अगदी हातही लावता येईल इतक्या अंतरावर होता. निवा^त फोटो काढत होतो तरी उडाला नाही. सुंदर पक्षी. दांडेली ट्रीपमध्ये खूप धनेश दिसले होते तेव्हा काही वर्षानी हा अगदी घरच्या पाहुण्ञासारखा येईल असे वाटले पण नव्हते. सुनिधीला शाळेत सोडायला जाताना भाट्यात धनेश खूप दिसले पण हा घरी आला, म्हणून याचे कौतुक.

baird3.jpeg

burd_4.jpeg

या फोटोत दिसतोय तो ग्रेट इ^डियन हॉर्नबिल. हा घराजवळच्या झाडावर खूप उंच बसला होता. झूम केल्याने ब्लर आहे पण फोटो गोड मानून घ्या.

bird_6.jpeg

हा करकोचा. हा पण शिकार करताना पाहिला आहे. मस्त उडतो अचानक.

bird5.jpeg

वर
0 users have voted.