November 2016

दारू

"सगळ्यांनी बारा वाजता रिवोल्युशन बारमधे जमा!" पावणेबाराला इमेल. आमची पिकोचिप कंपनी नुकतीच एका अमेरिकन कंपनीने विकत घेतली. दोन महिने भवति न भवति होऊन शेवटी डील झाले. दोन कंपन्यांचे मर्जर म्हणजे मोठ्या माशाने छोट्याला गिळणे. नोकर्‍या जाणार हे नक्कीच. म्हणून आम्ही सगळे छोटे मासेवाले मनातून घाबरलेले. त्यात पुन्हा राजकारण. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण बळीचा बकरा वगैरे. जिथे तिथे हीच चर्चा. इमेल आल्यावर धपाधप कोट, टोप्या चढवून, काय सांगणार असतील या विचारात, घोळक्याघोळक्याने रिवोल्युशनला पोचलो.

लेख: 

पाने