December 2025

The whole nine yards बद्दल आणि निमित्ताने

गेली काही वर्षे कोकणपट्ट्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास झाला की शक्य झाल्यास तिथल्या नव्वारी(किंवा थोडी कमीजास्त पण काष्टा असलेली) नेसण्याच्या पद्धती गोळा करण्याचा माझा प्रयत्न असतो.
2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सारीज:ट्रॅडिशन अँड बियॉण्ड या रिता कपूर लिखित संदर्भग्रंथात मराठी साड्यांच्या संदर्भात याप्रकारचे किंचित योगदान दिले होते त्यानंतर हे काम मी सुरू केले.

Keywords: 

सूर्य माध्यान्हीचा

वेचता सूर्य माध्यान्हीचा
सांजस्वप्न डोळ्यांत रेखले,
गंधवेड्या फुलांचे पुरे झाले कौतुक सोहळे
थोडा पाचोळाच वेचून सजवूयात संगे.
नकोच ती रेशमी सांज केसरफुले,
नकोच जिवाला तो मृगातला गारवा,
संगतीने तुझ्या निष्पर्ण फांद्यांतून झिरपता
रखरखीत ऊन होईल की मधाळ, हळुवार रे सखया.
हक्काच आपल ऊन, कशा झुरावे सावलीसाठी
चल पाहुया तळपून आज आपल्यासाठी,
चल पाहुया तळपून आज आपल्यासाठी.
- उज्वला

Keywords: 

कविता: 

फॅमिली कम्स फर्स्ट

खूप दिवसापासून एखादा हलकाफुलका / अगदी डोके बाजूला काढून ठेवता येइल असा कार्यक्रम बघावा अशी इच्छा होत होती. नेटफ्लिक्सवर "डायनिंग विथ कपूर्स" नावाचा कार्यक्रम दिसला. अगदी १ तासाचा असल्याने फार कंटाळा येणार नाही आणि टाइमपास होइल ह्या आशेने चालू केला.

राज कपूरच्या १०० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या नातवाने अरमान जैन कपूर कुटुंबियांसाठी एक जेवण आयोजित केले होते. अरमान जैनने कपूर कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ, राज कपूर ह्यांच्या पत्नी कृष्णा कपूर ह्यांच्या रेसिपीज स्वतः बनविल्या होत्या. शशी कपूर आणि शम्मी कपूर ह्यांच्या काही कुटुंबिंयानीसुद्धा येथे हजेरी लावली होती.

लेख: 

ठकू आणि लच्छी

उतड धाग्यावर वृंदाने लच्छीच्या मोराची आठवण काढली. मग मला 17-18 वर्षांपूर्वी माबो दिवाळी अंकासाठी लिहिलेलं काहीतरी आठवलं. ते इथे आणायला योग्य आहे असं वाटलं. मलाही माझं लिखाण परत वाचायची गरज होतीच.

------

एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.

Keywords: 

लेख: 

धुरंधर! … मेरा हौसला भी अय्याश है …

dhurandhar-trailer.jpg
ना तो कारवाँ की तलाश है,
ना तो हमसफर की तलाश है..

परवा मुव्ही पाहिल्या क्षणापासून ह्या ओळी डोक्यात घुमतायेत. नुसतं गाणंच नाही तर आख्खा धुरंधर डोक्यातून जातच नाहीये..