रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- फ्रूरूssट सॅलड

याचं रेसिपीचं नाव फ्रूरूssट सॅलड, कारण यात एक फ्रूट आणि एक रूट आहे. कलिंगड आणि लाल मुळा असं अजब काँबिनेशन असलेलं हे सॅलड तुम्हाला आवडेल अशी आशा. चांगलं लालेलाल आणि गोड कलिंगड आणायचं! आणि ताजे छोटे छोटे मुळे, पानांसकट जुडी मिळते.

साहित्य:
कलिंगडाचे तुकडे - २ कप
छोटे मुळे - २ , पातळ गोल स्लाइस कापून किंवा चौकोनी तुकडे करुन,
हिमालयन पिन्क सॉल्ट किंवा सी सॉल्ट किंवा साधं मीठ
पुदिना किंवा कोथिंबीर सजावटीसाठी

ड्रेसिंगसाठी-
१ टेबलस्पून आल्याचा रस किंवा १/२ टेबलस्पून किसलेले आले.
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
२ टीस्पून मध किंवा ब्राऊन शुगर
१ टीस्पून क्रश्ड रेड पेप्पर

एका भांड्यात ड्रेसिंगसाठीचे सगळे साहित्य एकत्र करुन whisk ने फेटायचे. चव घेऊन पहा आणि आवडीनुसार गोड, आंबट, तिखट अ‍ॅडजस्ट करु शकता.
कलिंगड आणि मुळा एका मोठ्याच बोलमध्ये घ्यायचे ज्यात सॅलड हलवता येऊन व्यवस्थित ड्रेसिन्ग लागेल. फ्रूट आणि रूटवर हळूहळू ड्रेसिन्ग ओता आणि मिक्स करा. मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. हे सॅलड थंड छान लागतं. सर्व करताना वरुन सॉल्ट मिलने सी सॉल्ट/ पिंक सॉल्ट किंवा नसल्यास साधे मीठ घाला. कोथिंबीर, पुदिना यांनी सजवा.

redsalad.jpg

लेट्यूसच्या पानाचा बोल करुन त्यात सर्व करु शकता.
मुळा वगळू शकता किंवा त्याऐवजी सफरचंद घालू शकता. पण मुळा आवडत असेल तर हे काँबो करुन बघा.

Capture.PNG

मी ८ मार्क घेणार!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle