मी शिवलेली नऊवारी

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण मोठा झाल्यावर काय होणार? म्हणजे जे ठरवलेलं असतं ते पूर्ण होतच किंवा मोठे होईपर्यंत ते मत ठाम राहतच असं नाही. आमच्या घरात आई शिवणकाम करायची आणि बाबा उत्तम टेलर होते. वेळ मिळेल तेव्हा आईला मदत करायचे. त्यांची एक शिलाई सुद्धा इकडची तिकडे होतं नसे. तर लहानपणापासूनच मी हे बघत आले. आणि बघता बघता शिकत आले. दहावी नंतर फॅशन डिझाईनिंग चा अभ्यास करावा असं वाटत होतं पण काही कारणांनी शक्य नाही झालं. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉमर्स मध्ये गेलो. पदवी नंतर एक वर्ष नोकरी करून शॉर्ट टर्म फॅशन डिझाईनिंग चा कोर्स केला. हा कोर्स करत असताना आमच्या अकादमी चा दादर ला दिवाळी बाजारात स्टॉल लावणार होते म्हणून मी आणि आई ने नऊवार साडी शिवून लावू असं ठरवलं. तेव्हा आम्ही एका लहान मुलीला साडी नेसवून पिना लावून ती तशीच काढून घेतली आणि शिवून तय्यार केली. केशरी रंगाची हिरव्या काठाची ती साडी खूपच सुंदर झाली होती.
लग्न नंतर विरार ला असताना शेजारच्या वहिनींनी तयार नऊवार साडी घेतली होती ती बघून मी सॅम्पल साठी एक साडी शिवली आणि ती बघून सोसायटी मधल्या ७-८ साडया शिवून दिल्या. लहान मुलींचे फ्रॉक शिवले. मग ठाण्यात शिफ्ट झालो, नोकरी मिळाली आणि पुन्हा शिवण काम बाजूला राहिलं.
या वर्षी सोसायटी मध्ये भोंडल्याची तय्यारी सुरु आहे. सगळ्या जणी नऊवारीत येणार तर मुली कशा मागे राहतील, म्हणून कडवे वहिनींनी आपल्या लेकीसाठी वेळ काढून साडी शिवून देशील का विचारलं आणि मला पण शिवायचा मोह आवरता आला नाही. रविवारी सगळी काम आटोपून साडी शिवायला बसले आणि तय्यार केली एकदाची साडी.
बघा कशी झालेय मी शिवलेली सॅम्पल साडी आणि भोंडल्या साठी शिवलेली आयुषीची साडी.(दोन्ही साड्या सहावारी साडी च्या शिवल्यात, आयुषी ची घोळदार झालीय आणि माझी डेरेदार

/* */ //