देवभूमी भेट

मैत्रिणिंनो, नुकताच मी देवाभूमीचा ट्रेक करून आले, त्याचा हा फ़ोटोरूपी वृत्तांत.
मला छान छान काही लिहिता येत नाही. त्या प्रयत्नांत फोटो पण टाकायचे राहून जातील या भीतीने मी हा मधला मार्ग घेतलाय. खरेतर प्रत्येक ट्रिप-ट्रेकनंतर मी ठरवते फोटो तरी टाकयचे, पण राहूनच जाते. यावेळी मात्र तुमचा आग्रह मानून मी मनावर घेतलंय.
लग्नानंतर ही आमची पहिलीच मोठी ट्रिप. मला हिमालयातच जायचे होते. आधी काश्मीरचा बेत ठरवला. पण नवरा म्हणाला, 'नुसते गाडीत बसून काय फिरायचे? तुला तुझा आवडता परिसर मला दाखवायचा होता ना? मग तिकडेच जाऊ या की.'

उत्तराखंडमधे याच ठिकाणांना मी २०१२ मधे भेट दिली होती आणि प्रत्येक ठिकाणाच्या आकंठ प्रेमात पडले होते. परत तिथे जाता येणार ही फारच आनंदाची बाब होती माझ्यासाठी. हवे तसे सोबती मिळत नसल्यास आपण दोघेच जाऊ यावर आमचे एकमत झाले. (नंतर माझा भाऊ पण आला आमच्याबरोबर.)

तसा सगळा रस्ता, ठिकाणे, उतरण्याच्या जागा यांची माहिती असली तरी २०१३च्या पुरानंतर काय काय बदल झाले असतील अशी धाकधूक होतीच. बदल दिसले तरी नाराज्/दु:खी व्हायचे नाही असे मी स्वतःला खूप वेळा बजावले निघायच्या आधी. ती ठिकाणे इतकी मनात बसलीयेत की प्रत्येक बदल नजरेने टिपलाच.

आमचा पहिला टप्पा होता ऋषिकेश. तिथे त्रिवेणी घाटासमोरच्या 'जयराम अन्नक्षेत्र आश्रम' या ठिकाणी राहिलो. खिडकीतून,किंवा अगदी झोपूनही गंगा दिसेल अशा ठिकाणी होती आमची खोली. संध्याकाळी गंगेची आरती, दुसर्‍या दिवशी व्हाईट वॉटर राफ्टिंग, राम-लक्ष्मण झुल्याला भेट, तिसर्‍या दिवशी हरिद्वारला जाऊन काच मंदिराला भेट, हर की पौडीला आरती असा बेत केला.

1DSC_3571.NEF_.jpg

1DSC_5936.jpg
हा त्रिवेणी घाट. तशी तर दिवसभर इथे गर्दी असतेच, पण संध्याकाळी आरतीच्या वेळी नुसता फुललेला असतो घाट. स्थानिक, प्रवासी, भिकारी, विक्रेते, पुजारी नुसती लगबग असते.

माणसं निरखायचा छंद असेल तर इथे फारच मजा येईल. दिवसभर जयपूर फूटवर मस्त फिरणारा भिकारी संध्याकाळी फूट काढून, कपडे बदलून, केस आरशात बघून योग्य तसे करून 'कामा'साठी तयार होणारा भिकारी आम्ही इथेच पाहिला.

1DSC_2708.jpg
भाविक लोक गंगेची पूजा करून द्रोणात भरून फुले, दिवा, उदबत्ती नदीत सोडतात. अंधारात तर फारच सुरेख दिसतं ते दृश्य.

1DSC_2700.jpg
आरतीसाठी पुजारी आणि त्यांचे सहायक यांची अशी तयारी चालू असते.

1DSC_2735.jpg
२०१२ मधे पाहिले तेव्हा, ज्या भाविकांना पूजा करायची आहे त्यांच्या बरोबर अशा प्रकारे पूजा केली जात असे.
पण आता पद्धत एकदम बदलली आहे.
1DSC_5947.jpg
तबला-पेटीच्या साथीने माईकवर आरती म्हटली जाते आणि पुजारी अशा प्रकारे युनिफॉर्म घालून कवायत केल्यासरख्या एकसारख्या हालचाली करतात.
1DSC_5949.jpg
1DSC_2726.jpg
IMG_0504.JPG
त्रिवेणी घाटाला साधारण काटकोनात हा वॉक-वे बांधलेला आहे. नदीचे खळाळते पाणी बघत मस्त चालता येते. वाहनांशी शर्यत किंवा भिकारी/विक्रेते यांच्याशी आट्यापाट्या खेळाव्या लागत नाहीत. मधे मधे बाकही ठेवले आहेत.

IMG_20160505_111040.jpg
राफ्टिंगसाठी आवश्यक सामग्री
IMG_20160505_111638.jpg
राफ्टरमधे हवा भरणे पण केले

आणि हे हरिद्वारमधल्या पवन धाममधे असणारे काच मंदिर. इथल्या सर्व भिंतींवर काचेच्या तुकड्यांनी बनवलेले पौराणिक देखावे आहेत. मधले खांबसुद्धा काचेच्या तुकड्यांनीच सजवलेले आहेत.
IMG_20160506_174940.jpg
IMG_20160506_174955.jpg
IMG_20160506_175026.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle