गेली काही वर्षे कोकणपट्ट्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही प्रवास झाला की शक्य झाल्यास तिथल्या नव्वारी(किंवा थोडी कमीजास्त पण काष्टा असलेली) नेसण्याच्या पद्धती गोळा करण्याचा माझा प्रयत्न असतो.
2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सारीज:ट्रॅडिशन अँड बियॉण्ड या रिता कपूर लिखित संदर्भग्रंथात मराठी साड्यांच्या संदर्भात याप्रकारचे किंचित योगदान दिले होते त्यानंतर हे काम मी सुरू केले.
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण मोठा झाल्यावर काय होणार? म्हणजे जे ठरवलेलं असतं ते पूर्ण होतच किंवा मोठे होईपर्यंत ते मत ठाम राहतच असं नाही. आमच्या घरात आई शिवणकाम करायची आणि बाबा उत्तम टेलर होते. वेळ मिळेल तेव्हा आईला मदत करायचे. त्यांची एक शिलाई सुद्धा इकडची तिकडे होतं नसे. तर लहानपणापासूनच मी हे बघत आले. आणि बघता बघता शिकत आले. दहावी नंतर फॅशन डिझाईनिंग चा अभ्यास करावा असं वाटत होतं पण काही कारणांनी शक्य नाही झालं. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉमर्स मध्ये गेलो. पदवी नंतर एक वर्ष नोकरी करून शॉर्ट टर्म फॅशन डिझाईनिंग चा कोर्स केला.