नोबेल विजेत्या कार्याची तोंडओळख.

तसं आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ऐकून माहिती असतंच की, नोबेल पारितोषिक हा संपूर्ण जगातील अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्युत्तम कामगिरी, अथवा संशोधन केल्याबद्दल ही पारितोषिके दिली जातात. 'आल्फ्रेड नोबेल' या स्वीडीश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्यूपत्रात या पारितोषिकांची तरतूद करून ठेवली आहे, वगैरे... वगैरे...

दरवर्षी जेव्हा नोबेल पारितोषिक जाहीर होतात, तेव्हा आपल्याकडे २-३ दिवस वृत्तपत्रांमधून/सोशल मिडीयामधून याविषयी बातम्या, क्वचित कधी मोठे लेख/चर्चाही येतात. वेळ असेल तर आपण कोणा-कोणाला नक्की कशासाठी नोबेल मिळालंय, हेही चाळतो. पण इतर सगळ्या 'ताज्या बातम्यां'च्या गर्दीत लगेच ती बातमी शिळी होते. आणि खरं तर, बर्‍यापैकी महत्वाच्या या बातमीकडे सालाबादप्रमाणे आपल्यापैकी बहुतांश लोक दुर्लक्षच करतो. तेव्हा, याविषयी काय करता येईल, या विचारातून आपल्या या नव्या उपक्रमाची कल्पना पुढे आली.

nobel_2016
चित्र सौजन्य : http://www.nobelprize.org

पुढच्या आठवड्यात स्टॉकहोम, स्वीडन येथे २०१६ च्या नोबेल पारितोषिकांचा वितरण सोहळा आहे. यावर्षीचा ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर हा आठवडा 'नोबेल वीक' म्हणून साजरा होणार आहे. तर, या निमित्ताने मैत्रीण टीम यावर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांविषयी माहिती संकलीत करून संक्षिप्त स्वरूपात आपल्या मैत्रिणींसमोर आणते आहे.

तर, सुरूवात करुया?

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle