माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - १

शाळेत असताना कधीतरी 'टाकाऊ पासून टिकाऊ' सदरातली कृती वाचून वस्तू बनवायचं वेड लागलेलं. घरात येणारे विविध प्रकारचे पॅकेजिंगचे कागद, खोकी अशा विविध उपयोगी वस्तू गोळा करुन ठेवायच्या आणि कधी आकाशकंदील तर कधी तोरणं असं काही ना काही बनवलं जायचं. मागच्या वर्षी लेकीला तीची सगळी खेळणी आणि ती स्वतः बसू शकेल अशी टॉय कार हवी होती. :) एका मोठ्या खोक्यापासून तीला हवी तशी कार बनवली आणि त्यानंतर अपसायकलिंगच्या छंदाने पुन्हा डोकं वर काढलयं.त्यातल्या काही प्रयोगांचे हे फोटो. माझ्या या छंदाच्या नुतनीकरणास कारणीभूत ठरलेली टॉय कार पावसाने भिजून गेल्याने तीचा फोटो नाही पण त्यानंतरच्या प्रयोगांचे फोटो आहेत.
प्लॅस्टीकच्या सिरियल बॉक्सच आवरण काढून त्यावर शार्पीच्या पेनने केलेलं वारली पेंटिंग
11222323_952825138087624_8725926544806605600_o_edited.jpg

पाठकोर्‍या कागदांचं हे फूलं
12645238_954124941290977_909057180588366213_n.jpg
त्याच्या शेजारी त्याच रंगाचा लँप सुरेख दिसतो

20150605_163950.jpg

पेपर रोल पासून बनवलेलं लॉग कॅबिन. त्याचं छत आधी फिक्स केलं नव्हतं. लेक त्यामधे छोटी खेळणी ठेऊन खेळत असे. तीला खेळायचा कंटाळा आल्यावर छत पॅक केलं :)
12651105_952821041421367_1879575000905611089_n_edited.jpg

सिरियल बॉक्सला आयस्क्रीम स्टीक्स चिकटवून केलेला पेन स्टँड. हा करताना घरातल्या छोट्या आर्टीस्टचाही हातभार लागलायं :)
12932771_986229011413903_2688722290026090111_n_edited.jpg

त्याचं पॅटर्नने केलेला आणखी एक बॉक्स. सध्या मोठ्या साइजच्या कलर्स बॉट्ल्स ठेवण्यासाठी मी हा बॉक्स वापरते
IMG_20160413_162144292.jpg

प्लॅस्टीकच्या बाटल्यांच्या कॅप्स पासून डेकोरेट केलेलं झाडं
13173748_1007212172648920_4908819816884325846_n.jpg

कागद, थर्माकॉल्,कार्ड्बोर्ड असं वेगवेगळं मटेरियल वापरुन झाल्यावर सध्या प्लॅस्टीक हे आवडत रिसायकलिंग मटेरियल झाल आहे. प्लॅस्टीकच्या वस्तू पुढच्या लेखात ..

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle