उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात आहे निलंगा नावाचे लहान तालुक्याचे शहर. हा तालुका उत्तर कर्नाटकातील दुष्काळी बिदर जिल्ह्याला खेटून आहे. तेलंगणा आणि कर्नाटकातून कष्टाची कामं करणारे हजारो लोक येऊन निलंग्याच्या आसपास पसरले आहेत. हातात कमी पैसा, पोटात भूक आणि नीट जेवायलाही वेळ नाही या परिस्थितीतून जन्माला आला निलंगा राईस!
थोडक्या साहित्यात पोट भरणारा पण तरीही चमचमीत! खरं तर निलंग्यात भात शेती नाही, तेलंगणातून आणलेला चांदतारा नावाचा तांदूळ ह्या राईससाठी वापरतात. शहरात भरपूर टपऱ्या उघडल्या, दहा रुपये, वीस रुपये प्लेट अशी किंमत. त्यामुळे अल्पावधीत तो लोकप्रिय झाला.
शनिवारी नेहेमीप्रमाणे इथल्या Marche म्हणजे आठवडी बाजारात गेले होते. मला या बाजारात जायला फार आवडते. सगळ्या सिझनल भाज्या, फळे, मश्रुम्स, मीट, चीज, ब्रेड यांचे एवढे प्रकार बघायला मिळतात की डोळ्यांचे अगदी पारणे फिटते. सध्या एकटीच असल्याने खरेदी फार नसते पण शनिवार सकाळ इथे घालवणे हा आवडीचा कार्यक्रम आहे माझा. तर परवा, माझ्या नेहेमीच्या भाजीवाल्याकडे लालचुटूक मिरच्या दिसल्या. भानामती वगैरे झाल्यासारख्या काही विचार न करता मी त्या घेऊन टाकल्या. मग घरी येऊन याचे काय करायचे हे विचार सुरू झाले. मस्त ताज्या मिरच्या होत्या, फार जहाल तिखट वगैरे नव्हत्या. आणि १०-१२ च होत्या.
आज खूप दिवसांनी आठवण होऊन अंडा मसाला केला. हॉस्टेलला असताना भटकून झाल्यावर रात्री उशीरा डेक्कनच्या रेश्मा नावाच्या स्टॉलवर भुर्जी, अंडा मसाला, अंडा राईस वगैरे खूप प्रकार खात असू. हल्ली ते दुकान गरवारे कॉलेजजवळ आलंय.
तर हे साहित्य:
१. उकडलेली अंडी - ६
२. मोठे कांदे - २
३. लहान टोमॅटो - ३
४. आलं लसूण ठेचा - एक मोठा चमचा
५. कढीपत्ता - भरपूर
६. नारळाचे खाद्यतेल/गोडेतेल
७. मिरची पूड
८. धने जिरे पूड
९. हळद
१०. गरम मसाला
११. मीठ
१२. कोथिंबीर
१३. पुदिना
Hello सर्वांना .
9 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर अशी असम मेघालय ही ट्रिप मी नवरा आणी मुलगी अशी केली.
याचे प्लॅनिंग खूप आधीपासून म्हणजे डिसेंबर 24 पासून सुरू होते . आधी मे मधे जाणार होतो पण काही कारणाने ते जमले नाही.
ऑफीस घर काम याने आम्ही दोघे अन शाळा परिक्षा या चक्रात फिरून परी कंटाळून गेली होती.
तिची सहामाही 7 ऑक्टोबर ला संपणार होती. Yearly planner मधे ते दिलेले होते.
मग पुन्हा एकदा प्लॅन तपासून पाहिला अन पटापट बुकिंग केले.
हॅनोवर, जर्मनीतील सिनियर केअर नर्सिंग होममध्ये काम करत असतांना काही वेळा अशी व्यक्तिमत्व मला भेटतात, जी बघून मला वाटतं की मी त्यांची सायकॉलॉजिस्ट आहे की ते माझे? काल ज्यांच्याशी ओळख झाली, त्या आज्जींबाबतीत मला असंच वाटलं. ११.११.४४ अशी युनिक जन्मतारीख असलेल्या या जर्मन आज्जीही अतिशयच युनिक आहेत.
या महिन्यात १० ऑक्टोबरला आमच्या संस्थेत दाखल झालेल्या या आज्जी त्याच दिवशी माझी सुट्टी सुरू झाल्याने माझ्या संपर्कात येऊ शकल्या नाहीत.