chutney

कांद्याची चटणी

लागणारे जिन्नस:
१, २ कांदे, ४,५ लसणीच्या पा़कळ्या, धणे-जिरे १/२ टीस्पून प्रत्येकी, ३,४ लाल सुक्या मिरच्या, थोडी चिंच, गूळ, मीठ.

क्रमवार पाककृती:
कांदे सालं काढून गॅसवर भाजून घ्यावेत. धणे-जिरे व सुक्या मिरच्या कोरड्या भाजून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. कांदा गार झाल्यावर मिक्सरमधे वाटून घ्यावा. त्याचबरोबर लसणीच्या पाकळ्या, चिंच, गूळ, मीठही काढावे. नंतर सर्व एकत्र करावे.
अधिक टिपा:
ही चटणी भाकरीबरोबर छान लागते.
(खूप वर्षांपूर्वी ही रेसिपी माबोवर टाकली होती)

पाककृती प्रकार: 

हिरव्या टोमॅटोची चटणी

ही माझ्या आजीची रेसीपी आहे. या आजीला मी दुर्दैवाने पाहू शकले नाही, माझ्या जन्माच्या आधीच ती गेली. पण तिच्या अशा अनेक रेसिपीज आई अजूनही आजीच्या म्हणून तशाच्या तशा करते. त्यातलीच ही एक.

साहित्य

२ मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो बारीक चिरून
२-३ हिरव्या मिरच्या
थोडासा कढिलिंब
फोडणीचे सामान (हिंग,मोहोरी,हळद, तेल)
तीळ २ टीस्पून
भाजलेले शेंगदाणे १/२ टेबलस्पून
चवीप्रमाणे मीठ आणि थोडा गूळ किंवा साखर

कृती

एका पॅनमधे फोडणी करून हिंग,मोहोरी,अगदी थोडीशी हळद आणि कढीलिंब यांची फोडणी करून घ्यायची.
त्यात भाजलेले दाणे घालून फोडणीत जरा खरपूस परतून घ्यायचे.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

कैरी कांदा चटणी

कैरी सालासकट बारीक चिरायची, कांदाही बारिक चिरायचा. शक्यतो पांढरा कांदा असेल तर बेस्ट. मग दोन्ही एकत्र करुन त्यात मिठ, तिखट (सढळ हाताने), कच्च तेल, जरा साखर टाकून हाताने कालवायचं. हवा असल्यास त्यात केप्रचा तयार लोणचं मसालाही घालायचा. तो घातला तर तिखट कमी टाकायचं. फोडणी द्यायची नाही. हे एकत्र मिश्रण दोन दिवस बाहेर आणि फ्रिजमधे जास्त टिकतं. अफाट यम्मी लागतं. पोळीच्या रोलमधे घालून तर बेस्ट. मी नाचणी किंवा ज्वारीच्या भाकरीवर चांगलं डावभर टाकते आणि संपवते.

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

दुधीच्या सालीची चटणी

दुधी वापरून झाल्यावर साल वाया जाऊ द्यायची नसल्यास ह्या पद्धतीने चटणी करुन बघता येईल.

साहित्य-
सगळं अंदाजे आहे.
मी दोन दुधींच्या साली धुवून वापरल्या.
अंदाजे दोन ते तीन टीस्पून तीळ,
दोन तीन टीस्पून सुक्या खोबर्‍याचा कीस
अर्धा चमचा जिरं
एक चमचा तेल
दोन तीन टीस्पून दाण्याचं कूट किंवा तेवढं कूट होण्याइतके दाणे
चवीपुरतं मीठ, साखर, लाल तिखट.

कृती-

दुधीच्या साली कात्रीने कापून मध्यम तुकडे करावेत.
तेलावर जिरं घालून फोडणी करावी. त्यात तीळ परतावेत.
त्यावर दुधीच्या साली घालून परतत राहवं. त्यावरच खोबर्‍याचा कीसही घालावा. त्यावरच चवीपुरतं मीठ, तिखट, साखर घालून

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

Subscribe to chutney
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle