कभी यूँ भी तो हो (कथा)

"जो! नॉट फेअर! असा ओठ बाहेर काढून, डोळ्यातून कितीही मध सांडलास ना तरी मी अजिबात पाघळणार नाही. तू माझ्याशेजारी झोपू शकत नाहीस, ok? उतर आधी, जा बरं तुझ्या बेडवर. गो!" मनवा समोर बोट दाखवत जास्तीत जास्त कडक दिसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

दुःखी तोंड करत, नाईलाजाने जोई खाली उतरला. त्याच्या निळ्या मऊ अंथरुणात गुबगुबीत पंज्यांवर त्यांचं सुरकुतलेलं, गोंडस तोंड ठेऊन तिच्याकडे पुन्हा आशेने पाहू लागला. हसून खाली उतरून मनवाने हळूच त्याच्या डोक्यावर थोपटून त्याचं आवडतं, त्याच्या लाडक्या मालकिणीने विणलेलं ब्लॅंकेट त्याच्या कानांपर्यंत ओढून घेतलं. "गुड नाईट!" म्हटल्यावर लगेच ब्लॅंकेटमध्येच हललेलं छोटंसं गोल शेपूट दिसल्यावर तिला हसूच आलं. "कसला गोडू आहेस रे तू.." हळूच पुटपुटत तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

pinkrose.jpeg

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १

"जो! नॉट फेअर! असा ओठ बाहेर काढून, डोळ्यातून कितीही मध सांडलास ना तरी मी अजिबात पाघळणार नाही. तू माझ्याशेजारी झोपू शकत नाहीस, ok? उतर आधी, जा बरं तुझ्या बेडवर. गो!" मनवा समोर बोट दाखवत जास्तीत जास्त कडक दिसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

दुःखी तोंड करत, नाईलाजाने जोई खाली उतरला. त्याच्या निळ्या मऊ अंथरुणात गुबगुबीत पंज्यांवर त्यांचं सुरकुतलेलं, गोंडस तोंड ठेऊन तिच्याकडे पुन्हा आशेने पाहू लागला. हसून खाली उतरून मनवाने हळूच त्याच्या डोक्यावर थोपटून त्याचं आवडतं, त्याच्या लाडक्या मालकिणीने विणलेलं ब्लॅंकेट त्याच्या कानांपर्यंत ओढून घेतलं. "गुड नाईट!" म्हटल्यावर लगेच ब्लॅंकेटमध्येच हललेलं छोटंसं गोल शेपूट दिसल्यावर तिला हसूच आलं. "कसला गोडू आहेस रे तू.." हळूच पुटपुटत तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

बेडवर जाऊन तिने चारी बाजूचे पातळ पडदे ओढून घेतले. ही खास अरुआंटीची स्पेशालिटी! फोर पोस्टर बेड! आंटीला जुनं लाकडी पारसी फर्निचर फार आवडायचं. हा गेस्ट बेड, लिविंग रूममधला तिचा लाडका बुक शेल्फ, अति नक्षीकाम केलेला लहानसा टी पॉय, त्याच सेटमधला एक नक्षीदार अल्मिरा, एक क्रोकरी शोकेस आणि असे असंख्य पिसेस तिने कुठून, कुठून जमवले होते काय माहीत. पण जे काही इंटिरियर होतं ते फार क्लासी होतं.

अरुणीमा भट्टाचार्य, मनवाची फॅमिली फ्रेंड आणि आता 'AMP Legal' नावाच्या त्यांच्या लॉ फर्मची सिनियर पार्टनर. मनवा गोखले आणि पारुल पटेलने इंटर्नशिपपासून साधारण सात, आठ वर्ष प्रॅक्टिस केल्यावर अरुणीमाने त्या दोघींना पार्टनर करून बराचसा वर्कलोड हँडओव्हर केला होता. आज अचानक अरुआंटीने रात्री साडेआठला फोन करून मनवाला घरी रहायला बोलावून घेतलं, तेव्हा ती जरा घाबरतच त्यांच्या घरी गेली होती. ती आणि अंकल काही जुजबी गोष्टी सांगून, जोईला तिच्या हवाली करून घाईने निघून गेले तेव्हा मनवा जरा रिलॅक्स झाली. आज दिवसभराच्या मिटींग्ज आणि आर्ग्युमेंट्सनंतर तिला जरा एकांत हवाच होता.

जोई घोरायला लागल्यावर तिने उशीखाली ठेवलेला फोन उचलला. सगळ्या नोटिफिकेशन्स चेक करून, काही क्लायंट मेल्सना रिप्लाय झाल्यावर नेहमीप्रमाणे ती रेडीटच्या जत्रेत घुसली. हो, जत्रेतल्या खेळण्यांसारखंच तिला वेगवेगळे थ्रेड्स आपल्याकडे ओढून घेत होते पण एक दोन गोष्टी वाचून तिने निग्रहाने फोन बाजूला ठेवला. डोक्यावरून ब्लॅंकेट ओढून घेतल्यावर खिडकीच्या काचेवर बारीक पावसाची पिटपिट आणि वाऱ्याचा आवाज अंधुक ऐकू येत होता.

याआधी ती या घरात कधी रहायला अशी आली नव्हती. नवी जागा आणि  तिथल्या बारीक बारीक आवाजांमुळे तिला शांत झोप लागत नव्हती. "कमॉन यार. इट्स ओss के.." म्हणत एक जांभई देत ती झोपेच्या अधीन झाली.

बऱ्याच वेळाने अचानक ती बेडमध्येच थाडकन उठून बसली तेव्हा तिचं तिलाच कळेना की अचानक कशाने बरं जाग आली.. जोई अजून फुरफुरत घोरतच पडला होता. हाच आवाज असणार, हुश्श म्हणून ती झोपणार इतक्यात बाहेरून धप्प! आणि मग खुर्ची सरकवल्याचा खर्र.. आवाज आला. "शिट!.. नक्कीच चोर घुसलाय घरात. काय करू.. काय करू.." म्हणत तिने ब्लॅंकेट अजूनच गुडघ्याभोवती आवळून घेतले.

भाग २

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - २

भाग १

मनवा, इडियट! घाबरतेस कसली, किती क्रिमिनल केसेस पाहिल्यास तू.." "अरे पण मी कॉर्पोरेट प्रॅक्टिस करते, क्रिमीनल थोडीच!" दुसरं वकिली मन लगेच म्हणालं.
"पोलिसांना कॉल करू शकते की.." म्हणत तिने मोबाईल पाहिला तर नो नेटवर्क. "व्हॉट द.. रोजचं नाटक आहे हे" म्हणत तिने करकरून दात आवळले. "काहीतरी करायलाच हवं. काय करू.. काय करू" म्हणत तिने इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात तिला कोपऱ्यातल्या डिस्प्ले वर ठेवलेली क्रितीची बॅट दिसली. क्रिती आता आतापर्यंत प्रोफेशनल क्रिकेट खेळत असे. अर्थात सध्याच्या स्थितीत तिला खेळणे शक्यच नव्हते म्हणून ब्रेक घेतला असेल.

हलकेच तिने पाय, गार फरशीवर टेकवले. चवड्यांवर चालत, आवाज न करता बॅट मुठीत घट्ट पकडली आणि दरवाजा किलकिला केला. हॉलमध्ये तरी पूर्ण काळोख होता. शूरपणाचा आव आणत तिने हलकेच पाऊल बाहेर टाकले. तिने डावीकडच्या किचन एरियात हळूच नजर टाकली तर लाकडी डिव्हायडरमधून उजेडाची तिरीप दिसत होती.

चोर आल्या आल्या किचनमध्ये घुसतात? भांडी-कुंडी इतकी महाग झालीत काय! विचित्रच प्रकार दिसतोय.. थंड पडलेल्या हातांनी बॅटवरची मूठ घट्ट आवळत ती किचनच्या दारात आली. मंद उजेडात ओट्याजवळ दाराकडे पाठ करून एक उंच, काळी आकृती दिसत होती. अचानक त्याने जोरात हात हलवला आणि एक सुरीचं पातं चमकलं.

तिला स्वतःलाच कळलं नाही तिच्या अंगात कुठून इतकी ताकद आली, अचानक जाऊन तिने बॅट त्याच्या पाठीला टेकवली आणि जोरात ओरडली, "हात वर! मी पोलिसांना फोन केलाय आणि माझ्याकडे डेंजरस कुत्रा आहे, जराही हलू नको."

"हेय.. ओके. फाईन. सी?" त्याने सुरी ओट्यावर ठेऊन हात वर केले तर हातात रिकामं पिवळं रॅपर होतं आणि गॅसवर नूडल्स उकळत होते. "डेंजरस कुत्रा? यू मीन जोई? आय बेट तो घोरत असेल आतासुद्धा" तो गालातल्या गालात हसत म्हणाला आणि डावा हात पुढे करून त्याने हळूच तिच्या हातातून बॅट काढून घेतली.

"ओह.. अँड हू.. आर..  यू? आणि तू आत कसा आलास?" पहिल्यांदाच तिचे त्याच्याकडे नीट लक्ष गेले आणि ती मान वर करून बघतच राहिली. केवढा उंच आहे हा, सहाच्या वर नक्कीच.. हाच पहिला विचार आला तिच्या मनात. पांढऱ्या शर्टवर घातलेला ब्लॅक स्वेटर आणि लाईट ब्लु जीन्स. डायनिंग टेबलाच्या आजूबाजूला उमटलेले ओलेत्या पावलांचे ठसे. पावसातून आत येताना त्याच्या केसात आणि लांब पापण्यांवर साचलेले थेंब चमकत होते, सरळ, लांब नाकाच्या टोकावर एक पाण्याचा थेंब सलगी करत थांबून राहिला होता आणि त्याहून चमकत्या, मिश्किल डोळ्यांनी हसत तो काहीतरी बोलत होता.

तिने एकदम तंद्रीतून जागी होऊन समोर पाहिले.
"इंद्रनील रायचौधरी. धिस इज माय मासीज हाऊस! अँड आय हॅव 'द की'! तो भुवया उंचावत म्हणाला.  "बाय द वे, हू आर यू?? ऍट धिस टाइम, अँड वेअरिंग धिस?"

त्याबरोबर चमकून तिला आठवलं की आपण फक्त ड्रामा क्वीन लिहिलेला, मिनी माउसचं चित्र असलेला पातळ होजियरी ड्रेस घातलाय आणि तो जेमतेम मांडीपर्यंत पोचतोय. शरमून तिचे गाल लालेलाल झाले पण तिने काहीच न झाल्याप्रमाणे कशीबशी आपली ओळख सांगून, अरुआंटी आणि अशोक अंकल क्रितीला भेटायला गेल्याचे सांगितले.

"आह, ओके. वॉन्ट सम मॅगी?" तो गॅसकडे वळत म्हणाला आणि तिने तिच्या खोलीत धूम ठोकली.

भाग ३

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ३

भाग २

दाराला कडी लावून तिथेच टेकून ती जरा उभी राहिली. छातीतली धडधड अजून पूर्ण थांबली नव्हती. मग बेडवर बसून तिने आधी पाण्याची बॉटल तोंडाला लावली. घटाघट थंड पाणी घशाखाली उतरल्यावर तिच्या हृदयाचे ठोके जरा शांत झाले.

आता तिचा मेंदू एकेक गोष्ट प्रोसेस करायला लागला.
नोटिफिकेशन १. हे मान्य करायला तिला खूप त्रास होत होता, पण या क्षणाला तिने टोटल माती खाल्ली होती. हा काही कोणी चोर, खुनी किंवा सिरीयल किलर नसून साधा अरुआंटीचा भाचा होता.

नोटिफिकेशन २. दुसरी तिच्या काळजात पार कळ आणणारी बातमी म्हणजे हा माणूस तिने आतापर्यंत पाहिलेला सगळ्यात देखणा, हँडसम नमुना होता. त्याचे शार्प फीचर्स, दाट रेशमी केस (ज्यातून तिला जाम बोटं फिरवावीशी वाटत होती), रुंद खांदे, जिमिंगची साक्ष देणारी मजबूत छाती आणि ऍब्ज!

आणि नोटिफिकेशन ३. त्याचे डोळे! मस्कारापण फिका पडेल अश्या लांब वळलेल्या पापण्या आणि डार्क चॉकलेटी रंगाचे चमकदार डोळे! जे तिला चेकआऊट करताना तिच्या अंगावर शहाऱ्यांची नक्षी उमटवत गेले होते. हे आठवूनही पुन्हा तिचे गाल जरा लाल झाले.

हा माणूस आपल्या फक्त एक भिंत पलीकडे झोपला आहे या विचारानेच तिची झोप उडून गेली होती. उशिरा कधीतरी हळूहळू तिचे डोळे जडावून बंद झाले.

सकाळी साधारण पावणेआठ वाजता तिला कानाजवळ काहीतरी हुळूहूळून जाग आली. ती आळस देत उठली तर तिच्या पोटावर एक पंजा टाकून जोईबुवा आरामात ब्लॅंकेटमध्ये घुसून तिचा गाल चाटत होते. हसतच उठून "यू नॉटी ओल्ड बॉय" ओरडत तिने त्याला उचलून खाली ठेवले आणि दार उघडले. जोईने लगेच उघड्या दारातून बाहेर सूर मारला. ब्रश वगैरे करून तिने टीशर्ट, स्लॅक्स चढवली. तिचे कुरळे केस उंच पोनीटेलमध्ये अडकवत ती बाहेर आली तेव्हा सगळीकडे सामसूम होती. टेरेसच्या सरकवलेल्या काचेकडून जोईचा आवाज येत होता.

तिथे पोचल्यावर समोर मोठ्या लालभडक फुलांनी भरलेल्या जास्वंदीच्या कुंडीखाली पसरून जोई त्याच्या डॉग डिशमधून बकाबक त्रिकोणी शेपचे किबल मटकावत होता. त्याच्या शेजारीच काळ्या गुबगुबीत फॅब्रिक सोफ्यावर इंद्रनील हातात एक ढब्बू मग घेऊन मन लावून ET वाचत बसला होता. कालचे फॉर्मल्स जाऊन आता तो शॉर्टस आणि टीशर्टमध्ये होता. टी शर्टच्या अवस्थेकडे पाहून कळत होते की तो नुकताच त्याची मॉर्निंग रन संपवून आलाय. 'ऊफ! हे हेल्थ फ्रीक्स' म्हणत मनातल्या मनात तिने डोळे फिरवले. त्याचे शॉर्टस घातलेले लांबलचक पाय आणि कोरीव पोटऱ्या बघून तिने एक खोल श्वास घेतला. 'ह्याला सगळ्याच शॉर्टस किती शॉर्ट होत असतील ना' तिच्या मनात विचार आला, 'नॉट दॅट आय माईंड!' म्हणत तिने स्वतःलाच डोळा मारला.

त्याच्या समोर टेबलवर ब्रेड, बटर, नाईसची साखर लावलेली बिस्किटं, चहाची केटल, दूध, साखर आणि अजून एक मग असा सगळा जामानिमा मांडलेला होता. ती दारात उभी राहून हा विचार करताना अचानक तिला दिसलं की तो पेपर बाजूला करून आपल्याकडे मजेत एक भुवई वर करून बघतोय. तिचं आपल्याकडे लक्ष गेलंय खात्री झाल्यावर तो जरा मोठ्यानेच "गुड मॉर्निंग!" म्हणाला. क्षणभर जोईनेही बिचकून मान वर करून पाहिलं पण काही इंटरेस्टिंग न दिसल्याने लगेच खाली मान घालून आपले चाप-चूप आवाज सुरू केले.

"गुड मॉर्निंग" म्हणत हसून ती त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली. "आय होप तुला मी केलेला चहा चालेल.. अदरवाईज आय एम व्हेरी स्केअर्ड ऑफ क्रिकेट बॅट्स हां! ह्या वाक्यावर दोघेही खळखळून हसले. "शुगर?" "एक स्पून".

"सो टेल मी, व्हाय अरुमासी हॅड टू लीव्ह सो सून? एनी प्रॉब्लेम? तिच्या हातात चहाचा मग देता देता जरा गंभीर होत त्याने विचारले.

"क्रिती हॅज सम हेल्थ प्रॉब्लेम अँड हर गायनो रेकमेंडेड बेडरेस्ट टिल ड्यु डेट. सो दे हरीड विदाऊट थिंकिंग एनीथिंग.." ती बोलत असताना त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. "डोन्ट वरी, ती नीट आहे आता" म्हणत तिने जरा दिलासा दिला.

"ओह, मला माहित असतं तर मी जरा लवकर आलो असतो" तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याला लगेच कारण कळलं.
"डोन्ट बी सरप्राईज्ड! मराठी येतं मला थोडं थोडं. माझी मराठी टीचर चांगली होती. बॉर्न अँड ब्रॉट अप इन बॉम्बे."

"मुंबई!"

"येस, मुंबई!" म्हणून त्याने हसत तिला अंगठा दाखवला.

"सो, मी गेले दहा दिवस सिंगापोरमध्ये होतो. I work in advertizing so always on my toes, client visits n all.. कालच मुंबईत उतरून कॅबने डायरेक्ट पुण्याला आलो, सरप्राईज व्हिजिट म्हणून. मासीला त्रास नको म्हणून गुपचूप मॅगी खाऊन झोपणार होतो तेवढ्यात माझ्यावर अटॅक झाला! सॉरी, यू मस्ट बी स्केअर्ड..

"इट्स ओके, खरी भिती तुला वाटायला हवी होती!" ती डोळे मोठे करत म्हणाली आणि तो पेपर तोंडासमोर धरत हसायला लागला.

बाहेर कोवळ्या उन्हात रिमझिम पाऊस सुरू झाला होता..

भाग ४

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ४

भाग ३

त्याच्या मखमली आवाजाने तिच्या मनावर गारुड केले होते. आजूबाजूच्या पावसाच्या आवाजातसुद्धा तिला फक्त त्याचा आवाज ऐकू येत होता. 'नो वंडर, हा एवढी काँट्रॅक्टस साइन करत असतो. नुसते याला बघूनच लोक हा म्हणेल तिथे सही करत असतील..' विचार करत तिने ओठ चावला. 'पण सिक्स प्लस.. बघ विचार कर, हाही त्यातलाच असणार. ही विल टॉवर ओव्हर मी. पुन्हा सगळं तेच. तू एकदा ठरवलस ना मॅक्स ५.८, ५.९, मग बस.  कम ऑन! तू खूप स्ट्रॉंग आहेस. इग्नोर कर हे सगळे विचार..' पुन्हा वकील जागी झाली.

"जोई जस्ट लव्हज इटिंग दिस किबल. मी त्याला दोन तीन ट्रीटस पण आणल्या आहेत. पण त्याला आता नाही देणार. ही'ज अ फूडी ऑल राईट! त्याला डाएट आणि रोज पळवायची गरज आहे. काउच पटेटो झालाय घरात बसून." इंद्रनील म्हणाला.

"ही'ज जोई आफ्टरऑल! वोन्ट शेअर हिज फूड! काल रात्रीच त्याने हट्टाने एक प्लेट भरून भापा इलिश खाल्लाय" मनवा हसत म्हणाली.

"ओह येस, अरूमासी इज अ टोटल फॅनगर्ल. शी लव्हज फ्रेंड्स. भापा इलिश?? इज इट स्टिल देअर?" त्याने उत्सुकतेने विचारले.

"आहे फ्रीजमध्ये." तिने जरासं नाक मुरडंत सांगितलं.

आय'ल हॅव इट फॉर लंच देन.." फिशच्या नावानेच त्याचे डोळे लहान मुलांसारखे चमकत होते.

"मासीसे याद आया, मासीचा बेंगलोरहून परत यायचा काय प्लॅन आहे? कॉझ ड्यू डेट इज ऑलमोस्ट अ मंथ अवे.." त्याने विचारले.

"अरुआंटी मला म्हणाली की ऍट लीस्ट एक आठवडा तरी लागेल. मला सध्या कोर्ट व्हिजिट्स नाहीयेत, मोस्टली रिसर्च आणि काही ड्राफ्टिंग करायचं आहे. सो आय वॉज गोइंग टू वर्क फ्रॉम होम अँड ऑफ कोर्स बेबीसीट जोई! नाउ दॅट यू आर हिअर, मी घरी जाते. यू कॅन बेबीसीट जोई ना?"

तिने जोईकडे पाहिलं तर तो मस्तपैकी पसरून फूड कोमा मध्ये गेला होता. "त्याला दोन-दोन सिटर्सची गरज नाही" ती जरा स्ट्रिक्ट होऊन म्हणाली. तिला आता लवकरात लवकर इथून पळ काढायचा होता. जितकी जवळ राहीन तितकं वितळायला होईल. ह्याच्याबद्दल जे काही वाटतंय ते लांबूनच वाटू दे..

"व्हॉट? नो.. डोन्ट डू दॅट!" त्याच्या तोंडून पटकन निघून गेलं.  'नो वे.. ह्या अट्रॅक्टीव, गोड, सॅसी आणि मूहफट मुलीला जाऊ द्यायचं? परत कधीच दिसणार नाही ही.. आय एम क्रेव्हिंग हर कंपनी मोर अँड मोर.. कमॉन नील! युज ऑल युअर स्किल्स!' त्याच्या मनात आलं.

तिच्या हातातलं अर्ध बिस्कीट चहात गळून पडलं आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिली.

घसा खाकरून त्याने बोलायला सुरुवात केली,
"ऍक्चुली.. देअर्स अ प्रॉब्लेम. मी सरप्राईज म्हणून आलो असलो तरी मला इथे काही मिटींग्स आहेत, मी दिवसभर बाहेरच असेन. मोस्टली रात्री उशिरा परत येईन. इफ यू आर वर्किंग फ्रॉम होम, आय थिंक यू शूड स्टे अँड वर्क. नाहीतर 'जोई' खूप लोनली फील करेल दिवसभर. ही लव्हज कंपनी. प्लीज.. यू वोन्ट इव्हन नो दॅट आय एम हिअर.." बरोबर त्याचं ते मिलियन डॉलर स्माईल!

त्याच्या परफेक्ट धनुष्याकृती ओठांकडे लक्ष जाताच तिच्या मणक्यातून वीज सळसळत गेली. काय बोलावे न सुचून तिने फक्त मान डोलावली.

"फक्त ती बॅट कुठेतरी लपवून ठेवावी लागेल" तो डोळे मिचकवत म्हणाला.

"हम्म.." एवढंच ती बोलू शकली आणि इतका वेळ विसरलेला श्वास गप्पकन घेतला.

"सो डील? वी'ल बोथ स्टे हिअर. व्हॉट डू यू से? साइण्ड, सील्ड अँड डिलिव्हर्ड!" पुन्हा गालात हसत तो म्हणाला, दोन दिवसांच्या स्टबलमधूनही त्याची खळी लपत नव्हती.
"टुगेदर.. "

भाग ५

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ५

भाग ४

'मनवा गोखले'
हे नाव त्याच्या मनात ओल्या वाळूतल्या पावलांसारखं पुन्हापुन्हा उमटून जात होतं. मिड जूनचा रिमझिम ऊन - पाऊस आणि लंच अवरनंतरचा तुरळक ट्रॅफिक असलेला बंडगार्डन रोड या दोन्ही जमून आलेल्या गोष्टींमुळे तो रिलॅक्स होऊन ड्राइव्ह करत होता. "मनवा! कुछ तो बात है बंदीमें" असं तो मोठ्याने बोलून गेला.

त्याच्या डोक्यात ती इतकी स्पष्ट कोरली गेली होती की आताही ती शेजारी बसल्याइतकी त्याला जाणवत होती. लहानखुरी, तिचे खांद्यावर पसरलेले कुरळे मध्येच लालसर स्ट्रीक्स चमकून जाणारे केस, घारे पण तितकेच नितळ, निरागस डोळे, इवलेसे सरळ नाक आणि नाजूक टपोरे ओठ! दोन्ही मऊ हातांच्या कोपरापर्यंत आता फेड होत चाललेली मेहंदी. ओह आणि तिच्या त्या नर्डी क्युट नाईट ड्रेसमधून दिसलेले  ऍबसल्युटली टू डाय फॉर कर्व्हज.. हाऊ कुड ही मिस दॅट! ती अख्खी रात्र त्याने कूस बदलत बदलत घालवली होती. त्यात थकव्याचा भाग असला तरी मोठा भाग भिंतीपलिकडे असलेल्या मनवाचाही होता.

हवी ती कंपनी शोधून त्या ऑफिसमध्ये पोचल्यावर त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. प्रेझेन्टेशन देता देता एकदोन वेळा फंबल झाल्यावर त्या लोकांनी जेट लॅग असेल म्हणून सांभाळून घेतलं. कॉन्ट्रॅक्ट साइन होऊन परत निघाल्यावर त्याचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसत नव्हता. इतका आतपर्यंत तो आजवर कुणामुळेच अफेक्ट झाला नव्हता. अगदी बाबामुळेही नाही.

तो पाचवीत असतानाच माँला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आणि घराचं वातावरणच बदलून गेलं. आधी तिची औषधं, सारखे हॉस्पिटल व्हिजीट्स आणि सहा महिन्यात तिच्या जाण्याने घरभर भरून राहिलेलं दुःख यातून त्याचे बाबा कधी सावरलेच नाहीत, त्यांचं जग दिवसभर फक्त त्यांच्या शेअर ब्रोकिंग फर्ममध्ये कामाला वाहून घेणे आणि संध्याकाळी पिणे इतकंच उरलं होतं. इंद्रनीलला देण्यासाठी त्यांच्याकडे प्रेमच शिल्लक नव्हतं..

पुढची सगळी वर्ष पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये काढून इंद्रनील मोठा झाला होता. प्रत्येक सुट्टीत त्याला प्रेम देणारं एकच घर होतं, ते म्हणजे अरुमासी आणि अशोकअंकल. सख्ख्या आईवडिलांसारखेच प्रेम त्यांनी नीलला दिले होते. नील जमशेदपूरला एमबीएच्या सेकंड यरला असताना त्यांच्या बाबांनी मुंबईत दुसरे लग्न केले, तेव्हापासून तर त्याने त्यांच्या नावाचा कप्पाच मनात बंद करून टाकला होता. नंतर प्लेसमेंटस झाल्यापासून त्याने स्वतःला कामात असे झोकून दिले की बाकी काही विचार करायला वेळच मिळणार नाही. मुंबईत रहाण्याची वेळ आलीच तर तो त्याच्या अंधेरीच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये रहाणे प्रीफर करे.

एजन्सीच्या कामामुळे देशोदेशी, चित्रविचित्र वेळी प्रवास या सगळ्याने तो हल्ली कंटाळला होता. कॉलेजमधल्या डेट्स आणि नंतर एखाद दोन कॅज्युअल रिलेशनशीप्स झाल्या पण त्याच्या अश्या स्केड्युलमुळे त्यात काही अर्थ नव्हता. न संपणाऱ्या होटेल रूम्स, अनस्टेबल लाइफस्टाइल हे सगळं आधी छान वाटलं तरी आता बत्तीसाव्या वर्षात आल्यावर त्याला एक आपलंसं घर, आपली प्रेमाने वाट बघणारं कुणीतरी असावंसं वाटायला लागलं होतं हे त्याने मनात मान्य करून टाकलं.

मनवा गोखले! काय शोधतो आहे मी तिच्यात? ती अशी आपल्याला अचानक भेटण्यामागे काय अर्थ आहे? कदाचित हीच ती मुलगी आहे जी मला समजून घेईल.. हीच माझी सोलमेट असेल का? माहीत नाही, पण माहिती करून घेण्याची प्रचंड इच्छा आहे. अश्या अनंत विचारांचा गोंधळ डोक्यात घेऊन त्याने कार रिव्हर्स घेतली आणि गेटकडे गेला. मेन रोडवर पाऊस आणि गाड्यांचा चिखल झाला होता. त्यातून एकेक सिग्नल कंटाळून पार करताना एफएम मधून एकावर एक जाहिराती आणि पकाऊ गाणी गळत होती.. तेवढ्यात अचानक 'मनवा लागे.. लागे रेss सावरे..' सुरू झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.

त्याने गाडी पेट्रोल पंपाबाहेरच्या फ्लोरिस्टसमोर थांबवली आणि निशिगंधाचा एक जायंट गुच्छ विकत घेतला. संध्याकाळच्या भयंकर ट्रॅफिकमधून औंधला घरी पोहोचायला त्याला साडे सहा वाजले. अशोक अंकलची कॅम्री गॅरेजमध्ये पार्क करून, एका हातात निशिगंधाचा गुच्छ धरून त्याने हळूच दार उघडलं, एक खोल श्वास घेतला आणि "मनवाss आय एम होम!" म्हणून ओरडला.

भाग ६

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ६

भाग ५

मनवा टेरेसमध्ये बहरलेल्या बागेला स्प्रेने पाणी घालत होती. जास्वंदीच्या जोडीला मोगरा भरगच्च फुलांच्या भाराने वाकून उभा होता. एक डवरलेला देशी गुलाबपण ग्रिलला चिकटून फरशीवर गुलाबी सडा सांडत होता. दुसऱ्या कॉर्नरला मनवाची आवडती गुबगुबीत सक्युलंट्स होती. पावसाला नुसतं बघूनच हरखून टवटवीत झाली होती बिचारी बाळं. आता तिने ग्रीलवर पसरलेल्या हिरवापांढरा अ‍ॅबस्ट्रॅक्ट रंग फासल्यासारख्या ग्लेशियर पोथोसची धुळकट पानं धुवायला सुरू केली. जोईची कुंड्यांमधून लुडबुड सुरू होती. तो जरा पायाजवळ आला की मनवा लगेच हसत ओरडून त्याच्यावर स्प्रे उडवत होती. शेवटी तो दमून दुर्वांच्या पसरट कुंडीशेजारी फतकल मारून एकएक पातं चघळत बसला.

अचानक इंद्रनीलची हाक आल्यावर मनवा चमकून ताठ उभी राहिली. 'आत्ता? इतक्या लवकर का आला हा परत?? मला परत दिसणार नव्हता ना हा, मग?' तिच्या मनात विचार धडाधड एकमेकांवर थडकले. तरी पण त्याच्या तोंडून तिचे नाव ऐकून तिच्या ओल्या हातांवर काटा फुलून आला होता. जोरदार धडधड आणि उष्ण श्वास सगळंच एकत्र आलं होतं. का? ते माहीत नाही आणि तिला माहिती करूनही घ्यायचं नव्हत! दिवसभर ती त्याला मुद्दाम विसरून गेली होती. त्याचा चेहरा जरा जरी तिच्या मनात डोकावला तरी त्याला मागे ढकलून देत होती. त्याचा तो अंतर्बाह्य हलवून टाकणारा मखमली आवाज ऑलमोस्ट विसरली होती, ऑलमोस्ट.. आत्ता ऐकेपर्यंत.

तिला इंद्रनीलमुळे हे जे काही होत होतं ते अजिबात व्हायला नको होतं. 'मनवा! स्टे अवे!' तिने स्वतःलाच दटावलं. 'प्लीज तुझा वेळ असा घालवू नको, तेही पुण्यात चार दिवस टेम्पररी आलेल्या माणसावर.. शिवाय तो ६.१ तरी आहे. जवळपास फूटभर उंच! तुझा रूल आठव. हाही राहुलसारखाच असणार. तुला बरोबरीचा समजणारा माणूस शोध. एकदा सवयीचा झाला की हाही तुला कुक्कुलं बाळ समजून खिशात घालायचा प्रयत्न करणार. प्रत्येक गोष्टीत अडवणूक. प्रत्येक गोष्टीत बॉसिंग.. ना तुझ्या मतांना काही किंमत राहील ना तुझ्या विचारांना. फक्त कायम इन्फीरीयर राहायचं. यू हॅड इनफ ऑफ धिस ऑलरेडी.' भूतकाळ आठवून मनवाच्या डोळ्यातली चमक आता नाहीशी झाली होती. 'आता तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे मि. रायचौधरी, अ‍ॅडव्होकेट मनवा गोखले तुमच्या अ‍ॅडव्हान्सेसना दाद देणार नाही!'

"मनवाss" पुन्हा खालून हाक आल्यावर ती हाताने तोंडावर आलेल्या बटा बाजूला करत जिन्यात आली. तिच्या मागोमाग जोई दुडदुडत आला आणि नीलला बघून उड्या मारत जिन्याखाली उतरला. आनंदाने भुंकून भुंकून, उड्या मारत, शेपूट हलवत नीलला खाली बसायला लावून, त्याच्या खांद्यावर पाय ठेऊन त्याच्याकडून लाड करून घेतल्यावरच तो जरा शांत झाला. मनवा शेवटच्या पायरीवर पोहोचेपर्यंत इंद्रनील टेबलवर ठेवलेली निशिगंधाची फुलं हातात घेऊन तिच्यासमोर आला. त्याने फुलं समोर धरल्यावर तिचे सगळे विचार माळ तुटल्यासारखे खळ्ळकन गळून पडले.

"थ..थँक्स. आय ल..व्ह दीज.. तुला कसं कळलं?" अवघडून हसून फुलांचा खोल वास घेत ती म्हणाली. "अपने सोर्सेस सब जगह है" तो डोळा मारून क्युटनेसची परमावधी साधत म्हणाला. समोर त्याला डार्क नेव्ही ब्लू सूट, मॅचिंग ट्रावझर्स आणि ओपन कॉलर क्रिस्पी व्हाइट शर्टमध्ये बघून तिने मनातल्या मनात जोरात वॉव! म्हणून घेतलंच. तितक्यात त्याने समोर झुकून तिच्या गालावरून अलगद हात फिरवला. तिने एकदम धक्का बसून पाहिल्यावर त्याने हात उघडून हाताला लागलेली माती दाखवली. "ओह, आय वॉज जस्ट वॉटरिंग द प्लांटस.. आलेच" म्हणून जीभ दाखवत ती पुन्हा पळत जिन्यातून वर गेली.

त्याला रिक्लायनरवर बसून जोईशी खेळता खेळता तिची रिअ‍ॅक्शन आठवून हसू आलं. तिच्या कश्याबश्या एका मोठ्या क्लचरमध्ये अडकवलेल्या कुरळ्या बटा, दमलेला चेहरा आणि विस्फारलेले डोळे! काळा हॉल्टर टॅंक टॉप त्यावर ओला होऊन इथे तिथे चिकटलेला पातळ पांढरा क्रॉप टॉप आणि लूज ग्रे थ्री फोर्थ पजामा त्याच्या नजरेतून सुटला नव्हताच. एक लांब उसासा सोडत तो मागे टेकला.

तेवढ्यात मनवा आलीच. "तू इतक्या लवकर कसाकाय आलास?" तिने लगेच विचारलं.

"कॉझ आय एम सो टायर्ड. हे ऐकायचं आहे, की तुला खरं सांगू?" तो शांतपणे म्हणाला.

"खरं! ऑफ कोर्स लॉयरला खरंच सांगावं लागतं" शक्य तितक्या गंभीरपणे ती म्हणाली.

"ओके" तो श्वास घेत म्हणाला, "देन ट्रूथ इज आय केप्ट थिंकिंग ऑफ यू टुडे. अँड आय वॉन्टेड टू आस्क यू आउट आणि मला आजची संध्याकाळ तुझ्याबरोबर स्पेन्ड करायची आहे. झालं, धिस इज द ट्रूथ!"

जोई सोफ्यावर सावधान बसून जीभ बाहेर काढून दोघांकडे बघत होता..

भाग ७

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ७

भाग ६

'डोकं चालव.. डोकं चालव. काहीतरी स्मार्ट उत्तर दे. तुझ्या अंगावर फुललेला काटा विसर आणि ठामपणे ह्या माणसाला नकार दे. हा पाचच दिवस इथे असेल. झटकून टाक त्याला तुझ्या आयुष्यातून. त्याच्याशी साधं बोलायला तुला मान वर करून बोलायला लागतं.' मनवाचं वकीली मन काव काव करत सुटलं होतं.

"अच्छा.." तिच्या तोंडून इतकंच निघून गेलं.

"बस? एवढंच? हमने अपना दिल खोलकर इस बेदर्द जमानेके सामने रख दिया और वो कहते है.. अच्छा!" तो सनी देओलची मिमिक्री करत म्हणाला.

"हम्म येस, बिकॉज आय डोन्ट हॅव एनीथिन्ग टू से." ती हाताची घडी घालत म्हणाली. "अँड वी डोन्ट हॅव टू गो आउट, मी थोड्या वेळापूर्वीच लार्गोमधून स्पायसी रोझी पिझ्झा ऑर्डर केलाय. येईलच इतक्यात." ती जरा दात दाखवत क्रीपी स्माईल देत म्हणाली. "इट्स सो बिग, कारण मी अर्धा तुझ्यासाठी ठेऊन देणार होते. आय होप यू डोन्ट माईंड हॉट अँड स्पायसी?"

"अँड व्हाय वूड आय माईंड हॉट अँड स्पायसी?" तो डोळे मिचकवत म्हणाला. तेव्हा तिच्या डोक्यात करंट पेटून तिने त्याला एक नाक मुरडू स्माईल दिलं.

"अँड बाय द वे, व्हॉटस दिस स्पायसी रोझी थिंग? 'स्पायसी रोझी' मस्ट बी लिव्हिंग इन सम टीनेज बॉईज हिडन फोल्डर! हाहा! तुम पूनावाले कुछभी नाम रख देते हो यार"

"पुणे!"

"येस मॅम, पुणे!" तो हात जोडत म्हणाला.

"स्पायसी रोझी' हॅज रोजमेरी फ्लेवर्ड चिकन अँड अनियन. खूष? अँड डोन्ट से एनीथिन्ग मोर कॉझ इट्स माय फेवरीट थिन क्रस्ट पिझ्झा. माझा भाऊ तर एकटाच संपवतो एवढा मोठा पिझ्झा" ती डोळे मोठे करून म्हणाली.

"लेट मी गेस, तुला एक ओव्हर प्रोटेक्टिव्ह भाऊ आहे?"

"एक नाही दोन! आय हॅव ट्विन बिग ब्रदर्स." तीने डोळे फिरवले. "आणि टू मच प्रोटेक्टिव्ह.."

"आता मी माझं ट्रूथ सांगते, तू माझ्या सोबत इथे आहेस त्याने मला छान वाटतंय. मला तुझ्याबरोबर डिनर करायला आवडेल. अँड आय वॉज ट्राइंग टू फर्गेट योर फेस ऑल डे." ती पटकन वळून फुलं ठेवायला काहीतरी शोधत आत गेली.

त्याने जॅकेट काढून सोफ्यावर फेकलं आणि जोईकडे बघून मूनवॉक करत 'येस्स' केलं.
------

"आह.. इट वॉज अमेझिंग.. आफ्टर सो मेनी डेज आय हॅड दीज मेनी कॅलरीज.." त्याने त्याच्या सपाट पोटावर हात फिरवत म्हटलं.

'हेल्थ फ्रीक' म्हणून नाकमुरडू स्माईल!

पिझ्झा आणि कोकबरोबर भरपूर जंक गप्पाही झाल्या होत्या. आता टेबलवर फक्त रिकाम्या प्लेट्स आणि एका काचेच्या फुलदाणीत निशिगंधाचा गुच्छ उरला होता. जोईपण खाना, पीना, जीना करून जिन्यावरून वर जाऊन त्याच्या बेडमध्ये लोळत होता.

"नो, रिअली. द स्पायसी रोझी वॉज रिअली गुड!
तो खुर्चीत मागे रेलत म्हणाला.

"माय प्लेझर" ती प्लेट्स उचलत म्हणाली. प्लेट्स धुवून, पुसून दोघे सोफ्यावर येऊन बसले तेव्हा साडेआठ वाजले होते.

"सॉरी, मी जरा खडूसपणे वागत होते तुझ्याशी.. यू नो बोथ माय ब्रदर्स आर अराउंड ६ फीट. त्यांनी माझं अख्ख लहानपण मला बुटकी आणि लहान ट्रीट करून त्रास दिलाय. देन एंटर्स माय बॉयफ्रेंड राहुल अँड गेस व्हॉट? ऑल्सो ६ फीट. अँड ही ऍबसोल्युटली अब्युज्ड मी इमोशनली.. तेव्हाच मी ठरवलं. नो टॉल गाईज फॉर मी." ती समोर पहात म्हणाली.

त्याला एकदम पोटात कुणीतरी जोरदार पंच मारावा तसं वाटलं. "आय एम सिक्स वन, सो यू वोन्ट इव्हन कन्सिडर मी.."

"नोप!" तिने नाक उडवले.

"इफ आय वॉक ऑन माय नीज धिस इव्हनिंग देन?"

"नोss" ती खळखळून हसायला लागली.

"पण का? तुझ्या हाईटमुळे मला काही फरक पडत नाही. मी तुला इक्वल ट्रीट करत नाही का?"

"हम्म आता तू बरा आहेस, पण पुढे जाऊन नक्की त्यांच्यासारखाच वागशील..आय बेट."

"ओके, लेट्स गो थ्रू अ टेस्ट! कमॉन" त्याने उठून तिच्यासमोर हात पुढे केला.

"कसली टेस्ट?" ती हात धरून उठत म्हणाली.

त्याने तिच्या गालांवर हलकेच दोन्ही हात ठेवून चेहरा वर उचलला आणि स्वतः खाली झुकून, थोडासा गुडघ्यात वाकून तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला, ही टेस्ट.. जरा खाली वाकत त्याने तिच्या श्वासात आपले उष्ण श्वास मिसळत हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकले. त्यांचे डोळे तर आधीच एकमेकांत अडकून पडले होते.

मनवाला विचार करायला काही वेळच मिळाला नाही. तिच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. तिच्यात उचंबळून येणाऱ्या ह्या नवथर, अमेझिंग फिलिंग्ज तिलाच कळत नव्हत्या. सगळं सगळं विसरून ती त्या नशेत पूर्ण बुडून गेली.

त्याने एक सेकंद मान वर करून श्वास घेतला आणि पुन्हा तिच्या ओठांवर कब्जा केला. त्याला ही अशी स्वतःला विसरून टाकणारी फीलिंग कधी सापडलीच नव्हती. देअर वॉज समथिंग व्हेरी स्पेशल इन दिस किस.. त्याला या मुलीत फक्त शरीराने नाही तर मनाने पूर्णपणे गुंतून जायचे होते. हे त्याला आजवर कधीच कुणाबरोबर जाणवले नव्हते. इट वॉज ऑसम!

तो भानावर येत थांबला. मनवा छातीवर हात ठेवून, डोळे मिटून धडधड शांत व्हायची वाट बघू लागली.

अचानक  वरून जोईच्या भुंकण्याचा आवाज आला. नंतर  टिंग टॉंगss  मेन डोअरची बेल वाजली.

भाग ८

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ८

भाग ७

"आय'ल गेट इट" म्हणून त्याने पुढे जाऊन दार उघडले.

दाराबाहेर एक त्याच्याएवढ्याच उंचीचा जरा बाळसेदार माणूस हातात एक look. think. act. GREEN! लिहिलेली जाड कापडी पिशवी धरून घाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पहात होता.

"येस??" इंद्रनीलने जरा वैतागूनच विचारले.

"सौरभ गोखले! आपण इथे आत्ता काय करता आहात?" त्याच्यामागून पुढे येत मनवाने कंबरेवर हात ठेवून मान वाकडी करत विचारले.

"हाय!" तो आत येत नीलकडे तिरक्या नजरेने पहात म्हणाला. "मी आणि मुलं आज आई बाबांना भेटायला कोथरूडला गेलो होतो. निलू घरीच थांबली आहे, तिला एक दोन कॉल्स आहेत ऑफिसचे. मुलं राहणार आहेत दोन दिवस आजीकडे. आईने गुलाबजाम केले होते ते तुला आवडतात म्हणून तुझ्यासाठी पाठवलेत." हातातली पिशवी तिच्या हातात देत त्याने भराभर सांगितले.

"अगदी! तुला आनंदच झाला असेल नाही? तेवढंच बहिणीवर लक्ष ठेवता येईल. बहीण एकटी कशी काय रहातेय, मोठमोठ्या गार्डस शिवाय.. हो ना? म्हणूनच आलायस तू!" ती रागात म्हणाली.

"एकटी? मलातरी तू एकटी दिसत नाहीयेस. ह्या माणसाचं नाव जोई आहे का?" त्याने कपाळाला आठ्या घालत विचारले.

"इंद्रनील रायचौधरी, मीट माय ब्रदर सौरभ. मी मघाशी सांगितलेला उत्तम नमुना." रागाने सौरभवरची नजर न हटवता ती म्हणाली.

"कसला नमुना?" सौरभने तिला विचारले.

"जाऊदे, सोड. बाय सौरभ.. आई वाट बघत असेल." ती म्हणाली.

"एक मिनिट! मी आईबाबांना काय सांगू? मनवा एक कुत्रा आणि एका मजबूत माणसाच्या साथीने मजेत रहातेय?? नक्की काय सुरू आहे हे?" सौरभने प्रश्नांची सरबत्तीच लावली होती.

"हेय, हे स्टॉप.." नीलने मध्ये पडायचा प्रयत्न केला.

"वेट! आय एम आस्कींग हर, लेट हर आन्सर."

नीलचं अचानक जवळ येणं, नंतरचा किस आणि त्याने मेंदूत अजून साठलेलं गुलाबी धुकं, त्यातच सौरभची एन्ट्री आणि आता हा प्रश्नांचा पूर यामुळे ती पुरती भंजाळून गेली होती. रागाच्या भरात तिने अचानक जाऊन इंद्रनीलच्या हातात हात अडकवला.

"बरं दादासाहेब ऐका. आज तू माझं सिक्रेट पकडलं आहेस. बरेच दिवस हे मला सांगायचंच होतं. घरी तुम्ही मला कितीही बाळू ट्रीट केलं तरी मी एकोणतीस वर्षांची अडल्ट मुलगी आहे. आणि मी माझा डिसीजन घेतलाय. इंद्रनील आणि मी.. नीलकडे खोटा प्रेमळ कटाक्ष टाकत ती पुढे म्हणाली.. "काही नाही, हा आमचा खाजगी प्रश्न आहे. मी सांगेन आईबाबांना काय सांगायचं ते. गुड नाईट! आणि गुलाबजामसाठी आईला थँक्स सांग"

"मनवा! ही नाटकं बास झाली, लगेच बॅग भर आणि माझ्याबरोबर घरी चल." तो दारातूनच रागाने आवाज वाढवत म्हणाला.

"नाईस मीटिंग यू सौरभ, पण मनवा आत्ता कुठेही जाणार नाही. आम्हाला बऱ्याच इंम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आपण नंतर बोलू" आता मात्र इंद्रनील पुढे होत म्हणाला.

सौरभ हताश चेहऱ्याने, खांदे उडवत "बssर्.. करा काय करायचं ते" म्हणत पाय आपटत बाहेर गेला आणि इंद्रनीलने तत्परतेने दार लावून घेतले.

मागे वळून परत सोफ्यापर्यंत येईतो, मनवा डोक्याला हात लावून बसली होती. "हे भगवान! मी काय राडा करून ठेवला हा.."

इंद्रनील तिला शांत करायला तिच्या शेजारी जाऊन बसला तर ती उठून समोर विचार करत फेऱ्या मारायला लागली.

"शीट! काय केलं मी हे सगळं. आता सौरभ घरी जाऊन आईबाबांना रंगवून रंगवून ही गोष्ट सांगणार. मग निलूला फोन करून लगेच हे सगळं रिपोर्टिंग करणार. आईबाबा शॉक होणार, लगेच बाबा गौरवला आणि आई मला कॉल करणार.. काय उत्तर देऊ मी? काहीही सुचत नाहीये. हे सगळं तुझ्यामुळे इंद्रनील रायचौधरी! कशाला आलास तू पुण्यात?" तिची फेऱ्या मारता मारता बडबड सुरू होती.

तो सोफ्यावर गुपचूप बसून तिच्याकडे प्रत्येक फेरीबरोबर लेफ्ट राईट डोकं हलवून पहात होता.

तिची नॉनस्टॉप बडबड ऐकून आणि चेहऱ्यावरचे रागीट, कन्फ्युस्ड भाव बघून त्याला एकीकडे हसूही येत होते आणि तो तिच्या निरागसपणाच्या अजून अजून प्रेमात पडत होता. कुणाहीबद्दल इतकं खरं पॅशनेट प्रेम त्याला पहिल्यांदाच जाणवत होतं. मनवाने त्याच्या मना-शरीरावर इतक्या पटकन जी काही जादू केली होती ती त्याची त्यालाच अजून खरी वाटत नव्हती.

पण आत्ता? आत्ता ती एवढी त्रासलीय तर आपण मदत करायला हवी हे त्याला जरा उशिराच आठवलं. "मनवा, आय वॉन्ट टू हेल्प यू आऊट. तू इतका स्ट्रेस का घेते आहेस? तुझी माँ कॉल करून काय म्हणेल? जास्तीत जास्त तुझे दादालोक मिळून माझा खिमा करतील. इज इट सो?"

"कमॉन! वी आर नॉट सम गुंडा फॅमिली. ते आता असलं काही करणार नाहीत. मी दहावीत असताना एका मुलाने रस्त्यात मला बघून शिट्टी वाजवली होती त्याला मात्र त्यांनी चोपला होता. पण आता.. त्याहून जास्त कॉम्प्लिकेट करतील सगळं." ती विचारात पडत म्हणाली.

"बच गया! मुझे हॉस्पिटल तो नही जाना पडेगा. आय हेट हॉस्पिटल्स. गॉड ब्लेस द गोखले फॅमिली" तो हसत म्हणाला..

भाग ९

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ९

भाग ८

वाढलेले आवाज ऐकून जोई जिन्यातून भुंकत उड्या मारत आला. खाली येता येता पटकन एक दोन पायऱ्या चुकून एकदम खाली घसरला. "जो! इझी.. इझी बॉय" म्हणत त्याने उठून चुचकारत जोईला जवळ बोलावले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून, दोन्ही पंजे धरून त्याच्याशी गप्पा मारल्यावर तो जरा शांत झाला. मनवा आपल्या विचारात गुंतून लांबूनच त्यांचं प्रेम बघत थांबली होती. त्याचा पाय चाटत जोई कूं.. कूं.. आवाज करत हळूच खाली बसल्यावर इंद्रनीलने बोलायला सुरुवात केली.

"चलो प्रेझेंट मे आते है.. कम, सिट हिअर अँड टेक अ डीप ब्रेथ" तो शेजारी सोफ्यावर थोपटत म्हणाला.  हम्म..  म्हणत सुस्कारा सोडत ती त्याच्याशेजारी जाऊन बसली.  त्याने आपल्या मजबूत खांद्याकडे बोट दाखवून हसून "यू कॅन!" असं सांगितल्यावर पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिने जवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

"हम्म.. दिस इज कॉल्ड सुकूssन.. तो मागे डोकं टेकवत म्हणाला. पावसाळी थंड हवेत आता निशिगंधाचा गोड सुगंध दरवळत होता. "नाउ टेल मी, काय म्हणेल मां?"

"यू डोन्ट नो माय मदर! ती खूप खूप लाड करेल, प्रेम करेल.. लाईक ऑल मदर्स.. पण ती ह्या बाबतीत काही ऐकून घेणार नाही, शी विल कॉल यू होम फॉर लंच ऑर डिनर अँड शी विल ग्रिल यू!" ती आता विचारात पडली होती.

"इट्स ओन्ली अ डिनर यार, आय एम नॉट गोइंग टू डाय फ्रॉम इटिंग पूरनपोली" त्याने डोळे मिचकावले.

"पूरनपोली! त्याच्या उच्चाराला हसत तिने त्याचे परफेक्ट केस विस्कटत एक टपली मारली. "काही पुरणपोळी वगैरे मिळणार नाही तुला, दे विल आस्क यू टू मॅरी मी डफर!" ती डोक्याला हात लावत म्हणाली.

'येय!' त्याने मनातल्या मनात हवेत एक पंच मारला आणि तिच्याकडे गंभीर चेहरा करत म्हणाला, "अच्छा.. तो अब?"

"आय थिंक, मी हे सगळं ठीक करते. आईला सांगून टाकते की असं काही नाहीये, मी सौरभशी भांडता भांडता रागात बोलून गेले."

"बट देन दे विल व्ह्यू यू ऍज द सेम immature लिटल गर्ल. आय विल हेल्प यू टू प्रूव्ह, दॅट यू आर ऍन इंडिपेंडंट वूमन. यू आर केपेबल ऑफ डिसीजन मेकिंग. यू नो व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. थिंक अपॉन दिस.." तो म्हणाला.

"अम्म.. खरंच तू येशील? नंतर आपण सांगू शकतो, तू निघून गेलास, लॉंग डिस्टन्स शक्य नाही सो वी ब्रोक अप etc.." ती जरा खूष होत म्हणाली. "पण तू हे सगळं माझ्यासाठी कश्याला करतो आहेस? यू विल रिअली गेट बोअर्ड.."

"कॉज आय एम अ गुड पर्सन?"

"यू आर अ वंडरफुल पर्सन!"

तेवढ्यात तिचा फोन घुर्रss आवाज करत जोरात व्हायब्रेट व्हायला लागला..

"शिट! आईचा कॉल.. " तिच्या तळव्यांना घाम आला होता. तो तिचे थंड पडलेले ओलसर हात आपल्या उबदार हातात घेत म्हणाला, "गो ऑन.. बी पॉझिटिव्ह अँड बी बोल्ड. काही नाही होत, बोल पटकन."

"बट यू डोन्ट हॅव टू डू दिस.."

"इट्स ओके, गो ऑन" तो हाताने सेलफोनकडे इशारा करत म्हणाला.

खोल श्वास घेत ती फोन घेऊन किचनमध्ये गेली.

'दे विल आस्क यू टू मॅरी मी डफर>> त्याला तिचे शब्द आठवत राहिले. अँड आय रिअली वॉन्ट दॅट टू हॅपन.. आय नीड यू इन माय लाईफ. ओन्ली यू कॅन कम्प्लिट मी. आय कॅन नेव्हर फील लाईक दिस विथ एनीबडी एल्स. आय लव्ह यू मनवा, विथ ऑल माय हार्ट.. मला तुझ्याबरोबर आयुष्यभर रहायचे आहे आणि वेळ आल्यावर मी हे तुला सांगणार आहे.' नुसत्या विचारानेच त्याला आतून अगदी शांत शांत वाटलं.

जोई एव्हाना मान टाकून बारीक घोरायला लागला होता. त्याला उचलून त्याने खालीच गेस्टरूमच्या एका कोपऱ्यात नेऊन त्याच्या बेबी ब्लॅंकेटवर झोपवले. मग स्वतः फॉर्मल्स बदलून आपल्या शॉर्टस आणि लूज टी घालून बाहेर येऊन पुणे मिरर उघडून चुळबुळ करत बसला.

किचनमधून जोरदार तापलेले डिस्कशन ऐकू येत होते, मग हळूहळू मनवाचा आवाज मऊ होत गेला आणि शेवटी बंद झाला.

ती येऊन फोन सोफ्यावर बाजूला टाकत धप्पकन त्याच्या शेजारी बसली आणि वर त्याच्या  डोळ्यात बघत म्हणाली, "उद्या संध्याकाळी साडेसात वाजता."

"चिल! वी विल रॉक इट.." तो तिच्या केसांवर थोपटत म्हणाला.

"चलो, वी हॅव वर्क टूमारो! लेट्स स्लीप" म्हणत ती उठून उभी राहिली.

"टुगेदर?" तो जोई किबलकडे बघताना करतो तसा चेहरा करत म्हणाला.

"इन योर ड्रीम्स मि. रायचौधरी!" म्हणत ती आपले गुलाबी पडत चाललेले गाल लपवत तिच्या खोलीत पळून गेली.

तो हसऱ्या चेहऱ्याने उठून दिवे बंद करून आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला आणि कानात इअरफोन्स घातले.

त्याचवेळी एफ एमवर लव्ह गुरूने त्याच्या मनात डोकावून पाहिल्यासारखी गजल सुरू केली..

बड़ी नाज़ुक है ये मंज़िल
मोहब्बत का सफ़र है..
धड़क आहिस्ता से ऐ दिल
मोहब्बत का सफ़र है..

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १०

इंद्रनील सकाळी लवकर उठून तयार होऊन त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता. मनवा आठ वाजता उठली तेव्हा घर सुनसान होते. ती चहा करेपर्यंत जोई भू(क), भू(क) करत मागे लागला होता. नेमकं त्याचं किबल संपलं होतं. फ्रीजपण एव्हाना रिकामा होत आला होता. ग्रोसरीज आणायला हव्यात म्हणून तिने पटकन ऍप मध्ये रिमायंडर लावला. तिने ह्यूमन फूड फॉर डॉग्स गूगल करून पाहिले तर गाजर आणि सफरचंद चालतील असं दिसत होतं. मग तेच दोन्ही स्लाइस करून, बिया काळजीपूर्वक काढून तिने जोईच्या डिशमध्ये वाढले. जोईने ते हुंगून तिच्याकडे वाईट तोंड करून बघितले. "मनात नक्की त्याने 'हेल्थ फ्रीक!' म्हणत डोळे फिरवले असणार" म्हणत ती हसायला लागली.

दिवसभर प्रचंड काम असल्यामुळे मनवाला डोळ्यावरचा चष्मा काढायलाही फुरसत नव्हती. दिवसभर ती लॅपटॉपसमोर रेफरन्स बुक्स चाळत वेगवेगळी ऍग्रीमेंट्स ड्राफ्ट करत होती. कालच पिझ्झा खाऊन भरपूर कॅलरीज स्वाहा केल्यामुळे आज बाहेरचं काही नको म्हणून तिने इंद्रनीलने फ्रीजमध्ये ठेवलेल्या फळांपैकी दोन तीन सफरचंद बाहेर काढून धुवून ठेवली. एरवी तिला फळं खाणं म्हणजे शिक्षाच वाटायची. फक्त दोन तीन दिवस एखाद्या माणसाबरोबर राहून आपण त्याच्या सवयी आपल्याश्या करतोय या गोष्टीचं तिला फारच आश्चर्य वाटत होतं.

लंच म्हणून नुसतं सफरचंद खायचा कंटाळा आला होता तेव्हाच दुपारी बाहेरून 'नारsल पाssनीssये' म्हणून आवाज येत होता. ती गेटबाहेर जाऊन गाडीवाल्याकडून एक मोठं शहाळं घेऊन आली. स्मूदी रेसिपीज शोधताना तिला लिची, पेर, कोकोनट स्मूदी सापडली. चार लिची, एक मोठा पेर आणि नारळपाणी थोडा बर्फ घालून तिने ब्लेंड केले. एक उंच ग्लास भरून बाहेर आणल्यावर तिने लगेच एक फोटो काढून इंस्टावर पोस्ट केला. पाच मिनिटात भरमसाठ बदाम गोळा झाले. त्यात एक कमेंट 'way to go!' पण होती Drifter_Neil अकाउंट वरून. 'अरे हो, कालच फॉलो केलं होतं आम्ही एकमेकांना' तिला आठवलं.

तेवढ्यात वॉट्सऍप पिंगलं म्हणून पाहिलं तर पारुलने फाल्गुनीच्या 'ये किसने जाssदू किया' ओळीचे मीम बनवून, डोळा मारू स्मयलीज पाठवल्या होत्या. ते पाहून ती अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसली. मग पटापट स्मूदी संपवून काम सुरू झाल्यावर संध्याकाळपर्यंत तिला डोकं वर करायलाही वेळ नव्हता. अधून मधून उठून फक्त जोईला खाऊपिऊ द्यायला आणि शू ब्रेक्स झाले.

सहा वाजता तिला आठवलं की अरे आपल्याला घरी जेवायला जायचंय. तिने बॅगेत कोंबून आणलेल्या कपड्यांमध्ये पजामा सेट्स सोडून कोर्टात घालायचे दोन तीन काळे पांढरे कॉम्बो होते. हुश्श, पारूलने गिफ्ट केलेला एक बेबी पिंक ऑन पिंक चिकनकारीचा स्लीवलेस कुर्ता सापडला तोच व्हाइट लेगिंग्ज बरोबर मॅच करून ती तयार झाली. अनायसे तयार होतेच आहे तर जरा नीलला टशन देऊ असा विचार करत तिने काजल, टिंटेड लीप ग्लॉस आणि थोडा मेकअप पण करून टाकला. वर होऊद्या खर्च! म्हणत त्याच बॉक्समध्ये सापडलेले ऑक्सिडाईज्ड झुमकेही घातले.

साडे सहा वाजता ती तयार होऊन जिन्यावरून खाली आली तो समोर सोफ्यावर इंद्रनील आधीच येऊन तिच्याकडे पाठ करून मोबाईल बघत बसला होता. ती हळूच खोटंखोटं खोकली तेव्हा तो पटकन वळून बघत उठून उभा राहिला. हाय! इतकी काळजात कळ आणण्याइतका देखणा का दिसतो हा माणूस? आताही लाईट ब्राऊन चिनोजवर टक इन केलेला आकाशी शर्ट आणि पायात सॉक्सशिवाय डार्क ब्राऊन बोट शूज. शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या आणि शिरा उठून दिसणाऱ्या मनगटावर ट्युडरचं क्रोनोग्राफ! एवढ्यावरच इतका कातिल दिसतोय की सगळा मेकअप वेस्ट आहे आपला.. असं वाटून तिला जरा रागच आला.

तो क्षणभर सगळं विसरून तिला पहातच उभा राहिला. शेवटी भानावर येत "हेलो मनवाजी, चले?" म्हणून त्याने समोर झुकत तिला हात ऑफर केला.

आणि बाहेर दणाणून टाकणारा गडगडाट होऊन जोरदार पावसाची झड सुरू झाली.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ११

पाऊस ऐनवेळी लिटरली टपकल्यामुळे इंद्रनील तिला जपत खांद्यावर हात टाकून तिची छोटीशी लेडीज छत्री वेडीवाकडी दोघांच्या उंचीनुसार ऍडजस्ट करत थेंबांपासून वाचत कसाबसा कारपर्यंत घेऊन गेला. त्याच्या इतक्या जवळ येण्याने, तो उबदार स्पर्श आणि त्याने लावलेल्या वूडी, स्पायसी अंडरटोन असलेल्या सुगंधाने तिला पावसातून उडून पार ढगातून चालत असल्यासारखं वाटत होतं.

घरी पोहोचेपर्यंतचा प्रवास असाच शांततेत झाला. पार्किंगमध्ये उतरल्यावर तिला हळूहळू आपण करून ठेवलेल्या राड्याची जाणीव झाली. नील तिच्याजवळ येऊन उभा राहिला तेव्हा ती कसंबसं एक स्माईल देत त्याला लिफ्टच्या दिशेने घेऊन गेली. दारासमोर येऊन तिने बेल वाजवली, इंद्रनील तिच्या मागेच उभा होता. तिच्या आईने घाईघाईत येऊन दार उघडलं, पहिल्यांदा नीलकडेच लक्ष गेल्याने त्याच्याकडे पाहून गोड हसली. "या या" म्हणत त्यांचं स्वागत केल्यावर मागे तिचे बाबा उभेच होते. त्यांनी डोळे बारीक करून आधी त्याचे अपादमस्तक ऑडिट केले. शेवटी हाडाचे सीए च ते! मग त्याला आपल्या शेजारी बसवून मनवाला समोरच्या सोफ्यात बसायला लावले. इंद्रनीलने आत आल्याक्षणी दोघांच्याही पायाला हात लावून प्रणाम केल्यामुळे दोघे पहिल्या बॉललाच आउट झाले होते. पाणी वगैरे पिऊन झाल्यावर त्यांनी अरुआंटी मग क्रिती मग अजून कुठले कुठले रेफरन्स चेक करत त्याचे पूर्णच ऑडिट केले.

ते गप्पा मारत असताना मनवाला आईने किचनमध्ये हाक मारली. "मना, आधी सांगायचं नाही का तू मला? तुमच्यात असं काही सुरू आहे म्हणून.. सौरभ किती चिडून आला होता रात्री. आता आज मुलांना घेऊन मॉलमध्ये गेलाय. गौरव काही दिल्लीहून येऊ शकणार नाही. मग त्या दोघांचं म्हणण पडलं की आधी आम्ही दोघंच भेटू तुम्हाला आणि आम्हाला हा तुझा बॉयफ्रेंड आवडला तरच बाकी सगळे नंतर भेटतील. हा मुलगा मात्र छाssन आहे हं, कुठे भेटलात तुम्ही? आई पुऱ्या तळता तळता कृतककोपाने मनवाला विचारत होती.

बापरे, आता काय सांगावे न सुचून मनवा सरळ एक टम्म फुगलेली गरम पुरी फोडून खायला लागली. "मी काहीच सांगणार नाही, तुम्ही त्याच्याशी गप्पा मारा. आपोआप कळेल तुम्हाला." उत्तर द्यायचं टाळत मनवा म्हणाली.

"काय ग आणि बंगाली आहे ना तो? मग बोलता कसे दोघे? फक्त इंग्लिश? आणि एकत्र कसे राहाताय अरुकडे?? आईने तोंडावर हात ठेवत हळूच विचारले.

"हो बोलतो तसंच पण तो मुंबईत वाढलाय ग, येतं त्याला मराठी. शाळेत पण होतं त्याला मराठी. आईss एकत्र म्हणजे फक्त घरात एकत्र आहोत, वेगळ्या रूम्समध्ये झोपतो आम्ही" डोळे मोठे करून बघत ती म्हणाली.

"नशीब! मी घाबरलेच होते, सारखं कसं इंग्लिश बोलणार याच्याशी.." एक प्रॉब्लेम सॉल्व झाल्याच्या थाटात आई म्हणाली. "कालच ह्यांनी अरूला फोन केला होता, तिचा फारच लाडका भाचा आहे म्हणे. तुमच्याबद्दल बाकी काही नाही सांगितलं पण ती भाच्याचं खूप कौतुक करत होती. क्रितीची तब्येत छान आहे आता. अशोक जरा कंटाळलाय फक्त. तिकडे भाषेचा प्रॉब्लेम येतो, बिल्डिंगमध्ये बोलायला कोणी नाही वगैरे सांगत होता बिचारा."

"आई आत्तासं आम्ही एकमेकांना जाणून घेतोय, लगेच लग्नबिग्न नाही करत आहोत हं.. तू काय लगेच श्रीखंड पुरी वगैरे करायचा घाट घातलाय? एवढी धावपळ करण्यापेक्षा साधं करायचं ना जेवण, किती दमतेस तू उगाच.." मनवा तोंड वाकडं करत म्हणाली.

"तू गप्प बस, आम्हाला समजतं कसं वागायचं ते. तुला नको असेल तरी त्याला खायला घालेन मी श्रीखंड. बघ आवडतं की नाही माझ्या हातचं.." आई हसत म्हणाली. मनवा मग कोशिंबिरीसाठी काकडी चोचवत काहीतरी इकडचे तिकडचे विषय काढून बडबड करत बसली.

एव्हाना बाहेर बाबांबरोबर बसून इंद्रनीलने भारताच्या इकॉनॉमी पासून मोदी, नोटबंदी ते अगदी कश्मीरपर्यंत सगळे प्रश्न डिस्कस करून झाले होते, तेही आवाज न वाढवता! निवडणुकांचे प्रचार आणि त्याचे कॅम्पेनिंग, त्यांचे बदललेले स्वरूप, ऑनलाइन प्रचार, ट्रोल्स याबद्दलच्या बऱ्याच इनसाईड गोष्टी सांगून त्याने बाबांना आश्चर्याने थक्क केले.

मनवाने मध्येच दारातून बाहेर डोकावून पाहिले तर बाबा अगदी जोरात हसत नीलला टाळ्या बिळ्या देत होते. तिने हसत नीलला थम्बज अप करून दाखवले आणि आत गेली.

आत श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, नारळाची हिरवी चटणी, टोमॅटो सार आणि मनवाने केलेली खमंग काकडी सगळं तयार होतं. आधीच करून ठेवलेला मसालेभात फक्त गरम करायचा होता. तो गॅसवर ठेऊन आईने मठ्ठा करायला घेतला.

इंद्रनीलला जेवण प्रचंड आवडलं. आई त्यांना पुऱ्या गरम तळून पानात वाढत होती, ते थांबवून त्याने आईला सगळ्यांबरोबर जेवायला बसायला लावलं. अधूनमधून क्लायंट्स बरोबर घडणारे जोक्स, देशोदेशी फिरताना झालेले किस्से असं काय काय सांगून तो सगळ्यांना जाम हसवत होता.

मध्येच बाबा त्यांच्या लाडक्या गाण्याच्या टॉपिकवर आले तेव्हा त्याने लहानपणी हिंदुस्तानी क्लासिकल शिकल्याचे सांगत त्यांना गारच केले. मग लाईट म्युझिकवर येत बाबांचा लाडका किशोरकुमार आणि मन्ना डे, रफी वगैरेंच्या आठवणी काढून झाल्या.

"तू कामासाठी इतका फिरतोस, मग कुठेतरी स्टेबल रहातोस की नाही?" मनवाच्या बाबांनी विचारलं.

"हो, एरवी अंधेरीला फ्लॅट आहे तिथे रहातो. पण लवकरच पुण्यात शिफ्ट होणार आहे." तो मनवाकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला.

मनवाही काय acting आहे! असा लुक देत हसली. "अरे वा, किती छान ना?" आई बाबांकडे बघून म्हणाली.

"चांगलं आहे, मी मदत करतो तुला फ्लॅट शोधायला." बाबा म्हणाले.

मनवा त्याच्या बारीक बारीक गोष्टी नोटीस करत होती. त्याचं हसणं, लोकांना आदर देऊन बोलणं, समोरच्याने कितीही ट्रीव्हीअल गोष्ट मांडली तरी ऐकून घेणं, त्याचा केअरिंग स्वभाव.. ही'ज सच अ वंडरफुल सोल! ती मनात म्हणाली..

'आणि दोन दिवसांनी तो इथून निघून जाणार आहे..' आतून तिला दुखवत दुसरा विचार आला..

जेवण झाल्यावर लिविंग रूममध्ये बसून बडीशेप खाता खाता बाबांनी त्याला गायचा खूपच आग्रह केला. "हां आणि किशोरचं गा रे काहीतरी" असं बाबांनी म्हटल्यावर तो त्याच्या मखमली आवाजात तिच्या डोळ्यांत पहात गायला लागला.

एक अजनबी हसीना से,

यूँ मुलाकात हो गई

फिर क्या हुआ ये ना पूछो

कुछ ऐसी बात हो गई..

आणि तिला लाजून कुठे पाहू अन कुठे नकोसं होऊन गेलं..

क्रमशः

---
इंद्रनीलच्या गाण्याचा फील घेण्यासाठी हे ऐका :)

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १२

"अनंतमोदक! सी! आय रिमेम्बर द नेम ऑफ युअर बिल्डिंग नाउ." तो उत्साहाने ड्राइव्ह करता करता म्हणाला. "येतं मला मराठी!"

"व्हॉट यू जस्ट सेड, मीन्स नेव्हर एंडिंग मोदक!" ती हसून हसून वेडी झाली. "द नेम इज अनंतमोचन!"

"व्हॉटेव्हर! तू खूप सुंदर दिसते आहेस, हे बरोबर?" तो तिच्याकडे बघत म्हणाला.

"धन्यवाद, धन्यवाद.. गोखल्यांकडे जाऊन आल्यावर तुझं मराठी एकदम प्रो होणार बघ" ती चिडवत म्हणाली. "इंद्रनील, यू हॅण्डल्ड इट सो वेल! माझ्या बाबांना खिशात टाकणं सोपं काम नाहीये. काय अ‍ॅक्टिंग होती, वाह वाह!"

त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं मग खोटं हसत म्हणाला, "आफ्टरऑल मार्केटिंगवाला बंदा हूँ!"

"अँड यू हॅव अ ब्युटीफुल व्हॉईस! मला माहीतच नव्हतं तू इतका छान गातोस ते." ती कौतुकाने म्हणाली.

"थँक्स.. माय माँ वॉज अ गुड सिंगर. शी युज्ड टू टीच क्लासिकल टू सम किड्स ऍट होम, सो आय ऑल्सो एंडेड अप लर्निंग. टिल शी वॉज अलाईव्ह.. इट्स ओन्ली अ हॉबी नाउ..

"ओहह.. आय एम सो सॉरी.. व्हेन डिड दिस हॅपन?" तिने काळजीने विचारले.

"लॉंग बॅक.. आय वॉज इन फीफ्थ स्टॅंडर्ड." तो तिच्याकडे पाहून म्हणाला.  इतक्या लहानपणी त्याने ते दुःख कसे पचवले असेल ह्या विचाराने तिचा घसा दाटून आला. आवंढा गिळत तिने हलकेच पुढे झुकून त्याच्या केसांवरून हात फिरवला.

दोघेही समोर वळण घेत जाणारा स्ट्रीट लाईट्स खाली चमकणारा रस्ता पहात राहिले. घरी पोहोचायला त्यांना जेमतेम वीस मिनिटं लागली. तो कार पार्क करेपर्यंत उतरून ती आधी वर जोईला चेक करायला गेली तर जोई आधीच घोरत होता.

खाली किचनमध्ये नील एका हातात पाण्याने भरलेला ग्लास घेऊन, दुसऱ्या हाताने सगळे ड्रॉवर्स धुंडाळत होता. "इज देअर एनी इनो ऑर सोडा? आय एट टू मच! योर मॉम इज अ फँटास्टिक कूक. बडे दिनो बाद ऐसा होममेड खाना खाया.."

"वेट अ मिनिट" म्हणत तिने हॉलमध्ये जाऊन कोपऱ्यातल्या तिच्या बॅगमधून इनोचं पॅकेट काढून त्याच्या हातात दिलं.

"वॉव! सो एफिशियंट!" म्हणत त्याने पटकन सॅशे ग्लासमध्ये ओतून बुडबुडे उतू जायच्या आत पटकन पिऊन टाकले.

"कॉज डीलिंग विथ अवर क्लायंट्स जनरेट्स सो मच ऍसिड इन अ कॉर्परेट लॉयर्स सिस्टम!" ती डोळे फिरवत म्हणाली. "इट वॉज टू मच वर्क टूडे. आह.. आयम सो टायर्ड" म्हणून तिने आळस दिला. तिने हात खाली करण्याआधीच इंद्रनीलने हळूच तिला दोन्ही हातात उचललं आणि सोफ्याकडे निघाला. अचानक हवेत उचललं गेल्याने ती "नोss नील, स्टॉप इट! जस्ट स्टॉप!!" म्हणत आरडाओरडा करेपर्यंत त्याने हसत हसत तिला सोफ्यावर ठेवलंही होतं. "तूच म्हणालीस यू आर सो टायर्ड म्हणून! यू कॅन लाय डाऊन अँड स्पीक" म्हणत तो एक गुबगुबीत कुशन पाठीशी घेऊन पाय पसरून खाली सोफ्याला टेकून बसला. "अँड यू जस्ट कॉल्ड मी नील!" तो डोळे मिचकवत म्हणाला.

तिने त्याला जीभ दाखवत झोपूनच एक चापटी मारली.

"बट सिरिअसली, आय एंजॉईड दिस इव्हनिंग. यू हॅव अ लव्हली फॅमिली मनवा.. कीप देम क्लोज" तो शांतपणे म्हणाला.

"हम्म आय लव्ह देम, बट ऍट द सेम टाइम दे मेक मी रिअली क्रेझी." मनवा वर छताकडे बघत म्हणाली. "लहानपणापासून मी खूप हेडस्ट्रॉंग मुलगी होते. पण सगळे मला इतकं अति प्रोटेक्ट करायचे की मला खूप राग यायचा. दे वर ऑलवेज मेकिंग माय डिसीजन्स फॉर मी. आज मला बरं वाटतंय की आईबाबांना मी इतकं तरी दाखवून दिलंय की माझे डिसीजन्स मी आणि फक्त मी घेऊ शकते." ती भराभर बोलून टाकत होती.

त्याने फक्त मान हलवून तिच्या हातावर थोपटले.

"पण तू काय ऍक्ट करतोस रे, यू शूड बी अ प्रो! काय काय थापा मारत होतास, पुण्याला शिफ्ट होणार वगैरे? तू गेलास की मी लगेच त्यांना सांगून टाकणार आहे की तुला सारखंच पुण्याच्या बाहेर राहावं लागतं त्यामुळे हे वर्कआऊट होत नाहीये अँड वी ब्रोक अप!" जराशी उठून कुशनला टेकत ती म्हणाली.

"बट व्हॉटेव्हर आय टोल्ड देम इज ट्रू!" तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला.

"काय??" ती जवळपास ओरडूनच उठून बसली.

"हम्म, आय एम सो टायर्ड ऑफ ट्रॅव्हलिंग. आय एम फीलिंग बिट एजी.. मला जरा शांत राहायचं आहे, ऍट लिस्ट फॉर सम टाइम. आय थिंक पुणे सूट्स द रिक्वायरमेन्ट. अवर मॅनेजमेंट वॉन्टेड टू ओपन अ न्यू ब्रँच हिअर. सो आय ग्रॅब्ड द अपॉर्चूनिटी अँड आय'ल हेड द न्यू ब्रांच!" तो सोफ्याला टेकलेली मान तिरकी करत तिच्याकडे बघत म्हणाला. "मी रोज तेच काम करतोय सध्या, लोकेशन फायनल करून मला इथली टीम सिलेक्ट करायची आहे."

"ओह.." मनवाच्या डोक्यात विचार जोरजोरात दौडत होते.

पहिली रिऍक्शन : omg! सहीच, मला रोज दिसेल हा. हे म्हणजे मी डाएटवर असताना समोर फरेरो रोशेचा डबा उघडून ठेवल्यासारखं आहे..

दुसरी रिऍक्शन: मनवा! नो! अजिबात नाही.. मान्य आहे त्याच्या स्पर्शाने तू वितळतेस, तुझ्या आत कुठेतरी आग लागली आहे. बट दॅट्स ओन्ली युअर हार्मोन्स! यू डोन्ट लव्ह हिम! इट्स ओन्ली थ्री डेज यू इडियट.

"यू डोन्ट लुक हॅपी विथ द न्यूज" तो भुवया उंच करत म्हणाला.

"अम्म.. हे खूप सरप्रायझिंग आहे माझ्यासाठी. मला वाटलं तू माझा डिसीजन आईबाबांना परफेक्ट वाटावा म्हणून काहीतरी थाप मारत होतास.. मग तू खरच राहणार इथे? यू श्योर?" तिने विचारले.

"येस!" तो मान हलवत म्हणाला. "माझी मुंबईत काही कामं सुरू आहेत, ते सगळं फिनिश करून मी परत येईन, मग इथे फ्लॅट शोधून काम सुरू होईल. आय एम गोइंग टू सेटल डाऊन हिअर मनवा."

"नाईस! अरूआंटी आणि अंकल खूष होतील तू जवळ राहिलास की."

"अँड यू? तू नाही खूष होणार?"

"मी.. आत्ताच नाही सांगता येणार.. ही एवढी इन्फो प्रोसेस व्हायला वेळ लागेल" ती जरा विचार करत म्हणाली.

"प्रोसेस करतेच आहेस तर तुला कंप्लीट डेटा द्यायला हवा"

"म्हणजे? अजून डेटा आहेच??" तिने कपाळाला आठ्या घालून विचारलं

पूर्ण वळून तो मांडी घालून बसला. तिचे हात त्याने हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात बघूत एक खोल श्वास घेऊन त्याने बोलायला सुरुवात केली. "मनवा, आय एम इन लव्ह विथ यू! आय कान्ट एक्सप्लेन हाऊ डिड धिस हॅपन इन सच शॉर्ट टाइम..  बट नो वन, ऍबसल्युटली नो वन हॅज एव्हर मेड मी फील लाईक दिस. आय थिंक वी रिअली कनेक्टेड.. अँड आय वॉन्ट टू हॅव दिस फीलिंग फॉर अ लाईफटाइम.. आय वॉन्ट टू मॅरी यू मनवा गोखले! विल यू बी माईन फॉरेव्हर?

मनवाने त्याच्या डोळ्यात बघता बघता झटक्यात हात सोडवून हातांची घट्ट घडी घातली. तिचा चेहरा कोरा दिसत होता आणि डोळ्यांतून एक- एक टपोरा थेंब ओघळून त्यांची रांगच लागली..

पालथ्या हाताने एक गाल पुसत ती म्हणाली " हे शक्य नाहीये इंद्रनील. माय आन्सर इज नो! वी विल नेव्हर गेट मॅरीड."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १३

इंद्रनील हताश होऊन तिच्याकडे पहात राहिला.

"मनवा, बाय ऑल मीन्स यू हॅव द राईट टू से नो. बट ऍट लीस्ट टेल मी व्हाय.." तो हळूच म्हणाला.

"सॉरी इंद्रनील, आय एम टोटली ओव्हरव्हेल्म्ड विथ योर डिक्लरेशन अँड नाउ दिस प्रपोजल. आय कान्ट एक्सप्लेन. प्लीज लीव्ह मी अलोन. ऍट लीस्ट फॉर समटाईम... वुड यू?" ती सोफ्यावरून उतरून उभी रहात, लाल झालेलं नाक हाताने अजून पुसत म्हणाली.

"श्योर" म्हणत तो तसाच बसून ती त्याच्या समोरून चालत तिच्या खोलीकडे जाऊन दार बंद करेपर्यंत पहात राहिला.

दार लावून ती आत आली तेव्हाही रडतच होती. लॅचच्या आवाजाने जोई जागा होऊन पडल्या पडल्याच तोंड उचलून करुण नजरेने तिच्याकडे बघायला लागला. त्याच्या त्या दुःखी डोळ्यांकडे बघून तिला अजूनच दाटून आलं. "ओ बेबी, तुला खूप एकटं वाटलं ना जो..  आयम सॉरी.." म्हणत तिने त्याच्याशेजारी जाऊन त्याला रडत रडत मिठी मारली.

तिच्या डोळ्यातून गळणारे टपोरे थेंब त्याच्या मानेवर पडून तिथली फर ओली झाली तेव्हा जोई पण कूं कूं आवाज करत तिच्या हाताला चाटून तिला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करत होता. मध्येच त्याचा तो छोटासा शेपटीचा आकडा हलवून दाखवत होता. त्याच्याबरोबर बसून तिला बरंच शांत वाटायला लागलं तेव्हा हळूच उठून ती उशीत तोंड खुपसून झोपली.

तेव्हा इंद्रनील फक्त सोफ्यावर आडवा होऊन सिलिंगकडे टक्क डोळ्यांनी पहात होता.

सकाळी ती उठली तीच ठसठसणारा खांदा घेऊन. झोपेत कुठलीतरी शीर वाकडी तिकडी दुखावली गेली होती. ती इंद्रनील दिसतो का पहायला बाहेर आली तो सगळं घर रिकामं होतं. तिने त्याच्या खोलीत जाऊन पाहिलं तर त्याची एक डफल आणि एक ट्रॉली बॅग जशीच्या तशी होती. बेडही रात्री कुणी न झोपल्यासारखा व्यवस्थित टक केलेला होता.

तिने जोईला खायला देऊन, बाहेर गेटला कुलूप लावून त्याला बाहेर खेळायला सोडून दिलं. कडकडीत पाण्याने आंघोळ केल्यावर तिच्या खांद्यातली चमक जरा थंडावली. अंगात एक अघळपघळ शिफ्ट ड्रेस अडकवून तिने केसांची जुडी करून एका जाड रबरमध्ये अडकवली. लॅपटॉप उघडला आणि आपला मोठ्या चौकोनी काळ्या फ्रेमचा चष्मा डोळ्यावर ओढून कामात बुडून गेली. खिडकीतून अधून मधून जोई फुलपाखरांमागे उड्या मारत पळताना दिसत होता. दिवसभर सारख्या तिच्या मनात इंद्रनीलच्या आठवणींच्या लाटा येत जात होत्या. त्याच्या डोळ्यातली चमक, हसताना एका बाजूने किंचित खाली वळणारा त्याच्या ओठाचा कर्व्ह, त्याचे मोठेमोठे उबदार हात..  पण ती जीव खाऊन त्यांना परतवून लावत होती. डोळ्यात भरती आणणारं हे खारं पाणी तिला परवडण्यासारखं नव्हतं.

पारुलकडून आलेली एक केस रिव्ह्यू करता करता ती काही वर्षे मागे गेली. लॉ कॉलेजपासून ती, राहुल आणि पारुल असं त्रिकुट होतं. एकत्र अभ्यास, पुरुषोत्तम, म्युझिक फेस्ट्स अश्या सगळ्या सारख्या आवडीतून एकत्र आले आणि अगदी अनसेपरेबल झाले. टपरीवरचा काचेच्या लहान ग्लासातला वाफाळता मसाला चहा आणि पार्किंगमधल्या महान गप्पा ह्यानेच त्यांचा दिवस सुरू होऊन तिथेच संपत होता. दरेक सेमिस्टर नंतर राहुलचा तिच्यातला इंटरेस्ट हळूहळू वाढत गेला. पारुल बाजूला पडून दोघेच एकत्र मुव्हीज आणि सिक्रेट डेट्सवर जाऊ लागले. पारुल आणि तिने अरूणिमाकडेच इंटर्नशिप संपवून एम्प्लॉयी म्हणून जॉब सुरू ठेवला होता तर राहुल हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू करून पुणे-मुंबई चकरा मारत होता.

रिलेशनशिपमध्ये पडल्यापासून कॉलेजमधला हॅपी गो लकी राहुल हरवून त्याच्या जागी तिला हळूहळू एक वेगळाच राहुल अधून मधून दिसायला लागला होता. सारखा तिला लहान समजून उपदेश देणारा, तिऱ्हाईत लोकांशी बोलताना तिला काही कळणारच नाही असं दाखवून तिला गप्प बसवणारा, प्रत्येक गोष्टीत तिला तिचा कमीपणा दाखवून देणारा राहुल, प्रोफेशनली मीच कसा बेस्ट आहे हे क्षणोक्षणी आठवून देणारा राहुल!

या सगळ्या गोष्टीत त्याच्या उंचीचा मोठा हात होता, कायम तो खाली तिच्याकडे पाहायचा तेव्हा तो आपल्याला खिजवून दाखवतो आहे असं तिला वाटत रहायचं. आधीच लहानपणापासून दोघे जुळे भाऊ आणि वडील अश्या तीन तीन उंच डॉमीनेटिंग फिगर्स तिने सहन केल्या होत्या त्यामुळे तिच्या मनात ती बुटकी असल्याची एक सूप्त कमीपणाची भावना मूळ धरून होतीच. राहुलच्या अश्या वागण्यामुळे तिला खतपाणी मिळत गेलं.

रिलेशनशीपच्या तीन वर्षात राहुलने तिच्या आयुष्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात घेऊन टाकला होता. तिने कपडे कसे घालावे इथपासून तिने कुठल्या केसेस हँडल कराव्या इथपर्यंत तो तिला डॉमिनेट करत करत होता. तीही त्याच्या प्रेमात वेड्यासारखी त्याचं सगळं बरोबर आहे, प्रेमामुळे हा त्याचा हक्कच आहे असं प्रिटेंड करत जगत होती. तिचा कॉन्फिडन्स अटमोस्ट लो पॉइंटवर होता. कोर्टरूममध्ये उभं राहिल्यावरही पाय थरथरत होते. ती डाऊन असताना प्रत्येक वेळी पारूल तिला हर प्रकारे सपोर्ट करत होती. शेवटी ती मनवाच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि घटत चाललेलं वजन न बघवून तिला तिच्या काकांकडे काऊंसेलिंगसाठी घेऊन गेली.

ती तिच्या नॉर्मल सेल्फकडे हळूहळू परत येतानाच एके दिवशी कोर्टात तिला राहुलच्या मुंबई ऑफिसमधला कलीग भेटला. त्याच्याशी गप्पा मारता मारता तिला समजलं की राहुलचे त्याच्या बॉसच्या मुलीबरोबर अफेअर सुरू आहे आणि लवकरच ते लग्नाचाही प्लॅन करत आहेत. कलीग्जना त्याने मनवा त्याची फक्त क्लासमेट होती एवढेच सांगितले होते. अचानक तिला त्याच्या कमी झालेल्या पुणे ट्रिप्स, फोन नेहमी बिझी असणे या सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या. ती पूर्ण ब्लॅंक होऊन तिथून कशीबशी घरी पोहोचली पण या गोष्टीचा तिच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता.

दोन दिवस पारुलने तिला समजावून शेवटी तिने त्याला फोन करून फोनवरच ते नाते संपवून टाकले होते. तेव्हाही त्याचा ऍटीट्यूड कमी झाला नव्हता. त्याने तीच कशी इम्मॅच्युअर आहे, कमकुवत आहे आणि इतर अनेक विशेषणे लावून मीच हे नाते संपवतोय हे ओरडून ओरडून सांगितले होते. तरीही ती तिरस्काराने का होईना अजूनही त्याला पूर्णपणे विसरू शकली नव्हती. त्याच्यावरच्या रागाने तिने स्वतःला प्रचंड कामात गुंतवून घेऊन करिअरचा बराच पल्ला गाठला होता. तेव्हा तिला काही करून ती कमजोर नाही, कुणाहीपेक्षा इंफिरीयर नाही हे सिद्ध करायचे होते. घरी सगळ्यांना तिची काळजी होती पण त्यांच्या काळजीने तिला अजून घुसमटायला होत होते. आता बाहेरून सगळं छान छान दिसत असलं तरीपण मनात तीला अजूनही न्यूनगंड छळत होता. अजूनही ती तिच्या अंधाऱ्या जागेतून बाहेर येत नव्हती.

तिला जोईच्या भुंकण्याने अचानक जाग आली तेव्हा लक्षात आले की गेला तासभर ती लॅपटॉपसमोर टेबलवर डोकं टेकून झोपून गेली होती. तिने दार उघडून जोईला आत घेऊन स्वीगीवर मुद्दाम तिच्या आवडीचा जंक लंच ऑर्डर केला (खड्ड्यात गेलं हेल्दी फूड! म्हणत) आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. तासाभराने तिच्या पोटात कावळे ओरडायला लागल्यावर आलेली बर्न्ट गार्लिक बटर फ्राईड राईस आणि ऑरेंज चिकनची डिलिव्हरी घेऊन तिने खाता खाता फेसबुक ओपन केले. ढोल्या राहुल आणि त्याच्या ढोल्या बायकोचे कुठल्याश्या ऍनिवर्सरीचे युरोपमध्ये एकमेकांच्या पाप्या घेतानाचे फोटो फीडमध्ये आल्यावर तिने डोळ्यात पाणी येईतो हसून घेतले. पारूलने तिच्या क्युट, गुब्बू ईशानचा फोटो प्रोफाइल पिक लावला होता, त्याला एक बदाम देऊन, aww बाबुडी म्हणून कमेंट करून झाली. जोईला मध्ये मध्ये चिकनचे पिसेस दिल्यामुळे तोही खूष होऊन त्याने नाचून नाचून शेवटी सोफ्यावर पडी टाकली. मध्येच इंद्रनील रायचौधरी सर्च करून तिने त्याची प्रोफाईल उघडली. तो विशेष ऍक्टिव्ह दिसत नव्हता. प्रोफाइल पिक म्हणून जोईबरोबर मस्ती करतानाचा एक कॅण्डीड फोटो होता. ती त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर झूम करून अजाणता कितीतरी वेळ बघत बसली..

पुन्हा काम करता करता रात्र होऊन, झोपायची वेळ झाल्यावरही इंद्रनील घरी आला नव्हता. तिने एकदा कॉल केल्यावर त्याचा busy, will be late इतकाच मेसेज आल्यावर ती रागाने झोपायला निघून गेली.

सकाळी ७ वाजता कानाशी वाजणाऱ्या फोनने तिला जाग आली, तेव्हा अरूआंटी कॉल करून सांगत होत्या "मनवा, वी हॅव जस्ट लँडेड, कॅब लेके आधे-पौने घंटेमे पहूंच जाएंगे. हाऊ आर यू बेटा? जोईने ज्यादा तंग तो नहीं किया?"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १४

"आणि इंद्रनील आहे का अजून तिथे? दो दिन पहले कॉल किया था उसने. त्याला सांगू नको, सरप्राईज देते है. क्रिती और उसको नॉलेन गुडेड रोशोगुल्ला बहुत पसंद है, मैने ढेर सारा बनाया था तो लेके आ गई. खूष हो जायेगा लडका. अरे अँड व्हॉट अबाऊट दॅट ओल्सन केस? कौन गया था NCLT में?" अरूआंटी घाईघाईत बडबड करत होती. "अरे अब सब यही बोल दोगी क्या, घर जाके बोलो ना.." मागून अंकलची अस्पष्ट कटकट ऐकू येत होती.

मनवा फोनवर बोलत बोलत बाहेर आली तेव्हा नीलचे दार आतून बंद होते. ती हसत म्हणाली "हां आंटी, ऑल ओके. इंद्रनील इज स्लीपिंग इन हिज रूम. बस आप आ जाओ, फिर बात करते है.."

फोन सोफ्यावर टाकून तिने भराभर मेंटल चेकलिस्ट टिक करायला सुरुवात केली.

१. लिविंग रूम आणि किचनमधला पसारा आवरायला घेतला. तसा पसारा काही नव्हताच तरी काही चॉकलेट, बिस्किटांचे चुकार रॅपर्स वगैरे होते ते तिने डस्टबिनमध्ये कोंबले.

२. कलाबाईंना फोन करून अरुआंटी आल्यामुळे आजपासून परत यायला सांगितले.

३. तिची बेडरूम आवरली, कपडे घडी करून बॅगेत भरले, बाथरूममध्ये जाऊन ब्रश करून लगेच तिच्या ब्रश, पेस्ट, बॉडीवॉश, शाम्पू, परफ्युम वगैरे सगळ्या डब्याडुब्या जमवून आणून बॅगच्या वरच्या कप्प्यात ओतल्या. आंघोळ घरीच करेन म्हणत टॉवेलही घडी घालून बॅगेत टाकला.

४. फ्रीजमधल्या गुलाबजाम आणि जोईसाठी ठेवलेल्या चिकनबद्दल आंटीना सांगणे.

शेवटचं सोडून ऑल checked!

बेडवर काढून ठेवलेली ब्लॅक जीन्स आणि शेवाळी रंगाचा बाह्या फोल्ड केलेला लिनन शर्ट घालून, पोनीटेल बांधून तयार होऊन ती कॅण्डी क्रश उघडून बसली. पण खेळणं सोडून तिचे हात मोबाईलवर तसेच राहिले. तिच्या मनात फक्त आणि फक्त इंद्रनील घर करून बसला होता. परवाची ती मॅजिकल संध्याकाळ, त्यांच्यातली वाढलेली जवळीक आणि तिने निर्दय होऊन त्याला तोडून टाकणे.. आणि आता तो पुन्हा तिला कधीच दिसणार नव्हता. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. पण ही गोष्ट करणे खूप गरजेचे होते. ती स्वतःला आटून गेलेल्या नदीसारखी समजत होती, जिच्या नीरस, भुसभुशीत वाळूत आता कधीच कुणाची पावलं उमटणार नव्हती. कुणालाही जीव लावण्याइतकं प्रेम आता तिच्याकडे शिल्लकच नव्हतं. हे सगळे विसरून जायला ती पटापट कँडीची एकेक रांग ब्लास्ट करत सुटली.

खाली कॅब येऊन थांबल्याचा आवाज आला तेव्हा तीने टेरेसमध्ये जाऊन आंटीना हात केला आणि पळत खाली गेली. त्यांना बॅग्ज आत आणायला मदत करत तिने चहा ठेवला. ते फ्रेश होऊन येईतो चहा तयार होता. त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलवर बसून चहा झाल्यावर तिने अरू आंटींची सगळी उत्तरं दिली.

"आय हर्ड, इंद्रनीलसे तुम्हारी अच्छी दोस्ती हो गई थी.. तो डिनरला आला होता ना तुझ्याकडे? आम्हाला खूप आनंद झाला. जनरली तो शाय आहे असं जेवायला वगैरे जात नाही कोणाकडे. ही इज व्हेरी आउटस्पोकन प्रोफेशनली, बट हिज पर्सनल लाईफ? नोप! ही वोन्ट डिसक्लोज अ सिंगल थिंग. समटाइम्स आय वरी अ लॉट. बट अच्छा बच्चा है. उससे बात करती रहना.." आंटी तिच्या हातावर थोपटत म्हणाल्या.

"अरू, उसे भी वो रोशोगुल्ला दे दो ना पॅक करके, घर लेके जाएगी" सिंकपाशी कप ठेवत अंकल म्हणाले.

"हा, हा रुको मनवा. क्रिती हॅड ऑर्डर्ड सम नॉलेन गुड, सो आय युज्ड ऑल ऑफ इट अँड मेड दीज मेनी रोशोगुलाज. फिर भी नील को ये कम पड जाएंगे देखना.." म्हणत आंटीनी एका टपरवेअरमध्ये भरपूर रसगुल्ले घालून तिच्या हातात दिले.

"थँक्स आंटी, आय'ल लीव्ह नाउ.. बाय, सी यू इन द ऑफिस. हां और वो ओल्सन का हिअरिंग हो गया, नाउ वी आर वेटिंग फॉर द ऑर्डर." घाईघाईने तिच्या गोंडे लावलेल्या कोल्हापुरी चपला पायात अडकवत ती म्हणाली.

"थँक्स टू यू मनवा, यू केम अँड मॅनेज्ड ऍट सच अ शॉर्ट नोटीस. यू नो ना जोई को वो सिटर्सके पास रहना पसंद नहीं, ही गेट्स सो लोनली.. चलो उस महाराजासे मिलती हुं, अंकल के सरपे बैठा होगा!" त्या दारात येत म्हणाल्या.

हसून त्यांना बाय म्हणून मनवाने हेल्मेट घालून, बॅग पायाशी ठेवून तिची डिओ वळवून गेटकडे घेतली आणि स्टार्ट करताना हळूच वर पाहिलं तर टेरेसमधून अंकल जोईचा पंजा हलवून तिला बाय करत होते. तिनेही हसून "बाssय जोई" ओरडून त्याला अजून भुंकायला लावले. खालच्या खोलीच्या खिडकीची काच आणि पडदा आताही बंद होता. तिने मान हलवून गाडी सुरू केली आणि पटकन गेटबाहेर गेली.

ऑफिसला गेल्यापासून तिची पेंडिंग कामं आणि अपॉइंटमेंट्स संपवता संपवता संध्याकाळ झाली. अधूनमधून पारुल तिला अरुमॅमच्या हॉट नेफ्यूबद्दल विचारायचा प्रयत्न करत होती पण मनवा तिला व्यवस्थित डॉज करत होती. रोज रोज दिवस रात्र तिचं तेच ते रुटीन बाय हार्ट केल्यासारखं सुरू होतं. पंधरा वीस दिवस गोल गोल तेच तेच जगून शेवटी तिचा बांध फुटला. ऑफिसमध्ये ती तिच्या खुर्चीत बसून हाताने टेबलवेट फिरवत विचार करत होती. तिने तिचं डोकं हेडरेस्टला टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. आज पुन्हा तिला खाऱ्या पाण्याचे लोट वाहू द्यायचे नव्हते. दिवसभर तिला काहीच सुचत नव्हतं. कामासाठी डेस्कटॉपवर तीन वेळा तरी न्यू वर्ड फाईल ओपन करून काहीच टाईप न करता तिने बंद करून टाकली होती.

टी ब्रेकमध्ये पारुल काहीतरी सांगायला तिच्या केबिनमध्ये डोकावली तेव्हाही ती डोळे मिटून बसली होती. "मनवा? व्हॉटस राँग?" तिने खांद्यावर हात ठेवत विचारले.

"आयम गोइंग मॅड डूड! क्या करू, कुछ समझमे नही आ रहा.." ती डोळे मिटल्या मिटल्याच म्हणाली.

"कमॉन! टेल मी एव्हरीथिंग फ्रॉम द स्टार्ट. डोन्ट मिस अ सिंगल स्पेक्. मनवा, बस नेss लाईफ है, तकलीफ तो रेवानीss" पारूल तिला दरडावत तिचे हात धरून समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली. रागात असल्यावर तिच्यातली गुजराती बेन सगळी दारंखिडक्या तोडून बाहेर यायची.

"दॅट डे अरूमॅम कॉल्ड मी टू स्टे ऍट हर हाऊस टू टेक केअर ऑफ जोई टिल दे रिटर्न.." तिने सांगायला सुरुवात केली. तासाभराने सगळी गोष्ट सांगून संपली तेव्हा तिच्या डोळ्यातून ऑलरेडी पाणी वाहायला लागलं होतं.

"मनवा! यू डफर! मने समजायू.. धिस वॉज अ गोल्डन चान्स, इतना सही आदमी कहा मिलनेवाला है! व्हॉट इज धिस यार, ऍट लीस्ट उसे डेट तो करती.. चल ये बता वो रहता किधर है.." 

"समव्हेअर इन अंधेरी"

"पागल! ऍड्रेस भी नई, नंबर है?"

"हम्म बट आयम नॉट गोइंग टु.." म्हणेपर्यंत पारूलने तिचा फोन खेचून कॉन्टॅक्टस मध्ये सर्च सुरू केला होता. "पारुल, स्टॉप, डोन्ट डू इट.." म्हणत ती फोन खेचू लागली तर पारूलने फोन स्पीकरवर टाकून उंच धरला. "द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज नॉट रीचेबल" फोनमधून आवाज येत होता. लगेच ती एक विनिंग स्माईल देत खुर्चीत बसली. "गधेडी!" पारुल खालच्या आवाजात पुटपुटली.

"सोशल मीडिया? फेसबुक, ट्विटर? पारुलने टिचक्या वाजवत विचारले. "ज्यादा युज नही करता, इंस्टा पे दिखता है कभी कभी." त्याचे इन्स्टा नेम सांगत मनवा हळूच म्हणाली.

"अरे फिर तो ग्रॅब हिम, छोड ही मत उसको. आजकल पता है दीपेश इतना पबजी खेलता है, मेरी तरफ देखने का टाइम नही है उसको." म्हणत तिने इंस्टावर त्याचं Drifter_Neil अकाउंट उघडलं. आकाश, लाटा, उंच खडबडीत खोड असलेली झाडं, निरनिराळे डोंगर, पाण्यात चमकणारा चंद्र असेच सगळे आर्टसी फोटो होते. "अब्बे.. म्हणत ती फोन खाली ठेवणार इतक्यात एक नवा फोटो पॉपअप झाला.

'मोरपंखी निळ्या रंगाच्या ट्रेनचे दार, ज्याच्या बाजूला खिडकीखाली DHR 126 लिहिले होते.'

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १५

"DHR 126!" व्हॉटस दॅट?? पारुल तिचं लांब नाक अजून वाकडं करत म्हणाली. "लेट्स गूगल!" म्हणत तिने टपाटप टायपिंग सुरू केलं.

"झालं सुरू" म्हणून मान हलवून मनवा गप्प तिच्याकडे बघत बसली.

लगेच "येस्स" म्हणून तिने मान वर केली. "मनवा डार्लिंग, आपका प्रिन्स चार्मिंग यहा छुपा बैठा है!
दार्जिलिंग - हिमालयन रेल्वे!"

आता डोकं खाजवायची वेळ मनवाची होती. हा पंधरा वीस दिवसात काम संपवून गेला तरी कसा? आत्ता दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनमध्ये काय करतो आहे..

"टू फीट गेज रेल्वे दॅट रन्स बिटवीन न्यू जलपायगुडी अँड दार्जिलिंग इन द इंडियन स्टेट ऑफ वेस्ट .." "ओ हाsलो! विकिपीडिया! स्टॉप इट. तेवढं माहितीये.." जरा मूडमध्ये येत मनवाने तिला मध्येच थांबवलं.

"हम्म.. तो अब.." पारुल विचार करता अचानक चुटकी वाजवून म्हणाली, "अब तू निकल! टेक अ हॉलिडे!"

"आर यू मॅड??" मनवा किंचाळत म्हणाली. "इतना सारा काम पडा है, ट्रेनीज छुट्टीपे है. अँड यू थिंक ऑफ अ हॉलिडे??"

"अरे तुला क्काय करायचं? मी आणि मॅम बघून घेऊ. जा सिमरन जा.. जीले अपनी जिंदगी! कोई मिला तो मिला, नही तो गो सोलो. योलो!" पारुल डोळा मारत म्हणाली.

"आयडिया बुरा नही है.." बारीक हसत मनवा म्हणाली.

दोन दिवसात पारुलने काय जादू केली कुणास ठाऊक, मनवाच्या सोलो हॉलिडे प्लॅनसकट तिकिटं तयार होती. तिकिटं तिच्या हातात देताना पारुल हळूच तिच्या कानात म्हणाली, " वो मिला तो ठीक. नही तो और कोई मिल ही जाएगा, और वो भी नही मिला तो कोई नही, शुद्ध हवा तो मिल ही जाएगी!" आणि दोघी खुसखूसत हसायला लागल्या.

सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ती पुण्याहून दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसलीही होती. दिल्लीत ब्रेक घेऊन पुढे बागडोग्राची कनेक्टिंग फ्लाईट होती. ती निघाली तर खरी, पण आता तिची धडधड वाढली होती. आपण नक्की काय शोधतोय, कशाच्या भरवश्यावर दार्जिलिंगला चाललोय हे तिला काही समजत नव्हते आणि दार्जिलिंगला जाऊन करणार काय हा भलामोठा प्रश्न आ वासून उभा होता. जाऊदे आता तिकीट काढलंय ते कॅन्सल करण्यापेक्षा जाऊनच येऊ म्हणत तिने कानाला हेडफोन्स लावले. दिल्लीला पोहोचेपर्यंत तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले. पुढच्या फ्लाईटला अजून दीड तास वेळ होता.

ती ग्राउंड फ्लोरच्या कॅफे दिल्ली हाईट्समध्ये गेली. इंटिरियर मस्तच होतं. कोपऱ्यातल्या मस्टर्ड सोफ्यावर बसून तिने चिली चीज टोस्ट आणि कॅफे मोकाची ऑर्डर दिली. आणि ते येईपर्यंत दिल्लीच्या वल्ली न्याहाळायला सुरुवात केली. सकाळी दहा वाजता पटियाला पेग लावणारे एक टेबलाला पोट टेकलेले, टोकेरी मिशाळ आणि विशाल अंकल, कोपऱ्यात एका सोफ्यात एक व्यक्ती आहे की दोन असा संशय येण्याइतपत एकमेकांच्या मांडीवर बसलेलं एक बारकुडं कपल, फोनवर कंटीन्युअस बाssरिक आवाजात बोलणारी एक फॉर्मल्सधारी एमबीए टाइप्स आणि अश्या रंगीबेरंगी क्राउडमध्ये ती! व्हाइट स्नीकर्स, डार्क ब्लू डेनीम्स, पांढरा स्कूप नेक टी शर्ट वर नेव्ही ब्लू हूडी आणि शेजारी ठेवलेली तिची लेदर बॅकपॅक.

तिची ऑर्डर येऊन पटापट खाऊन  बाहेर जाईपर्यंत तिची फ्लाईट आलीच होती. बागडोग्रा! कधी न ऐकलेल्या नावाच्या गावी ती आयुष्यात पहिल्यांदाच जाणार होती. ही सोलो ट्रिपच तर आयुष्यात पहिल्यांदा होती. दुपारी दीड वाजता ती बागडोग्राला लँड झाली तेव्हा तो एवढूसा एअरपोर्ट बघून तिला पुण्याचा एअरपोर्टही मोठा वाटू लागला. उतरून चालत ती फर्स्ट फ्लोरवरच्या एअरपोर्ट रेस्टरंटमध्ये गेली. तिथून तिने बुक केलेल्या कॅबला फोन करून थांबायला सांगितले.

कुठे दिल्लीचा तो स्वँकी कॅफे आणि कुठे हे साधंसुधं रेस्टरन्ट! पण तिथली माणसं, वेटर्स इतके साधे आणि प्रेमळ दिसत होते.. वेटरने सुचवल्याप्रमाणे तिने स्टार्टर म्हणून लोकल बेटका ग्रिल्ड फिश (आयुष्यात पहिल्यांदा!) आणि शिजवलेल्या भाज्या घेतल्या, बाकी नेहमीचा पंजाबी मेन कोर्स होताच. पहिल्यांदा फिश खात असली तरी तिला तो आवडलाच एकदम आणि घरी फिशचं नाव काढल्यावर लहान मुलांसारखे चमकणारे इंद्रनीलचे डोळे आठवले. जेवायला सुरूवात करण्याआधी तिने फिशचा फोटो काढून आईला पाठवला आणि बागडोगराला पोचून जेवायला बसलेय म्हणून सांगितलं. लगेच आईचे गालावर हात ठेवलेले चार पाच निळे स्मायली आले. जेवून बॅग कलेक्ट करून ती बाहेर येईपर्यंत अडीचची टळटळीत दुपार झाली होती पण पावसामुळे सगळीकडे फक्त हिरवाई आणि शांतता पसरली होती. आजूबाजूला इतका हिरवा रंग आणि वर निळंभोर मोकळं आकाश बघून तिला पारुलचं वाक्य आठवलं, कुछ नही तो शुद्ध हवा तो मिलेगी! तेच मनात रिपीट करत ती पुढे झाली.

समोरून गडबडीने एक जीन्स, टीशर्ट घातलेला लहानसा, बारीक डोळेवाला मुलगा पळत पळत तिची बॅग घ्यायला आला. "हॅलो मॅडमजी, अ.. मै ड्रायवर, दार्जिलिंगका बुकिंग है. आपने फोन किया था.." त्याचं लाजणं बघून कॅब नंबरकडे नजर टाकून तिने विचारलं,"हां, नाम क्या बताया तुमने?"

"प्रोतीक" तोंडाचा शक्य तितका गोल करत तो म्हणाला.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १६

"मॅडम, ये हमारा रिसीट और लायसेन्स, एक बार चेक कर लिजीए." तो कागदपत्र तिच्या हातात देत म्हणाला. तिने ते नीट वाचून परत दिल्यावर त्याच्याकडे बॅग दिली.

ती मोठी काळी ट्रॉली बॅग ओढत तो समोरच्या वॅगन-आर कडे निघाला, तशी तीपण त्याच्यामागे भराभर जायला लागली. त्या बॅगेच्या वजनाची आता तिला लाज वाटत होती. पाच दिवसांसाठी एवढं समान! आईने मुलीला तिथे उपाशीच रहावं लागेल असं ठरवून चिवडा, बाकरवडी, रवा लाडू, बेसन लाडू असं सगळं पुरेपूर भरून दिलं होतं. त्यात आणखी थंडी असेल म्हणून स्वेटर्स आणि स्टोल होते ते वेगळेच. तो सामान ठेवेपर्यंत ती ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसून रिलॅक्स झाली होती. पुढे बसल्यामुळे एक तर व्ह्यू छान मिळणार होता आणि ती अलर्ट राहणार होती. प्रोतीकने येऊन कार सुरू केली.

तिने लगेच पारुलला अपडेट पाठवला. 'ऑन द वे टू दार्जिलिंग इन सर्च ऑफ प्रिन्स चार्मिंग!" पारूलचे लगेच दोन heart eyes स्मायली टपकले.

तिने फोन मांडीवर सॅकच्या खिशात ठेवला. "तो भैय्या पहूंचनेमे कितना टाइम लगेगा?" ड्रायव्हरकडे पहात तिने विचारले.

"तीन घंटा तो लगेगा, बारिश रही तो चार भी लग सकते है" तो जरा गंभीर चेहऱ्याने म्हणाला. "ज्यादासे ज्यादा साडे छे तक पहूंचही जाएंगे."

हम्म.. ती बॉटलमधून घोटभर पाणी पीत म्हणाली.

"मॅडम गाना लगाऊ?"

"नही, रहने दो.. शांती अच्छी लग रही है.." म्हणून ती खिडकीतून बाहेर पळणारी ओक, मेपल, बर्च वगैरे लांबोडकी झाडे आणि बारीक पावसात त्यांच्या झुकलेल्या फांद्या-पानांवरून टपटपणारे पाणी पहात राहिली. रस्त्याकडेची जमीन पोपटी मखमली कार्पेट पसरल्यासारखी गवताने भरून गेली होती. त्यातही पाणी साचून जमीन डबडबली होती. पुढे वळणे घेत जाणारा अगदी अरुंद रस्ता, शेजारी दरीत दिसणारे हिरवेगार चायबागान, प्रत्येक वळणावर डोकावणारी हिमशिखरे आणि वर निळसर आकाशात फिरणारे पिंजलेल्या कापसासारखे ढगांचे पुंजके बघून तिला अचानक ह्या हॉलिडेवर येणं हा बेस्ट डिसीजन होता हे खरोखरीच पटलं.

थोडावेळ काचेबाहेर बघितल्यावर अचानक तिला रिअलाइज झालं की इंद्रनील इथेच कुठल्याही वळणावर आपल्याला दिसू शकतो. याच हवेत कुठेतरी श्वास घेतो आहे.. याच आकाशाखाली राहतो आहे. या विचारांनीच तिला एकदम थरथरायला झालं. तिने हूड डोक्यावर ओढून हाताची घट्ट घडी घातली.

पुढचा सगळा रस्ता पेशन्सची परीक्षा बघणारा होता. अरुंद वळणे, त्यात टूरिस्ट कार्सची दाटी आणि रस्त्यातले खड्डे! त्यात हा जरा लाजरा ड्रायव्हर त्यामुळे बडबडही करू शकत नाही. पण कामात मात्र अगदी व्यवस्थित होता त्यामुळे पटला तिला. साधारण सहा वाजता ते 'वेलकम टू दार्जिलिंग' साइनबोर्डपाशी पोहोचले. ड्रायव्हरने तिला बुकिंग केलेल्या हॉटेल शोनार बांग्लासमोर सोडले आणि साईटसीइंगला जायचे असेल तर सकाळी कॉल करायला सांगितला.

ती चेकइन करून, आंघोळ करून बाथरोब आणि डोक्याला टॉवेल अश्या अवतारात बेडवर येऊन पडली तेव्हा आठ वाजले होते. तिने रिसेप्शनला कॉल करून चौकशी केली तेव्हा समजले की अख्खं दार्जिलिंग संध्याकाळी साधारण सात वाजताच बंद होऊन जातं. "बापरे, हे तर पुणेकरांच्याही वरताण निघाले की!" म्हणत तिने तोंड वाकडं केलं. तसेही तिच्यात बाहेर जायचे त्राण उरले नव्हते. शेवटी तिने रूम सर्विसकडून एक दालखिचडी मागवून खाल्ली आणि लगेच ब्लॅंकेटमध्ये गुरगुटून झोपून गेली.

सकाळी सहा वाजताच तिला खिडकीतून येणाऱ्या विचित्र आवाजाने जाग आली. खिडकीत डोकावून पाहिले तर बाहेर विंडोसीलवर दोन पिवळ्या-नारिंगी चोचींच्या, काळ्या मैना बसून क्रॉक क्रॉक करत जोरदार भांडत होत्या. त्यांच्या कलकलाटाला कंटाळून तिने काचेवर जोरात टकटक केल्यावर त्या घाबरून उडून गेल्या.

लवकर उठलेच आहे तर त्या फेमस ग्लेनरी'ज बेकरीचं दर्शन घेऊन येऊ म्हणून ती पटापट तयार झाली. सॅक पाठीला लावून माल रोड वरून चालतच ती ग्लेनरी'ज ला पोचली. पांढऱ्या रंगवलेल्या लाकडी फ्रेम्स असलेल्या काचेच्या भिंती, खिडकीत ठेवलेल्या लहान फुलझाडांच्या कुंड्या आणि काचेच्या दारं खिडक्यांमुळे बेकरीला एकदम ब्रिटिश लुक होता. अर्थात दार्जिलिंग ब्रिटिशांची सिजनल राजधानीच होती हे जिथे तिथे कलोनिअल आर्किटेक्चर, घरांचे रंग, फुला-पानांमध्ये डोकावतच होतं.

आत गेल्यावर डिस्प्लेचा खजिना बघून ती वेडीच झाली. चारी बाजूनी काचेची कपाटच कपाटं निरनिराळ्या कुकीज, चॉकलेट्स, बिस्किट्स, पेस्ट्री, पाईज, मफीन्स, रोल्स आणि कित्येक रंगीबेरंगी कॅण्डीजनी ठासून भरली होती. ती वर जाऊन ओपन सिटिंग एरियामध्ये बसली. लहानसं गोल टेबल आणि वर पावसामुळे लाल गार्डन अंब्रेला लावलेली होती. आजूबाजूला लाल, पिवळ्या, निळ्या फुलांनी डवरलेल्या कुंड्या आणि फुलांच्या डोक्यावरून कोवळ्या उन्हात सगळीकडे त्याचा चमचमता मुकुट झळकवणारा कांचनजंगा!

कितीतरी वेळ आपण फक्त समोर पहात बसून राहिलोय हे अचानक तिच्या लक्षात आलं. तिने इकडे तिकडे पाहिलं पण कोणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते, बरेचसे लोक गप्पा आणि खाण्यातच मश्गुल होते. हुश्श! म्हणत तिने वेटरला बोलवून तिची दार्जिलिंग टी पॉट, की लाईम पाय आणि व्हेज पफ्सची ऑर्डर दिली आणि न राहवून चार ब्लुबेरी मफीन्स पॅक करायला सांगितले. कलोनियल एराची साक्ष देत चांदीच्या केटलमधून मोठ्या पांढऱ्याशुभ्र कपात चहा सर्व झाला. त्याचा तो लालसर सोनेरी रंग पाहूनच तिला आह! दिस इस दार्जिलिंग! असं झालं. रमतगमत नाश्ता करून ती ऑलमोस्ट दोन तासांनी बाहेर पडली. तोपर्यंत माल रोडची सगळी दुकानं उघडून सगळीकडे फॅशनेबल कपडे, स्वेटर्स, लाकडी वस्तू आणि भरपूर तिबेटी जंक ज्यूलरी दिसत होती. थोडावेळ रेंगाळत विंडो शॉपिंग करून तीने प्रोतीकला कॉल केला.

त्याची कार येईपर्यंत ती जवळच्याच एका कॅफेत फक्त पाण्याची बॉटल विकत घेऊन बसली. ऑफ सिझनमुळे कॅफेवाले लोक निवांत होते. मोबाईल बाहेर काढल्यावर न राहवून तिने शेवटी इंस्टा उघडलंच. आणि शुअर इनफ तिथे नवा फोटो होता! फिक्या सोनेरी पिवळ्यापासून गडद लाल होत जाणाऱ्या चहाच्या पांढऱ्याशुभ्र सिरॅमिक बोल्सची रांग आणि शेजारी चमच्यात सोनेरी चहा धरलेला एक मोठा तळवा, जो तिच्या चांगल्याच परिचयाचा होता..

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १७

तो हात बघून तिने एक खोल श्वास घेऊन डोळे उघडले. 'हे आता कुठे शोधून काढू? कुठले चहा आहेत हे? टी टेस्टिंग दिसतंय..' म्हणत ती विचारात पडली. 'काश, इथे तो बाबांचा लाडका ब्योमकेश बक्षी असता! धोतराचा सोगा धरून तरातरा जाऊन शोधून काढलं असतं त्याने. आता इथे मलाच शरलॉक झालं पाहिजे' विचारात असतानाच समोर कॅबचा हॉर्न वाजला.

ती पटकन बॉटल सॅकमध्ये कोंबून जाऊन गाडीत बसली. "प्रोतीक, ये फोटो देखो. ये जगह कौनसी है बता सकते हो?" तिने उत्सुकतेने विचारले.

त्याने फोटो बघून मान हलवली. "ये किसीभी चायबागान का हो सकता है. यहां बहोत है ऐसें."

हम्म.. ती जरा हिरमुसली. "तो आज क्या देखें? तुमही बताओ." 'पारुलने प्लॅन केल्यामुळे सगळे पटेल स्पॉटच असणार' हे पुढचं वाक्य मनात म्हणत तिने विचारलं.

"आपको यहांकी रिअल लाईफ देखनी है तो चाय बागान देखना पडेगा. लेकिन वो कल देखो. आपको एकदम उपरसे दार्जिलिंग देखना है? तो हम रंगीत व्हॅली रोपवेपर चलते है. सीधा चार हजार फीट उपर है!" तो गर्वाने म्हणाला."फिर नीचे आनेके बाद पीस पगोडा और टॉय ट्रेन देखेंगे." आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो असं म्हटल्यासारखा मख्ख चेहरा करत त्याने गाडी सुरू केली.

त्याला एवढं तरी बोलताना बघून तिला बरं वाटलं. 'रंगीत व्हॅली बघू तरी किती रंगीत आहे' मनात म्हणत पुन्हा ती चहाचे रंग आठवायला लागली. पुन्हा रंगीबेरंगी चौकोनी घरं आणि हिरवाईतून वाट काढत गाडी सिंगमडीला रोपवे बुकिंगच्या पायथ्याशी थांबली. तिने उतरून पायऱ्या चढून वर जाऊन तिकीट काढले. ऑफ सिझनमुळे रांगेत दोन तीनच लोक होते. केबल कारला तिकीट देणारा मुलगा गोंडोला म्हणत होता. बssर, गोंडोला तर गोंडोला म्हणत ती पुढे गेली.  चारी बाजूनी काचा असलेली एक चार लोकांच्या कपॅसिटीची गोंडोला होती. तिने अजून एका एकट्या मुलीला एकत्र बसायची ऑफर दिली.

त्या दोघी बसल्यावर हजारो फुटांवरून गोंडोला खाली जायला लागल्यावर दोघी घट्ट डोळे मिटून एकत्र किंचाळल्या पण डोळे उघडताच खालचा खूप सुंदर व्ह्यू दिसायला लागला. समोरची मुलगी लगेच डीएसएलआर काढून म्यूट क्लिकक्लिकाट करायला लागली. मनवा शांत बसून समाधी लागल्याप्रमाणे खालची बदलणारी दृश्ये पहात होती. गुबगुबीत, हिरव्यागार टी इस्टेट्स, त्यात काम करणाऱ्या बायकांचे रंगीबेरंगी ठिपके, ऊंचच ऊंच सूचिपर्णी वने, उचंबळत वाहणाऱ्या आणि पुढे जाऊन एकत्र होणाऱ्या दोन नद्या, रंगीत आणि रम्मन. उंचावरून कडाडून झेपावणारे धबधबे. गोंडोलाच्या काचेबाहेर हात लावायच्या अंतरावर घुटमळत असलेले ढग, लांबवर चमकणारी हिमालयाची शिखरे, काचेला चिकटून हळूच ओघळणारे पावसाचे बारीक बारीक थेंब आणि चहूबाजूचे धुके!

ती मंत्रमुग्ध होऊन काचेतून बाहेर पहात होती. बाहेरच्या शांततेत तिला हळूहळू स्वतःच्या आत कुठेतरी खोलवर दबून राहिलेली शांतता सापडत होती. तिला तिच्या काऊन्सलरने दिलेल्या डोडिंस्कीच्या पुस्तकातला एक quote आठवत होता. 'In solitude, there is healing. Speak to your soul, listen to your heart. Sometimes in the absence of noise we find the answers.'  तिचे स्वतःचेच बाकी सगळे आवाज बंद होऊन शांततेत फक्त तिच्या अंतरात्म्याचा आवाज जाणवत होता.

केबल कारला परत येण्याची काही लिमिट नसल्यामुळे निवांत कितीही वेळ थांबता येईल हे इन्स्ट्रक्टरने आधीच सांगितल्यामुळे दोघी रिलॅक्स होत्या. शेवटच्या स्टॉपवर उतरून फोटोग्राफर मुलगी हॅपी व्हॅली टी इस्टेट बघायला गेली आणि मनवा एक एस्प्रेसो घेऊन सिटआऊट मध्ये गेल्या सगळ्या दिवसांचा विचार करत बसली. एस्प्रेसोचा एक घोट घेतल्यावर भुकेची जाणीव झाली म्हणून तिने बॅगेतून दोन ब्लूबेरी मफीन्स काढून गट्टम केले. थोड्या वेळात फोटोग्राफर मुलगी येऊन त्यांनी परतीची गोंडोला पकडली. तोच रस्ता परत कापताना तिच्या मनाचा जवळजवळ निर्णय झाला होता त्यामुळे तिला अचानक आजूबाजूच्या ढगांपेक्षा हलकं हलकं वाटायला लागलं होतं.

केबलकार थांबल्यावर उतरून तिने लगेच ड्रायव्हरला कॉल केला तेव्हा कळलं की तो वाट बघून चक्क घरी जाऊन झोपला होता! तिच्या फोनमुळे उठून आता परत येईतो पंधरा वीस मिनिटे रिकामी होती. ती गेटबाहेर जाऊन कडेला एका मोठ्या दगडावर जाऊन बसली तेवढ्यात ती फोटोग्राफर मुलगी तिच्यासाठीही एक समोसा आणि जिंजर टी घेऊन आली. गप्पा मारता मारता कळलं की ती मुलगी म्हणजे मोना गुप्ता, प्रोफेशनने दिल्लीच्या एका फाईव्ह स्टारमध्ये शेफ आहे आणि दर तीन महिन्यांनी आठ दिवस सुट्टी घेऊन सोलो ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि फोटोग्राफी करते. "वाह, काय मस्त! इंटरेस्टींग लाईफ आहे." ती मनात म्हणाली.

इतक्यात प्रोतीक आलाच, तिला घाईत थँक्स म्हणून बाय करत मनवा निघाली. आता वेळ खूप कमी असल्यामुळे त्यांना फक्त जापनीज पीस पॅगोडा आणि बतासिया लुपमधले गोरखा रेजिमेंटचे वॉर मेमोरियल बघता आले.

तिथून निघेपर्यंत आभाळ चांगलंच भरून आलं होतं आणि थंडगार वाऱ्यात तिला काहीतरी स्पायसी खायचा मूड होता. मघाशीच मोनाने सुचवलेले चौक बाजारातले बेस्ट तिबेटन फूड मिळणारे कुंगा रेस्टॉरंट तिच्या लक्षात होते. तिथे कॅब सोडून ती घाई घाईने आत गेली कारण साडेसहा सातलाच ते बंद होणार होते. एक क्युट हसऱ्या चेहऱ्याचे तिबेटी कपल हॉटेल चालवत होते. बेसिक लाकडी फर्निचर, लॅम्पशेड्स आणि काचेच्या टेबलांमुळे अगदी घरगुती वातावरण, त्यात त्या शेफ काकूंचा आग्रह. पात्तळ, चमकत्या शुभ्र लेयरचे मऊसूत चिकन मोमोज, परफेक्ट स्पायसी थुकपा सूप आणि भरपूर बॉइल्ड पण क्रंची भाज्या घातलेले ग्लास नूडल्स! प्रेमाने जास्तच पोट भरून खाऊन ती डायरेक्ट तिबेटी स्वर्गात पोहोचली.

ती गळ्याभोवती ग्रे-पिंक इन्फिनिटी स्कार्फ अडकवत बाहेर पडताना अचानक समोर एक उंच माणूस एका मुलीला मिठी मारत बाय म्हणून कारमध्ये बसताना दिसला.

"इज दॅट इंद्रनील?" म्हणत ती पुढे होईपर्यंत कार एव्हाना रिकाम्या झालेल्या मॉल रोडवरून वेगाने निघून गेली होती.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १८

दार्जिलिंगला पोहोचल्यापासूनच तिचे डोळे इंद्रनीलला शोधत होते, पण खराखुरा आणि इतक्या जवळ तो दिसेल अशी शक्यता तिला कधीच वाटली नव्हती. आत्ता इथे पारुल असती तर तिने "सारी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश कर रही है" वगैरे फिल्मी डायलॉग नक्की मारला असता, असा विचार येऊन तिला थोडंसं का होईना हसू आलं.

अचानक वरून रिमझिम पाऊस सुरू झाला. तिने पटकन हूड डोक्यावर सरकवून पळत हॉटेलचा रस्ता पकडला.

दुसरा दिवस उजडताच प्लॅनप्रमाणे प्रोतीक येऊन हॉटेलच्या एंट्रन्सपाशी थांबला होता. सकाळचे सात वाजले तरी धुक्याच्या जाड पडद्यातून पलीकडचे काहीच दिसत नव्हते. ती उत्साहाने पळत येऊन गाडीत बसली आणि त्याच्या गुड मॉर्निंगला उत्तर देऊन, पेन ड्राईव्ह देत म्हणाली, "चलो आज गाना सुनते है!" आज तिच्या कपड्यांनीही रंग बदलले होते.  गुडघ्यापर्यंत पोचणारा, पांढऱ्यावर रंगीबेरंगी पानंफुलं आणि कंबरेला बारीक ब्राऊन बेल्ट असणारा ज्यूट स्ट्रॅप्सवाला कॉटन ड्रेस, वर स्काय ब्लू डेनिम जॅकेट, पाठीला रोजची लेदर सॅक, पायात नेहमीचे व्हाइट स्नीकर्स कारण टी इस्टेटमध्ये खूप चालायचे होते आणि उगीच बरोबर आणलेले ब्राऊन रेबॅन एव्हीएटर्स ज्यांचा सध्या काहीही उपयोग नव्हता.

प्रोतीकच्या ठप्प चेहऱ्यावरदेखील तिला बघून दोन क्षण आश्चर्याचे भाव दिसले!

त्याने गाडी सुरू करून पेन ड्राइव्हवरची गाणी प्ले केली. शफल मोडवर पहिलंच गाणं तिचं आवडतं 'शिकायतें मिटाने लगी' लागल्याबरोबर तिने समाधानाने डोकं मागे टेकून डोळे मिटले. असेंडिंग नोट्सबरोबर मान वर खाली हलवत तिनेही 'अंधेरे को बाहोंमेss लेकेs, उजालेने घर बसाया है' जरा जोरात म्हणून घेतलं. प्रोतीक तिच्याकडे बघून हळूच हसत होता. जरावेळाने गाणं संपल्यावर तिने डोळे उघडून बाहेर पाहिले तर अजूनही सगळीकडे धुकेच धुके होते. "आज हम एक्झॅक्टली कहां जानेवाले है भैय्या? तिने प्रोतीककडे पहात विचारले.

"मॅडमजी, आज हम जा रहे है कर्शीयांग व्हिलेज. वहां पर है द फेमस, टॉप नंबर वन मकाईबाडी टी इस्टेट! दार्जिलिंग की नंबर वन चाय. बस दो घंटे लगेंगे" तो खुषीत म्हणाला.

त्याचा चक्क उत्साही हसरा चेहरा बघून ती चकित झाली. आज नक्की काय पिऊन आलाय हा? हवेतच तिने जरा नाक सुक सुक करून वास घेऊन बघितला. पण नाही, तसं काही जाणवत तरी नव्हतं.

"अरे वाह, लेकिन तुम इतने खूष क्यूँ दिख रहे हो आज?" तिने सरळच विचारून टाकलं.

"वो हमारा पुराना घर इधर ही है ना. हमारे मा बाबा मकाईबाडीमे काम करते थे. हम पहले इस्कूलमे थे तब इधर ही रहते थे. फिर हम दार्जिलिंग मे घर बनाये. अभी कर्शीयांग का घर टुरिस्ट को किरायेपे देते है. वो नया साईट है ना, एयर बीएनबी, उसपेभी रेजिस्टर किया है." तो आठवणीत रमत म्हणाला.

"अच्छा!" म्हणून आज इतकी खुषी, बरोबर आहे.

दोन तास गाणी ऐकत, मजेत ते मकाईबाडीच्या मेन गेटजवळ पोहोचले.

मकाईबाडीमध्ये प्रोतीक तिच्याबरोबर फॅक्टरीत येणार होता. तिथे त्याच्या ओळखीचे बरेच लोक होते. गेटमधून आत गेल्यावर उतरते हिरवे छत असलेली टी फॅक्टरी समोर होती. आधी फॅक्टरी बघून मग टी गार्डन बघायला जा असं प्रोतीकचं म्हणणं ऐकून ती आधी फॅक्टरी बघायला गेली. आत ठिकठिकाणी असलेले स्पेशल ऑरगॅनिक दार्जिलिंग चायपत्तीचे ढिगारे ते पूर्ण प्रोसेसिंग होऊन विक्रीसाठी तयार मकाईबारी असा बॉटल ग्रीन शिक्का आणि पाच हिरव्या पानांचा फुलासारखा लोगो असणारे चौकोनी लाकडी बॉक्सेस ही सगळी प्रोसेस तिला तिथल्या गाईडने फिरून दाखवली. 

ती आत आल्यापासून तिथे काम करणाऱ्या दोन बायका अधूनमधून तिला आपल्या मागे मागे करताना दिसत होत्या. आधी तिने दुर्लक्ष केले पण एका रोलिंग मशीनपाशी चहा पाने रोल होताना पाहून झाल्यावर तिने मागे वळून पाहिले तर दोघी खुसखुसत तोंडावर हात घेत पळून गेल्या.

गाईड तिला मकाईबाडीची जगातली पहिली टी फॅक्टरी असण्याची हिस्ट्री, त्याचे मालक, त्यांनी कसे दार्जिलिंगमधले पहिले ऑरगॅनिक टी प्रॉडक्शन सुरू केले वगैरे माहिती सांगत होता. तेव्हाच मकाईबाडीच्या टी टेस्टिंगबद्दलही त्याने सांगितले. उत्साहाने येस्स म्हणून ती टेस्टिंगसाठी तयार झाली. का ते तिलाच जास्त ठाऊक होते!

गाईड पटापट टेस्टिंगसाठी रांगेत ठेवलेल्या बोल्समध्ये वेगवेगळ्या चहाचे गरम पाणी घालून काढलेले एक्स्ट्रॅक्ट ओतत होता. ते फिका पिवळा ते लाल होत जाणारे रंग पाहून तिला नीलच्या फोटोचीच आठवण झाली. 'बॉटल ग्रीन कडा असणारे बोल्स! बहुतेक हेच होते ते!' ती मनात म्हणत होती. गाईडने सांगितल्याप्रमाणे चमच्याने एकेक चहा सुर्र करून टेस्ट करून झाल्यावर तिने ब्लॅक स्प्रिंगटाईम ब्लूमचे पाव किलोचे दोन आणि पारुलसाठी एक शंभर ग्रॅम ऑरगॅनिक ग्रीन टीचा लाकडी बॉक्स विकत घेतला.

फॅक्टरीतून बाहेर पडून ती आता प्रोतीक बरोबर टी गार्डनकडे चालायला लागली. सगळीकडे उंचावर भलेमोठे चहाचे कप ठेऊन त्यावर सूचना लिहिल्या होत्या. खाली ठिकठिकाणी बायका चहापत्ती तोडून पाठीवरच्या उंच बांबूच्या टोपलीत टाकत होत्या. डोंगर उतारावर सगळीकडे चहाची गब्दूल झुडपे असलेले मळे होते. सगळीकडे पत्ती तोडायचे काम धडाक्यात सुरू होते.

पुन्हा तिला मघाशी दिसलेल्यापैकी दोन वेण्या घातलेली मुलगी वाकून तिच्याकडे पाहून शेजारणीला काहीतरी सांगताना दिसली. तिने पटकन प्रोतीकला ती मुलगी दाखवून तिला बोलावून आणायला सांगितले. त्याच्याशी बोलताना खूप आढेवेढे घेत अखेर ती मुलगी आली. 'एय, तुम दोनो मेरे पीछे क्यू आ रही हो? और मेरे बारेमे कुछ बात भी कर रही थी. है ना?" मनवाने कपाळावर आठ्या आणत विचारले.

"अम्म.. वो होमारा शाबजी आपके बारेमे ष्टोरी बताता है.. हम आपका फोटो रोज देखता है घरमे. फ्रिजपे लगाया आपका फोटो.." त्या मुलीने घाबरत घाबरत सांगितले.

"क्या?" ती ओरडूनच म्हणाली. "क्या? कैसे? मेरा फोटो?? क्या नाम क्या है तुम्हारे इस साबजी का?"

"इंद्रोनील रॉयचौधरी.." तिने घाबरून उत्तर दिले.

मनवाचा झालेला आ बंदच होत नव्हता!

प्रोतीकने तिला दोन तीनदा मॅडम.. मॅडम म्हणून हाका मारल्यावर ती भानावर आली.

"कहा मिलेंगे तुम्हारे साबजी?" तिने जरा रागानेच विचारलं.

"वो..नीचे नर्सरीमे.. "

ऐकून मनवा उत्साहाने "भैय्या, मुझे नर्सरीका रस्ता दिखाओ" म्हणत प्रोतीकमागे उतारावरून, चहाच्या झुडुपांमधून धडपडत, मधेच घसरत भराभर चालत निघाली.

ते खाली पोहोचले तर समोर टी इस्टेट नर्सरी म्हणजे जमिनीच्या एका मोठ्या तुकड्यात गादी वाफे तयार करून त्यात चहाच्या मोठ्या झाडांची कटिंग्स लावून रोपं बनवली जात होती. जिकडे तिकडे लहान रोपांच्या सरळ रांगा आणि त्यात डुलणारी दीड ते दोन फुट उंचीची हिरवीगार, टवटवीत रोपे.

इतक्यात तिला डावीकडून तो परिचित, मखमली आवाज आला. एका रांगेच्या शेवटी खाली गुडघ्यावर बसून इंद्रनील एका नवीन मुलाला रोपाखालच्या चिखलात हात घालून "शिकोर ओरो माटी होते हाबे.." म्हणून समजावून सांगत होता. त्याने मान खाली केल्यामुळे काळ्या कॅपमधून त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याने खाकी कार्गो शॉर्टस आणि रिबॉकचा छातीवर मोठ्या फॉन्टमध्ये RUN लिहिलेला काळा ड्रायफिट टी शर्ट घातला होता. पायात वूडलँडचे जाड फ्लोटर्स होते.

"हां दादा" म्हणत त्या मुलाने दुसऱ्या रोपाखाली अजून माती ओतत मान डोलावली.

"भालो!" म्हणत इंद्रनीलने मान वर करून बघितले.

त्याला बघून काही कळायच्या आत मनवा "इंद्रनीssल!!" म्हणून किंचाळून पळत त्याच्यापर्यंत पोहोचली. तिला समोर पाहून धक्का बसून तो उभा राहिला आणि तिने समोर धरलेले त्याचे चिखलाने माखलेले हात चुकवत त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या छातीवर हळूच डोके टेकले. प्रोतीक आणि इतर मंडळी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असताना तो चिखलाचे हात तिच्यापासून लांब धरत खांदे उडवत हसला. तेव्हा त्याच्या डोळ्यात शेकडो लाईटबल्ब्स एकत्र उजळले होते.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १९

"मनवा.. देअर आर पीपल.." तिच्या फ्रेश, ऑरेंजीश सुगंध येणाऱ्या केसांवर हनुवटी टेकत तो कुजबुजला.

"शट अप! मेरे पैरपर एक कॅटरपिलर हैss" ती रडायला येत म्हणाली.

"ऊप्स.." म्हणत त्याने पटकन खाली बसून एका काडीने तिच्या शूजच्या बॉर्डरवर चालणारा एक जाडा सुरवंट काढून टाकला.

"चिल! तुम्हारे रोनेसे भाग गया वो बेचारा" म्हणत तो पुन्हा तिच्यासमोर उभा राहिला.

"आय एम सो ग्लॅड, दॅट आय फाउंड यू!" ती वर पहात पाणीभरल्या डोळ्यांनी हसत म्हणाली. बाजूला होत तिने प्रोतीकला बोलावून त्याची "ये प्रोतीक भैय्या दो दिन से हमारे ड्रायव्हर है" म्हणून इंद्रनीलशी ओळख करून दिली.

इंद्रनील बाजूला जाऊन नळाखाली हात पाय धुवून आला. प्रोतीकला जरा फिरून यायला सांगून तो मनवाला बरोबर घेऊन प्रॉपर्टीवर असलेल्या एका होमस्टेच्या सिटआउटमध्ये गेला. "आय एम अमेझ्ड! हाऊ डिड यू नो?" गार्डन अंब्रेलाखाली बांबूच्या खुर्चीत बसत तो म्हणाला. "हमारे भी कुछ सोर्सेस है!" ती पापण्या फडफडत म्हणाली.

"और कबसे आई हो? यू आर टोटली क्रेझी मनवा. समवन शूड टेल यू दिस!" तो हसत हसत म्हणाला.

"इट्स बीन टू डेज, फर्स्ट डे वॉज ओन्ली ट्रॅव्हलिंग. पुणे टू दिल्ली टू बागडोग्रा. फिर प्रोतीककी कॅबसे दार्जिलिंग. आय एम स्टेइंग निअर चौरस्ता. यस्टरडे आय वेंट टू रंगीत व्हॅली रोपवे, इट वॉज सो अमेझिंग! देन पीस पगोडा अँड द लूप. हॅविंग टोटल टाइम ऑफ माय लाईफ! अँड येस.. आय एट सो मच इन लास्ट टू डेज, आय एम स्केअर्ड टू चेक माय वेट नाउ!" हसत हसत तिची कंटीन्युअस बडबड सुरू होती.

तो उत्सुकतेने तिची सगळी बडबड ऐकत होता. "लेट्स फॅटन यू अप सम मोर! लंच का टाइम हो ही गया है, तुम्हे कुछ स्पेशल खिलाते है" म्हणत त्याने आतून एका माणसाला हाक मारत त्याची ऑर्डर सांगितली. "दो फंबी, एक आलू तमा, थोडासा आलू अचार, दो प्लेन रोटी, दालभात और डेझर्टमे सेल रोटी."

"दिस इज ऑल लोकल नेपाली क्युझीन. दीज पीपल वर्क ऍट मकईबाडी अँड ऑल्सो रन दीज होम स्टे'ज विथ फूड" ऑर्डर झाल्यावर तिच्याकडे बघून तो म्हणाला.

"नाईस! नाउ यू टेल मी, व्हॉट आर यू डूइंग हिअर?" यू वर जोर देत ती म्हणाली.

"मी? ओह आय फिनिश्ड माय वर्क इन फाईव्ह डेज टाइम अँड टूक अ मंथस ब्रेक बीफोर स्टार्टिग द न्यू ब्रांच. समवन ब्रोक माय हार्ट, यू नो.. तो अकेला, टीटोटलर देवदास 'टी' छोडके और क्या कर सकता है! आय एम हिअर सिन्स लास्ट फिफ्टीन डेज." तो नाटकी गंभीरपणे म्हणाला.

"टीटोटलर देवदास!!" म्हणून ती खोखो हसत सुटली.

"नो, आयम सिरीयस!" तो हसण्यात सामील होत म्हणाला. "ऍक्चुली, ये मेरा ननिहाल है. दिस इज माय मदर्स बर्थ प्लेस, ऍज इज अरूमासी'ज. बॅनर्जीज ऑफ कर्शीयांग. माय मॅटर्नल ग्रँडफादर वॉज डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड रेलटिव्ह ऑफ द ओनर्स ऑफ मकाईबाडी. दिस वॉज माय मदर्स मोस्ट फेवरीट प्लेस ऑन अर्थ. तो मैने मा के साथ मोस्ट ऑफ द व्हेकेशन्स यही गुजारी है. वी आर ऑलवेज वेलकम ऍट मकईबारी. वी स्टिल हॅव अवर अँसेस्ट्रल हाऊस हिअर ऍट पंखाबाडी रोड."

"ओह वॉव, हाऊ लकी! सो यू कम हिअर ऑफ्टन?"

"आय युज्ड टू, इस बार पाच साल बाद आया हूं. लेकिन यहां के केअरटेकर्स घर अच्छा रखते है" तो जीभ चावत म्हणाला.

तोपर्यंत त्यांचं जेवण आलं. एकेक पदार्थ एक्सप्लेन करत हळूहळू जेवल्यानंतर कॅलरी बर्न करायला म्हणून त्याने तिला टी गार्डनमधून त्याचा आवडता एकेक स्पॉट दाखवत चालत फिरवले. त्याच्याबरोबर गप्पा मारत फिरताना दोन तीन तास तिला आपण किती चाललोय याची अजिबात जाणीव नव्हती. शेवटी एका सिल्वर ओकखालच्या दगडी पारावर पाय स्ट्रेच करून बसल्यावर तिला कळलं की पायाचे अक्षरशः तुकडे पडलेयत.

"इंद्रनील.. यू मॉंस्टर! बताया क्यू नहीं, हमने इतना एरिया कव्हर किया? आय एम नॉट फीलिंग माय लेग्स.." जरा आं.. ऊ.. करत कळवळून ती म्हणाली. "ओह, आय एम एक्सट्रीमली सॉरी. आय डिंट रिअलाईज यू वर न्यू टू दिस प्लेस.." तो काळजीत पडून म्हणाला. "प्लीज रिमूव्ह युअर शूज, लेट मी चेक" तिने जपून सॉक्स आणि शूज काढल्यावर दोन्ही पायांना शूज घासून मोठे मोठे शू बाईट झालेले दिसत होते.

"आंss इट्स रिअली पेनिंग.." आता ती जवळजवळ रडणारच होती.

"आय थिंक वी शूड गो होम, कॅन यू कॅरी द शूज इन योर हँड?"

"व्हाय? आय कान्ट वॉक लाईक दिस बेअरफीट. इट्स अ मिनिमम फिफ्टीन मिनिट वॉक" ती शूज हातात धरूनच जरा रागात म्हणाली.

"हू टोल्ड यू टू वॉक?" म्हणत त्याने दोन्ही हातांनी तिला सहज उचलले आणि चालायला सुरुवात केली. "अँड.. यू डोन्ट हॅव एनी अदर ऑप्शन" ती ओरडायच्या आत तो तिला म्हणाला.

वर फॅक्टरीपाशी पोहोचेपर्यंत इतक्या थंड हवेतही तिच्या कानातून गरम वाफा येत होत्या आणि गाल तापून लालेलाल झाले होते. इतका वेळ त्याला इतकं बिलगून, त्याचा मस्की गंध झेपवून तिचे हातपाय नंब आणि डोकं पुन्हा गुलाबी धुक्यात गेलं होतं. शेवटी शेवटी तर तिला ती डबल बॉयलरमधलं चॉकलेट असल्यासारखं वाटत होतं. शेवटी एकदाचे ते चढातून वर फॅक्टरीपाशी पोहोचले आणि त्याने तिला बेंचवर बसवले.

"सो, विल यू कम होम? यू कॅन कॉल युअर होटेल टू इंफॉर्म दॅट यू आर नॉट कमिंग टिल टुमॉरो. ऑल्सो टेल दॅट टू युअर ड्रायव्हर." त्याने तिच्या डोळ्यात पहात विचारले."

"रिअली? शूड आय?" तिने भुवया उंचावत विचारले.

"ओन्ली इफ यू वॉन्ट! कोई जबरदस्ती नही है.." तो जरा आपल्याच कोशात जात होता.

"हेय, रुसू नको. करते कॉल" म्हणून तिने पटापट दोन्ही कॉल करून टाकले.

पार्किंगमध्ये त्याची पांढरी टाटा सिएरा उभी होती. "ओह वॉव, सिएरा! अजूनही किती वेल मेन्टेण्ड आहे" ती दार उघडून आत बसताना म्हणाली.

"यप, नानूकी है. 2000 टर्बो मॉडेल. मैने पहली कार यही चलाई थी. उनकी याद मे रखी है, और अभीभी अच्छी चल रही है!"

त्याने गाडी सुरू करून पंखाबाडी रोडच्या दिशेने घेतली. काचेच्या मोठमोठ्या खिडक्यांमधून मागे पळणारी झाडं, दरीकडेने वळणं घेत खाली उतरणारा रस्ता परतीच्या नितळ उन्हात चमकत होता. समोर कांचनजंगाच्या वर दिसणारा सुर्याचा लालबुंद गोळा हळूहळू खाली दरीमध्ये उतरत होता. काही वेळातच तो नाहीसा होत क्षितिजावर लाल, नारिंगी, जांभळ्या रंगांचे फराटे ओढून गेला. कणाकणाने झाडांच्या शेंड्यावरून खाली झुकणारा काळोख हळूच सगळ्या आसमंताला मिठीत घेत होता. अचानक समोर अस्पष्ट दिसणारा गोल गरगरीत चंद्र खडूने गिरवल्यासारखा ठळक होऊन आजूबाजूचे टिपूर चांदणे ब्रशने पांढरा रंग स्प्रे केल्यासारखे काळ्या-निळ्या मोकळ्या आकाशात उंच झाडांच्या स्कायलाईनवर उठून दिसायला लागले.

रस्ताभर दोघेही शांत होते. काहीही बोलून त्यांना त्या रेशमी क्षणावर ओरखडा उठवायचा नव्हता. दोघांच्याही आत कुठेतरी हुरहुरीचा एक पूल दोघांना सांधत होता. ऐकण्या-बोलण्याची सोडून पलीकडची एक भाषा डोळ्यांतून व्यक्त होत होती आणि डोळे ती पिऊन टाकत होते.

रात्र सुरू होता होता डावीकडच्या अरूंद रस्त्यावर त्याने गाडी वळवली आणि समोरचे ऊंच गेट उघडायला त्याने काच खाली करून जोरात हाक मारली, "बाबूराम काकाss"

म्हाताऱ्या बाबूरामने हळूहळू काठी टेकत येऊन गेट उघडल्यावर त्याने गाडी आत नेऊन गॅरेजमध्ये पार्क केली. ती उतरून समोर पहातच राहिली.. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात चमकत समोर एक पांढरीशुभ्र दुमजली व्हिक्टोरियन हवेली उभी होती.

"द बॅनर्जी व्हिला!" तो तिच्या खांद्यावर हात ठेऊन शेजारी उभा रहात म्हणाला.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - २०

समोर मोठं अंगण, कंपाउंड वॉलला चिकटून चंद्रप्रकाशात चमकणारी पेअर आणि संत्र्याची डेरेदार झाडी, जिथे जागा मिळेल तिथे डोकी उंचावून पाहणारे पाईन्स. समोर उजवीकडे चार दगडी पायऱ्या चढून गेल्यावर नक्षीदार वूडवर्क केलेल्या गजांची अर्धी भिंत असलेला ओपन पोर्च, तिथे मांडलेलं अतिनक्षीदार गोल शिसवी टी टेबल आणि तश्याच दोन खुर्च्या. सगळीकडचं लाकूड आता जरा खराब झालं होतं. बाहेरच्या पांढऱ्या रंगाचेही थोडे पोपडे सुटलेले दिसत होते.

डावीकडे अर्ध्या भागात गोल उंच टॉवर, पोर्चच्यावर जरासे ढासळलेले त्रिकोणी छपराचे छोटेसे टरट, करकरीत उतारांची छपरं त्यातले काचेचे डॉर्मर्स, लाकडी फ्रेम्समध्ये बसवलेल्या काचेच्या मोठाल्या बे विंडोज, पोर्चमधल्या खिडक्यांना आता रंग जरा फिकुटलेली फ्लोरल स्टेन ग्लास आणि डोक्यावर सगळीकडे चमचम चांदण्याने गच्च भरलेले आभाळ!

"बाबूराम काका, आप जाके सो जाइये. खाना हम ले लेंगे " इंद्रनीलने बाबूरामच्या पाठीवर थोपटत सांगितले.

"हां दादा" म्हणून तो हळूहळू सर्वंट क्वार्टर्सकडे निघून गेला.

"घराचा सगळा मेंटेनन्स बाबूराम काका बघतात. त्यांची बाकी फॅमिली कोलकातामध्ये असते. टू गर्ल्स फ्रॉम टी इस्टेट आर कमिंग फॉर कूकिंग अँड क्लीनिंग". तो फ्लोटर्स कडेला सरकवून आत जाताजाता म्हणाला.

तिने दारातून आत आल्यावर आधी शूज आणि सॉक्स काढून शू रॅकमध्ये ठेवले.

"मेक युरसेल्फ कम्फर्टेबल, आय'ल जस्ट कम" म्हणत तो पटकन किचनमध्ये गेला.

उंच सीलिंग आणि लाकडी फ्लोअरिंग असलेल्या हॉलमध्ये फक्त मऊ कुशन्स असलेला एक मोठा लाकडी सोफा सेट आणि सेंटर टेबल होते. भिंतीवर एक पोस्टर साईझ फॅमिली फोटो होता. तो बघायची तिला उत्सुकता होती पण दुखरा पाय घेऊन उठण्यापेक्षा ती तशीच बसून राहिली.

तो आतून बर्फाचे क्यूब्ज गुंडाळलेला किचन टॉवेल आणि दुसऱ्या हातात एक लहानसं मेडिकल किट घेऊन आला. सरळ खाली मांडी घालून बसून त्याने तिची पावलं हळुवारपणे हातात घेऊन जखमा बघितल्या.

"ओह.. लुक्स पेनफुल.. इट विल हर्ट." म्हणत त्याने ओल्या कापसाच्या बोळ्यावर थोडंसं डेटॉल ओतून पटकन जखमेवर दाबून धरले.

वाकून पायाकडे बघताना तिने स्सss म्हणत कसाबसा ओठ चावत ती कळ सहन केली.

जखमेच्या आजूबाजूला हलक्या हाताने पुसून, त्याच्यावर थोडं ऑइन्टमेंट लावल्यावर त्याने तिच्याकडे शेकायला बर्फ दिला. त्या थंडाव्याने  दुखणं जरा कमी होऊन तिच्या जीवात जीव आला.

तो वाकून फायरप्लेसमध्ये लाकडाचे बारीक तुकडे ठेऊन मॅचबॉक्स मधल्या काड्या ओढत होता. तीनचार काड्या फुकट गेल्यावर शेवटी एकदाचा त्या लाकडाने पेट घेतला.

"गुड टू गो! कॅन वी टॉक नाउ?" तो तिच्या शेजारी येऊन बसत म्हणाला.

"नील.." त्याच्याकडे बघता बघता तिचे डोळे हळूहळू भरून यायला लागले..

"प्लीज टॉक टू मी मनवा.. प्लीज." तो तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.

"व्हाय डिंट यू वेट फॉर मी? व्हाय डिड यू जस्ट लीव्ह?" तिने कळवळून विचारले.

"व्हॉट वॉज देअर टू वेट फॉर? यू रिजेक्टेड मी, यू डिंट इव्हन वॉन्ट टू टॉक अबाऊट द रिझन.. सो आय जस्ट वेंट इंटू माय शेल, इट्स माय कोपिंग मेकॅनिझम." तो आता चिडून बोलत होता. यू नो, मेरा एक फंडा है, हमे अच्छी लगनेवाली हर चीज हम खोते रहते है. अपोर्च्युनिटी, फिलिंग्स, पॉसीबलिटीज, पीपल सब कुछ. इट्स ऑल पार्ट ऑफ लिव्हिंग." तो तिच्याकडे न बघता बोलत होता.

"आय हॅव हॅड इनफ शेअर ऑफ रिजेक्शन ऑल माय लाईफ! माय मदर इज डेड, माय फादर रिजेक्टेड मी, आय रिफ्यूस्ड टू इव्हन मीट माय स्टेपमॉम अँड दे नेव्हर कॉल्ड मी बॅक. आय हॅव बीन टू माय पर्सनल हेल अँड बॅक. सो आय ऑलवेज चूज टू जस्ट क्लोज मायसेल्फ डाऊन" तो समोर फायरप्लेसमध्ये ढणाणा पेटणाऱ्या आगीत बघत म्हणाला.

"नील, प्लीज डोन्ट से दिस. यू वर गोइंग सो फास्ट अँड आय हॅड माय शेअर ऑफ वरीज.. आय हॅव टोल्ड यू अबाउट द अब्युज अँड द डिप्रेशन, आय नीडेड सम टाइम टू हील. यू नो ड्यु टू युअर सिमीलर हाईट, इट ऑल केम बॅक रशिंग टू मी अँड आय जस्ट कुडन्ट थिंक स्ट्रेट! आय थॉट यू वर टेकिंग कंट्रोल ऑफ माय लाईफ. यू वर मेकिंग मी बाव डाऊन. सो आय जस्ट वॉन्टेड टू कीप अवे. आय न्यू, अगर तुम्हारे इतने पास आ गई तो बाहर निकलना मुश्किल होगा." ती आवंढा गिळत म्हणाली.

तिच्या भरलेल्या डोळ्यांत आणि थरथरणाऱ्या ओठांकडे बघून त्याच्या डोळ्यातील वादळ थांबत हळूहळू शांत झाले. "आय कॅन नेव्हर डू दॅट टू यू मनवा.. अँड आय'ल नेव्हर हर्ट यू.. आय वॉन्टेड समवन हू कॅन लुक इंटू माय सोल अँड एव्हरीटाईम आय थॉट अबाउट इट, आय सॉ योर फेस.. आय जस्ट डिंट वॉन्ट टू लूज यू. सब छोडकर यहां आया था, बट आय जस्ट कुडन्ट फर्गेट यू.. युअर फेस, युअर आईज, युअर स्माईल.. द वे यू से बं..र! एव्हरीथींग" हसून म्हणत त्याने तिला एका हाताने जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकले.

"आय नो! किसीने फ्रिजपर मेरी फोटोभी लगायी है! ती भुवया उंचावत म्हणाली.

"शक्स! हाउ डिड यू नो?" तो आ वासत म्हणाला.

"आय हॅव माय ओन सोर्सेस!" ती डोळा मारून म्हणाली. "नाउ आय नो नील..  व्हॉट यू मीन टू मी.  अँड आय थिंक आय लव्ह यू टू.. विथ ऑल माय हार्ट.. मेरा फंडा अब चेंज हो गया है, मैने कही पढा था. पता है क्या? यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन पीपल ओपन देअर हार्टस्? दे गेट बेटर." ती जवळ सरकून त्याच्या अंगावर हात टाकून, छातीवर डोकं ठेवत म्हणाली. तेव्हा तिला पहिल्यांदाच स्वतःबद्दल विश्वास वाटायला लागला होता. त्याच्यामुळे ती हळूच स्वत:वरही प्रेम करायला लागली होती.

त्याने पुढे वाकून हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेली एक कुरळी बट कानामागे लपवली. तिच्या कानातला गुलाबी खडा चमकला. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिला थरथरायला झालं. शांततेत तिला त्याच्या छातीतून धडधडणारा प्रत्येक ठोका ऐकू येत होता. "डझ दॅट मीन्स अ येस.." त्याने तिच्या गालावरून एक बोट फिरवत कुजबुजत विचारले. "येस" ती पापण्या झुकवत म्हणाली.

त्याच्या श्वासात श्वास मिसळत असताना तिला वाट पाहणे कठीण होत होते. तिने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला ओढून पटकन त्याच्या ओठांवर ओठ टेकले. त्याला अचानक बाहेरच्या चांदण्याचा वर्षाव त्याच्या ओठांवर झाल्यासारखे वाटले. त्याने डोळे विस्फारून आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि अजिबात न थांबता तिला प्रतिसाद देऊ लागला.

ते एकमेकांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक हार्टबीट शेअर करत होते. तिच्यासाठी सगळं जग नाहीसं होऊन फक्त एकमेकांच्या मिठीत ते दोघेच उरले होते. "आय विश दिस नेव्हर एण्ड्स.." तो स्वप्नाळू डोळ्यांनी तिच्याकडे पहात म्हणाला. "मी टू.." त्याच्या मानेत चेहरा लपवत ती म्हणाली.

खिडकीच्या काचेतून बाहेर झाडांच्या सळसळणाऱ्या पानांमधून र्पौर्णिमेचा चंद्र चमकत होता आणि कुठेतरी वाजणाऱ्या गाण्याचे सूर आसमंतात पसरत होते..

कभी यूँ भी तो हो

दरिया का साहिल हो

पूरे चाँद की रात हो

और तुम आओ...

:dhakdhak:

Keywords: 

लेख: