travelling

आर्मेनिया - ४ लवाश आणि सुजुक

लवाश

अर्मेनियन पोळी / ब्रेड
रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळी किंवा ब्रेड बाबत आपण भारतीय अतिशय नशिबवान आहोत असं मला आता वाटायला लागलं .
आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये दोन वेळेला ताज्या पोळ्या केल्या जातात .
एवढंच पुरेसं नाही की काय म्हणून या पोळ्या करण्यासाठी आपल्याला अगदी माफक मोबदला देऊन मदतनीस उपलब्ध होऊ शकतात .

अर्मेनियन लवाश ( ब्रेड ) रुमाली रोटीसारखा दिसतो . तो अशा बेक-यांमध्ये बनवला जातो . बेकरी सरसकट सगळीकडे असेलच असं नाही . मग इतर सामानासोबत लवाश सुपरमार्केटमधून आणून. ठेवायचा तो दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यापर्यंत पुरतो .

लवाश बनवना-या अर्मेनियन सुंद-या

Keywords: 

आर्मेनिया - ३ येरेवान - टेम्पल ऑफ गार्नी

आर्मेनिया हा देश जगातला पहिला असा देश आहे जिथे ख्रिस्ती धर्म सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या देशाचा धर्म म्हणून स्वीकारला गेला. अनेक पुरातन ख्रिस्ती धर्मस्थळ आणि त्यांची रचना हे या देशाच अजून एक वेगळ आकर्षण. जगभरातून अनेक लोक केवळ ही जुनी मंदिर बघायला इथे येतात त्याचा धर्माशी फारसा संबध नसावा अस जाणवलं.

पूर्वेला टर्की, पश्चिमेला जॉर्जिया उत्तरेला इराण तर दक्षिणेला अझरबैजान असलेला हा छोटासा देश. पूर्वी USSR चा भाग होता अजूनही इथली कित्येक छोटीमोठी गावं शहरं आपल्याला रशियामध्ये असल्याच भासवतात.

Keywords: 

आर्मेनिया - १ तयारी आणि प्रवास

जवळजवळ सात वर्षांनंतर आम्हा चौघांना एकत्र ट्रिपला जायची संधी मिळाली होती. जायच कुठे यावर कॉन्कॉल ( बेळ्गाव, पुणे, मुंबई आणि दुबई ) घेऊन खूप खलबतं, झाली निव्वळ टुरिस्ट डेस्टिनेशन असलेला देश बघायला जायच आम्हाला कोणालाच मान्य नव्हत त्यामुळे कुठे जायच हे ठरवण्यासाठी आमचा बराच रिसर्च झाला. इजिप्त, जॉर्जिया, अझरबैजान , मलेशिया असं करत करत शेवटी अर्मेनियावर शिक्कामोर्तब केलं गेलं. दोन्ही मुलं म्हणजे कौशल देविका आणि नवरा यांच जोरदार प्लॅनिंग चालल होत. ( मी जरा या सगळ्या प्लॅनिंगकडे तटस्थतेनी बघत होते. )

Keywords: 

ट्रेकिंगची हौस

नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं. अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळवीची तयारी सुरु झाली.

Keywords: 

अमेरीकेतली भटकंती आणि खादाडी

अमेरीकेत भटकंती करताना त्या त्या भागातील खास खादाडीच्या ठिकाणांबद्दल माहितीची देवाण घेवाण करायला हा धागा. देशी-परदेशी-स्थानिक चवीची, होल इन द वॉल ते हायफाय , बजेट फ्रेंडली ते होऊ दे खर्च , सगळ्या प्रकारच्या रेस्टॉरंट्स, टपर्‍या, फूड ट्रक्स, बार्स बद्दल इथे माहिती लिहा.

Keywords: 

अमेरिकावारी - ईस्ट कोस्ट भटकंती

संपदाने वेस्ट कोस्टच्या भटकंतीचा धागा काढला, आदिती ने शिकागो चा मग मी ईस्ट कोस्ट चा का नको काढू Heehee

आम्ही ऑगस्ट मध्ये डिसी प्लान करत आहोत. तर तिथे लोकल फिरायच्या, आजुबाजूच्या जागा ह्या बद्दल माहिती हवी आहे.

आम्ही शुक्रवारी १० ऑगस्ट ला बोस्टन ला पोहोचू. तिथे सोमवार पर्यंत असू.
१४ ऑगस्ट. ला डिसी ला येऊ.
नवर्‍याची कंपनीची कॉन्फरन्स आहे १५-१८ तेंव्हा तो तिथे बिझी असेल. तर त्या दरम्यान मला आणि लेकीला जवळपास दिवसभर कुठे फिरता येईल? पब्लिक ट्रास्नपोर्ट कसा आहेका? मैत्रिण मैफिल जमू शकेल का?

१४ आणि १५ चा दिवस आम्हा तिघांना एकत्र वेळ आहे तर काय पहावे?

Keywords: 

देवभूमी २

आमचा पुढचा टप्पा होता ऊखीमठ. साधारण सात तासांचा प्रवास होता. सगळा रस्ता डोंगरातला असल्याने 'घाटातली वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ' असा प्रकार होता. सतत इतके तास बसमधे, तेही अशा रस्त्यावर जरा त्रासाचे, म्हणून आम्ही ब्रेक-जर्नी करायचे ठरवले. तसेही वाटेतली दोन ठिकाणे परत बघायची मला उत्सुकता होतीच. आणि नवर्‍याने 'तू ठरव काय ते' असे जाहीर केल्याने त्याची संमती होती.

Keywords: 

देवभूमी भेट

मैत्रिणिंनो, नुकताच मी देवाभूमीचा ट्रेक करून आले, त्याचा हा फ़ोटोरूपी वृत्तांत.
मला छान छान काही लिहिता येत नाही. त्या प्रयत्नांत फोटो पण टाकायचे राहून जातील या भीतीने मी हा मधला मार्ग घेतलाय. खरेतर प्रत्येक ट्रिप-ट्रेकनंतर मी ठरवते फोटो तरी टाकयचे, पण राहूनच जाते. यावेळी मात्र तुमचा आग्रह मानून मी मनावर घेतलंय.
लग्नानंतर ही आमची पहिलीच मोठी ट्रिप. मला हिमालयातच जायचे होते. आधी काश्मीरचा बेत ठरवला. पण नवरा म्हणाला, 'नुसते गाडीत बसून काय फिरायचे? तुला तुझा आवडता परिसर मला दाखवायचा होता ना? मग तिकडेच जाऊ या की.'

Keywords: 

Subscribe to travelling
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle