रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - घोषणा

बटाटा: तर मुळ्या, तू वाचलंस ना?
मुळा: काय?
बटाटा: तुझे रंगीत भाऊबंद आहेत म्हणे.. लाल, गुलाबी. प्राची, नंदिनी, मोनाली सांगत होत्या.
मुळा: बsssरं, मग?
बटाटा: मग काय? बोलव की त्यास्नी, रंग खेळाया! Dancing
मुळा: अरे, पण अजून काय माहिती नाही, कशाचा पत्ता नाही आणि काय खेळतोस!
बटाटा: हाय ना, हा बघ मी आणलाय घोषणेचा कागूद, तुला वाचून दावतो. लक्ष दे नीट, काय?
मुळा: हां, बोला.
बटाटा: "रंग खाऊ चला!"
मुळा: आँ? नीट वाच रे!
बटाटा: नीटच वाचतोय की. रंग खात खात, रंग खेळायचे.. तर बघ पुढं ऐक.

-----------------
Eat Watermelon
"रंग खेळू चला"

या संकल्पनेमध्ये सादर करत आहोत, "Eat Your Colors!" विविध रंगांच्या भाज्या, फळे पोटात गेली पाहिजेत असं आहारतज्ज्ञ सांगतात. म्हणून आपण रंगीत, हेल्दी आहार शोधणार आहोत. आजपासून दर आठवड्याला एक रंग सांगितला जाईल.
नियम-१- आठवड्याचा जो रंग दिला जाईल, त्या रंगाची फळे किंवा भाज्या घ्यायच्या. त्यांचा जो भाग पदार्थात वापरणार तो दिलेल्या रंगाचा असला पाहिजे. उदाहरणार्थ लाल रंग दिला तर कलिंगडाचा गर वापरु शकता. ते वरुन हिरवं असलं तरी.
एक किंवा अनेक भाज्या/फळं चालतील. त्यासोबत अजून काहीही वापरु शकता.
नियम-२- त्या भाजी किंवा फळाचा खाण्याचा पदार्थ बनवायचा.
नियम-३- त्याचा फोटो काढायचा.
नियम-४- त्या पदार्थाची कृती लिहायची.
नियम-५- फोटो आणि कृती "मैत्रीण" वर "सृजनाच्या वाटा" मध्ये पोस्ट करायची.
नियम-६-(कडक) कृत्रिम रंग वापरायचा नाही!
--------------------
कळलं?
मुळा: हां!
बटाटा: कृत्रिम रंग वापरायचा नाही!
मुळा: अजिबात नाही!
बटाटा: आता मार्किन्ग शिश्टीम.
मुळा: आँ?

----------------------
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क, वेगळा आहे- १ मार्क.
३. फोटो दिलाय - १ मार्क
४. पारंपारिक रेसिपी - १ मार्क, पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क, नवीन ओरिजनल - ३ मार्क
५. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क. इथला कॅलक्युलेटर वापरु शकता- http://www.myfitnesspal.com/recipe/calculator
६. कृत्रिम रंगाचा उपयोग- नापास.
८. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले नाही - नापास
९. सांगितलं एक आणि केलं भलतंच - नापास (कोशिंबीर सांगितली तर तेच करायचं, रस्सा नाही.)
१०. रेसिपीचे मार्क्स स्वतःच कॅलक्युलेट करुन लिहायचे.
-------------
मुळा: छान! आता कधीपासून सुरु करायचं हे? रंग कधी देणार?
बटाटा: आत्ता देतोय न्हवं. लग्गेच सुरुवात करायची रेसिपी तयार झाली की. तर आजचा रंग आहे, 'हि र वा'!
मुळा: वा, वा!
बटाटा: पण एक प्रॉब्लेम हाय.. :thinking:
मुळा: काय आता?
बटाटा: हिरव्या रंगाला 'पेय' च बनवायला पायजेल लिहीलंय.
मुळा: आँ? आता 'ईट' होतं ना? हे 'ड्रिन्क' कुठून झालं?
बटाटा: असूदे रे. पोटात गेल्यावर सगळं सारखंच. त्या बाया हुषार हायेत. बनवतील ज्यूस, सरबतं, रस्समं, सूप, सारं अन स्मूद्या-बिद्या. आपण मज्जा बघू!

Perfecto
------------
आठवडा: १, रंगः हिरवा, पदार्थ - पेय.


dd3.jpg

**फोटो उगाच दिलाय, फक्त दोडके, झुकिनी, दुधीचंच पेय बनवू नका. काही प्रश्न असल्यास जरुर विचारा!**
काही प्रश्नांची उत्तरे-
१.मुदत- पहिल्या आठवड्यात दिलेल्या रंग-पदार्थाची रेसिपी तुम्ही नंतर कधीही ही थीम संपेपर्यन्त टाकू शकता. म्हणजे एप्रिल एन्ड पर्यन्त. दर आठवड्याला नवीन कॉंबिनेशन दिले जाईल, त्यालाही हेच लागू होईल. तेव्हा हिरव्या पेयासाठी भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. कृती आधी लिहून नंतर पदार्थ केल्यावर फोटो टाकू शकता. किंवा जी मैत्रीण करेल तिच्याकडून फोटो घेऊन तो टाकू शकता.
२. पेय म्हणजे काय? जो पदार्थ आपण पेय म्हणून serve करतो ते पेय. याचा अर्थ फक्त द्रव पदार्थ नव्हे, यात आमटी, वरण, रस्सा येणार नाही आपण रस्सेही पीत असलो तरी. :) सूप चालेल.
३ काय चालेल-सर्व प्रकारची पेये चालतील. कॉकटेल्स चालतील. फळ-भाजी घेतल्यानंतर बाकी काहीही घालण्याची मुभा दिलेलीच आहे, तेव्हा अल्कोहोल घालू शकता.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle