इंग्लंड

मिनॅक थिएटर, युके - एका स्त्रीच्या संकल्पनेचा अप्रतिम अविष्कार

पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!

Keywords: 

युकेतील भटकंती - प्रेक्षणीय स्थळांची नोंद, सल्ले, रहाण्याच्या जागा इ.

जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.

तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.

१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.

२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.

३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.

Keywords: 

Subscribe to इंग्लंड