बाळंतविडा

बस्कू आणि टीमने इतका छान उपक्रम (मैत्रिण) सुरू केलाय...पण वेळेअभावी इथे बागड्ता येत नाहीये.
तरी मी केलेल्या बाळंतविड्याचे काही फोटो.
आता काहीजणींना आठवेल की तिकडे मायबोलीवरही हे पाहिल्याचं. बरोब्बर. काही कपडे तेच आहेत. काही नवीन पण आधीच्यातल्या उरलेल्या कापडातलेच शिवले. असं लागतं किती कापड ......चिंगुल्यांच्या टिंगुल्या कपड्यांना!

हा पहा निळा चौकटीचा पायजमा आणि शर्ट.
शर्टावर निळा त्रिकोण आहे तो खिसा नाही बरं .... नुसता एक त्रिकोण लावून त्याला एक बटण लावलय.

हे अजून एक सुरकं...निळंच शिवायला लागलं.

जे तुकडे होते त्यातच तुकडाजोड करून विविध कॉम्बो. बनवली.

काही दुपटी, बेबी ब्लॅन्केट्स

।ञा

ह्याचे त्याला नि त्याचे ह्याला

हे जॅकेट थंडीची बंडी म्हणून आतून घाला किंवा छोटुकल्या नेहेरु शर्ट वर बाहेरून....

आणि ही वन्झी तर संपूर्ण्पणे अप्सायकलिन्ग. जुन्याटीशर्टातून बनवलेली. अगदी जी पाइपिन्ग (बोलीभाषेत....पायपिन) दिसते...ती सुद्धा टीशर्टाचीच नीट काढून घेतलेली.
फक्त छातीवरचं अ‍ॅप्लिक तेवढं नवीन. ते काय....मस्तपैकी लावून मागून इस्त्री फिरवली.


बेबी ब्ळेन्केट्स


हो....हा अर्थातच बाळंतविड्यातला नाहीये. पण हा फ्रॉक अगदी "ओल्ड स्कूल" आहे ना....पण मला असे फ्रॉक आवडतात. अर्थातच शिवायला ......!!!! मुली खूप गोड दिसतात अश्या घोळदार फ्रॉकात.....आणि मागे मस्तपैकी प,ट्ट्याचा मोठा बो!

आणि ही कुंची....आणि मुलींनो....कुंचीची एक गंमत आहे...मायबोलीवर आहे. इथे वेळ मिळाला की......

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle