प्रॉडक्ट फोटोग्राफी - डूज/डोण्टस, अपेक्षा, गरज, समस्या, माकाचु, टिप्स, आयडिया इत्यादी..

हा घागा फोटोग्राफी बरोबरच कलाकृती, शिक्षण करीअर (बिझनेस) याही गृप्समधे येऊ शकतो असे वाटतेय.
इथे ज्या मैत्रिणी वस्तू, ज्वेलरी करून विकतात त्या बहुतेक सगळ्या आपापल्या वस्तू नेटवर विकतात. नेटवर म्हणजे ठराविक ठिकाणी फोटोग्राफ्स टाकून तिथून विक्री होते. अश्या वेळेला वस्तू चांगली बनवण्याबरोबरच त्याचे फोटो चांगले असणं अपेक्षित आहे.
सर्वांकडेच उत्तम कॅमेरा किंवा प्रोफेशनल फोटोशूटसाठी बजेट असतेच असे नाही. कधी उत्तम कॅमेरा आणि फोटो काढता येणारी व्यक्ती (कॅमेरा असतो म्हणून फोटोग्राफर इतकेच) हे उपलब्ध असते पण तरी फोटो छान येत नाहीत. कधी प्रॉप्सचा वापर, ले आऊट यामधे गडबड होते वगैरे वगैरे वगैरे...
थोडक्यात वस्तू बनवून नेटवर विकणे यातला फोटोग्राफी हा एक अतिशय महत्वाचा आणि घाटवळणाचा भाग आहे.

तर यासंदर्भात अपेक्षा, गरज, समस्या, माकाचु, टिप्स, आयडिया आणि तत्सम जे काही शेअर करता येईल ते या धाग्यात शेअर करूया.

मला जाणवणारे काही महत्वाचे मुद्दे मांडते सर्वप्रथम
१. तुमचे प्रॉडक्ट हा पूर्ण फोटोचा फोकस असायला हवा. फोटो एक इमेज/ कलाकृती म्हणून उत्तम असतो पण प्रॉडक्ट तितकेसे उठून येत नाही असे शक्यतो होता कामा नये. म्हणजे एखादे सुंदर डिझाइनचे कापड असते ज्याच्यावर वस्तू ठेवून फोटो काढला जातो. तुमची ज्वेलरी दिसतच नाही. किंवा तत्सम.
२. प्रॉडक्ट हातात मिळाल्यानंतर अपेक्षाभंग होता कामा नये. फोटो एकदम स्वप्नवत, ग्रॅण्ड वगैरे आणि प्रॉडक्ट ढुस्स किंवा उलटही असे होऊ नये.

सध्या इतकेच.. बाकी तुम्ही भर टाका.

/* */ //