January 2021

गिटार शेल्फ

हे दोन तीन महिन्यांपूर्वीचे आहे.
अशीच एकदा आवराआवरीची लहर आलेली, आणि जवळ जवळ २० वर्षे जुन्या चालत नसलेल्या गिटार चे काय करावे कळात नव्हते. वाद्य, सरस्वती वै मुळे टाकून नक्कीच देणार नव्हते. जालावर शेल्फ करायची युक्ती मिळाली. एक दोन विडीयोज बघीतले की कशी उघडावी म्हणून, पण त्यांच्यासारखे पॉवर टुल्स नव्हते. मग हॅन्ड सॉ ने सावकाश समोरचा भाग काढून टाकला. सॅन्ड पेपर ने घासून कडा गुळगुळीत केल्या. ऑफव्हाईट अ‍ॅक्रेलीक रंग लावला. होम डीपो मधुन पातळ मोल्डींग च्या पट्ट्या मिळाल्या त्या परत सॉ ने कापून रंगवून, वुड ग्लू ने आत बसवल्या आणि शेल्फ तयार!

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं : भाग दुसरा व्हर्जिनिया ते नेब्रास्का

२२ सप्टेंबर २०१९ : फॉल्स चर्च,व्हर्जिनिया ते मौमी, ओहायो
IMG_20190908_143545712-COLLAGE.jpg

‘हे घेऊ का ते घेऊ की दोन्हीही घ्यावं? थंडीसाठी घेतलेले कपडे पुरेसे होतील का? दोघांचे लॅपटॉप तर हवेतच.’ वगैरे अनंत प्रश्न सोडवण्यात आणि सामानाची भराभरी -उचकाउचकी करण्यात रात्री झोपायला उशीर झाला. पण तरीही लवकर उठून ठरलेल्या वेळेच्या किंचीतच उशीराने आम्ही घर सोडलं.

Keywords: 

द ग्रेट इंडिअन किचन

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream वर आहे मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) छळकुटा निघाला. पाहून एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैंपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय, त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

Keywords: 

लाव्हा स्नेक, स्पॅल्श

सध्या लेक बरीच चित्र काढते त्यातली काही चित्र आणि तिच्या युट्युब चित्राचा व्हिडीओ देते आहे. तिची बरीच चित्र इमॅजिनेरी कॅरॅक्टर्स असतात.
हल्लीच एकांना त्यांच्या चॅनल साठी पण तिने छोटासा व्हिडीओ करुन दिलाय :)

लाव्हा स्नेक

स्पॅल्श

Keywords: 

कलाकृती: 

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle