ईट युअर कलर्स

रंग खेळू चला - त्वरा करा! शेवटचे दोनच आठवडे!

मु: त्वरा करा! शेवटचे दोनच आठवडे!
ब. आठवडाभर नुस्ता आराम केलाय, आता करा लगबगीनं.. :waiting:
मु: आराम नाही, केलेत रे ते सपाट पाव की काय. पण कोणाला रेसिपी, फोटो टाकायला वेळ झालेला नाही!
ब: तुला काय म्हाईत?!
मु: मला माहिताय, बघ आता येतील रेसिप्या, आणि अजून एप्रिल एन्डपर्यंत वेळ आहे की!
बः बर, मग आता आपण लवकरच गाशा गुंडाळू, फार पकवाया नको!
मु: अरे पण ते शेवटच्या दोन आठवड्यांचं काय ते सांग की!
बः काय नाही नुसती उलटापालट!
मु: म्हणजे?
बः म्हंजे असं बघ.. आधी हिरव्या रंगाचं पेय केलं ना? आणि लाल चट्ण्या, कोशिंबीरी, लोणची?
मु. हां
बः मग आता उलट करायचं!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- फ्रूरूssट सॅलड

याचं रेसिपीचं नाव फ्रूरूssट सॅलड, कारण यात एक फ्रूट आणि एक रूट आहे. कलिंगड आणि लाल मुळा असं अजब काँबिनेशन असलेलं हे सॅलड तुम्हाला आवडेल अशी आशा. चांगलं लालेलाल आणि गोड कलिंगड आणायचं! आणि ताजे छोटे छोटे मुळे, पानांसकट जुडी मिळते.

साहित्य:
कलिंगडाचे तुकडे - २ कप
छोटे मुळे - २ , पातळ गोल स्लाइस कापून किंवा चौकोनी तुकडे करुन,
हिमालयन पिन्क सॉल्ट किंवा सी सॉल्ट किंवा साधं मीठ
पुदिना किंवा कोथिंबीर सजावटीसाठी

ड्रेसिंगसाठी-
१ टेबलस्पून आल्याचा रस किंवा १/२ टेबलस्पून किसलेले आले.
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- मीन ग्रीन ज्युस

हा आहे माझ्या आवडत्या डॉक्युमेंटरी(फॅट, सिक & निअर्ली डेड) मधला ज्युस. 'मीन ग्रीन ज्युस'

साहित्यः
४ सेलेरी स्टिक्स
२ ग्रीन अ‍ॅपल
एक काकडी
मुठभर पालक
मुठभर केल
१ लिंबू
आल्याचा बोटभर तुकडा

कृती:

मी ब्रेव्हिलचा ज्युसर वापरला आहे. त्यामुळे कृती अ‍ॅज सच काहीच नाही. सर्व भाज्या छान स्वच्छ धूवून घेतल्या. अन टाकल्या ज्युसरमध्ये. तो ग्लासमध्ये ओतला अन प्यायला! :) चविष्ट प्रकरण होते आले व लिंबामुळे! अ‍ॅपल व काकडीमुळे सर्व आंबटपणा बॅलन्सही होतो.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to ईट युअर कलर्स
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle