April 2015

मैत्रिणीला सापडलेली (माझीच) जुनी कवितेवरची कविता

ती येते...

मी लाख विनवुनी पाही.
ती मला जुमानत नाही.
कोंडता उफाळुन येते.
ये म्हणता दडून राही.

कधी पारंपरीक साज
अन् वाणी ठसकेबाज.
कधी अलंकार त्यागुनी,
पांघरून घेई लाज.

कधी गालावरचा तीळ,
कधी देवावरची भक्ती.
कधी निसर्ग हो रमणीय,
कधी प्रेमामधली शक्ती.

कधी खळाळ होइ झर्‍याचा,
कधी लाटांवरती नाचे.
कधी सुसाट बोलत राही,
कधी शब्द होति सोन्याचे.

कधी नियम पाळुनी सारे,
आदर्श बालिका होते.
कधी वरुनि मुक्तछंदाला,
बंधने झुगारुन देते.

कंटाळा

कंटाळा
अस्वस्थ कंटाळा
इथून तिथून, तुला मला,
आतून बाहेरून, मुळापासून
खच्ची करत जाणारा
कं टा ळा

स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा

एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.

- नी

कुठेस?

टी-२ वर होते. बोर्डिंग पास घेऊन शेवटचं एकदा दाराकडे पाहिलं. काचेमागून आई-बाबा आणि दीपिका हात हलवून बाय करत होते. मी पण हात हलवला आणि पटापट आतल्या दिशेने चालयला लागले.. शक्य तेवढं मागे वळून बघणं टाळत... "तेजुला काहीच वाटत नाही", "रडू कसं येत नाही ताई तुला" "घाबरणार नाहीस तशी तू एकटी यायला" ह्या माझ्याबद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते.. आणि हात पाय थरथरत होते.
गेटपाशी आले तेव्हा मुलाकडे चौथ्यांदा जाणाऱ्या एक मराठी काकू बसल्या होत्या. मी कावरीबावरी दिसले म्हणून कि त्यांना टाईमपास हवा म्हणून माहित नाही गप्पा मारत बसल्या मस्तपैकी...

लेख: 

पृथ्वीचे पाणिग्रहण

माझ्या एका कवितेला दिलेले हे दृकश्राव्य रूप. अगदी वसंत ऋतुच यात आहे असे नाही. पण एकूणच निसर्ग आणि त्यातील सृजनता यात डोकावतेय म्हणून इथेही टाकतेय. यातील चित्र मी फोटोशॉप वापरून काढली आहेत. अन अ‍ॅनिमेट केली आहेत. आशा आहे तुम्हाला आवडेल :)

सृजनाच्या वाटा: 

परोमा - भूमिकांच्या पलीकडे स्त्रीत्वाचा शोध

चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्‍या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.

Keywords: 

टी कोस्टर

मला किडूक मिडुक वस्तू जमवून ठेवायची सवय आहे. गिफ्टचे रॅपिंग पेपर, जुने कपडे, जुन्या बेडशिट्स, टॉवेल, कागद, मणी, जुने ड्रेस, ओढण्या, नविन कुर्त्यांच्या बाह्या अशा अगणीत वस्तू! त्याचे काहीतरी करू म्हणुन ठेवलेले असते. अशाच माझ्या काही नविन कुर्त्यांच्या बाह्या मी जोडुन घेतल्या नाहीत त्या देशात कुठेतरी लोळत न ठेवता आठवणीने इकडे आणल्या होत्या. अशा ६-७ ड्रेसच्या बाह्या होत्या. त्या नीट कापून मागे इतर काम करताना उरलेले कापड लावून मी टी कोस्टर बनवले होते. ते एका इस्टकोस्ट ट्रिपमधे २-३ मैत्रीणींना गिफ्ट म्हणुन दिले. त्या अजुनही आठवणीने वापरतात. त्याची काही छायाचित्रे -

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

फेर धरु बाई फेर धरू

एका मैत्रिणीच्या मुलीचे लग्न आहे. तिला शुभेच्छा म्हणून हा सेंटर पीस विणला. सहाही ऋतु हातात हात घालून, तिच्या संसारात छान फुलू देत :-)

सिल्किश बारीक दोऱ्याने, क्रोशाने विणलेला हा सेंटर पीस साधारण अडिच फुटाचा आहे. नेटवर त्याचा ब्लर फोटो बघितलेला. माझ्या मैत्रिणीला फार आवडलेला. मग जरा डोकं लढवून बसवलं डिझाईन.भाचीच्या नव्या घरातील टिपॉयवर शोभून दिसेल ना ?

IMG_20150501_063159.jpg

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle