अनोळखी लोकांकडून लिखाणाला मिळालेल्या प्रतिसादाच्या या काही नोंदी आहेत. काही ह्रुद्य का कायशाश्या आहेत तर काही मजेशीर आहेत. काही थोड्या डोक्याला ताप झाला वाटावं अशाही आहेत. पण जोपर्यंत आपल्या हातात नंबर ब्लॉक करणे, इमेल स्पॅम मधे ढकलणे हे पर्याय आहेत तोपर्यंत तितकासा ताप डोक्याला मी करुन घेत नाही. एरव्ही सगळं हहपुवा मोड मधे करमणूक करुन जातय ना तोवर चालसे.
हे लिहून ठेवलं पाहिजे ही आयडीयेची कल्पना खरतर ललिता प्रीतिची. काही दिवसांपुर्वी व्हॉटस ऍप चॅट करताना तिने ती बोलून पक्षी टाईप करुन दाखवली होती. आज आलेल्या फ़ोनमुळे परत त्या कल्पनेने मनात उचल खाल्ली आणि मी टायपायला घेतलं.
लेकीने रंगवून बनवलेलं टी लाईट होल्डर. तिने माझी एक काचेची चांगली वापरात असलेली बरणी ढापली त्यासाठी पण एन्ड प्रॉडक्ट चांगलं दिसत होतं तर जरा माझं दुःख कमी झालं
आज उठल्या उठल्या संघमित्राने fb वर शेअर केलेले सुंदर लँडस्केप फोटो पाहिले. त्यातलं एक composition खूपच आवडलं
दिवाळीत एक डूडल केल्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला म्हणून एक जेल पेन घेतलं आणि डूडलूनच थांबले :P
आज दिवाळीनंतर तब्बल एक आठवड्यानंतर मी याबद्दल लिहितेय. :P
या लेखात दिव्यांचे, रोषणाईचे कसलेही फोटो, वर्णन नाही. त्यामुळे हा लेख या उपक्रमात फिट होईल की नाही माहीत नाही. मात्र, या वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अंधारातून प्रकाशा कडे नेणार्या एका अनोख्या जगाशी ओळख झाली माझी. स्वतःला काही अंशी तरी समॄद्ध करणारा हा माझा अनुभव, मैत्रिणींसह शेअर करावासा वाटला, म्हणून लिहितेय इथे.
सय- माझा कलाप्रवास
सई परांजपे
राजहंस प्रकाशन, ३५८ पानं, ३०० रूपये.
नावाजलेल्या लेखिका-दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे या नावाचा चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर पुणे आकाशवाणी, बालरंगभूमी, दूरदर्शन, लघुपट, नाटक आणि चित्रपट अशा सर्वच मंचांवर त्यांनी बरेच ’धाडसाचे उद्योग’ केले आहेत. या सर्व माध्यमांतला प्रवास आणि त्या वेळेला आलेले अनुभव यांचा आढावा म्हणजेच ’सय- एक कलाप्रवास’.
त्याच काय आहे. येत्या डिसेंबरात देवबाग, तारकर्ली फिरायला जायचं ठरतयं. (आम्ही दोघंच- लव्ह बर्ड्स मी आणि माझे होणारे अहो)
नेटवर सगळ्या साईट चेक करुन फार कन्फ्युझायला झालं राव. :confused: त्यामुळे मग म्हटलं आपल्या मैत्रिणी कधी कामी यायच्या.