त्यानंतरचे दिवस - २

" ठीक है| मैं जाता हूं| जो बताना था वो बोल दिया| जवाबकी उम्मीद है लेकीन जल्दी नही| तुम्हे बहोत अनएक्स्पेक्टेड होगा ना| कल शामको मिलते है|"
असं म्हणून लिफ्टकडं न जाता पायर्‍या उतरायला गेला.
मी काही काळ फ्रोझन आणि मग दार उघडायला लागले तेवढ्यात लिफ्टमधून मावशी आल्या हसत हसत. माझा पारा जरा चढलेला होता.

" मावशी बास की आता."
" कोन होतं गं रसिका ते पोरगं?"
" मावशी माझं नाव रसिका नाहिय किनै? नीट हाक मारत जा बरं मला "
"अगं रसा हे काय नाव असतंय होय एवढंसं? आन रसातै म्हटलं तर तुला आवडेना. "
मी गुमान चहा करायला लागले.
" आज काय तरी है ना रसिका? त्ये काय म्हण्तेत? "
" काय ?"
" त्येच की सांगायचं. मुझे तुमसे प्यार ता, आजबी हय और कलबी रहेगा |" आणि जोराजोरात हसायला लागल्या. कुठ्ठं न्याय्ची सोय नई यांना.

" काल होतं ते मावशी. रसा, मी पण पिणारे चहा. " बाहेरून शिबानीचा आवाज आला.
" मक्काय मावशी, कुणी इजहार केला प्रेमाचा तुम्हाला? काय फुलं, गिफ्ट, चॉक्लेट, टेडी मिळालं का नै?" शिबानी किचनमधे येऊन मावशींच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहिली होती.
" ट्येडी? मन्जी त्ये मौमौ आस्वल? त्ये कशाला देतेत? माज्या भैनीच्या नातीला बड्डेला माज्या पोरींनी त्येच दिलं. ह्येच आवडतंय मने ल्हान पोरांना"
" लहान पोरांना का मोठ्या सुंदर पोरींना पण आवडतं " शिबानीचा फालतूपणा चालू झाला. मला पण हसू येत होतं.
तेवढ्यात मावशी " आप्ल्या रसाला निस्ती गाडीभर फुलं मिळाली की. रसा, ट्येडी नै दिला बै त्या फुलंवाल्यानी आन चाकलेट बी नै."
" आं?आं? वॉट वॉट? कस्ली फुलं? कोण गाडीवाला?"
" आगं मी येत हुते ना सकाळी हिकडं कामाला, तर बर्का रसिकाच्या लाल शिंव लावलेल्या याक्टिवाला .."
झालं, मावशी तैना रसभरित वर्णन सांगायला बसल्या.

मी ऑफिसात पोचल्यावर विचार करत होते. हा अंकित, माझ्या डान्स क्लासमधे होता. अंकित अतिशय मस्त डान्स करणारा, क्लासचा स्टार स्टुडंट , गेली ६ वर्षं डान्स करत होता आणि अनेक डान्स फॉर्म्स यायचे त्याला. आणि नाचताना पण इतका लवचिक असून मस्क्युलिन दिसायचा एकदम. आमची इन्स्ट्रक्टर बर्‍याचदा स्टेप्स दाखवायला त्याला बरोबर घ्यायची. आणि सगळ्या पोरी फक्त त्याच्याकडं बघत असायच्या.
मी आत्ताच सुरू केलेला क्लास. दोन महिने झाले होते. माझ्याबरोबर ऑफिसातले माझ्या गृपमधले ऑलमोस्ट सगळे होते. आमचा सात जणांचा ग्रूप. त्यामुळं फार बाकी ओळखी नव्हत्या. फक्त कधीकधी पार्ट्नर वाल्या स्टेप्सना तो माझ्या बरोबर आला होता.
तर त्याचं अंकित हे नाव आणि त्याचा नाच एवढीच मला त्याच्याबद्दल माहिती. खरं तर फिलींग गुड सोडलं तर यापुढं माझा विचारच थांबलेला. कारण काही माहितीच नव्हती. फक्त एक आय कँडी मुलगा आपल्यात इंटरेस्टेड आहे इतकंच.

खरं तर तो माझ्यापेक्षा थोडा लहानच असेल. आणि हिंदीच्या अ‍ॅक्सेंटवरून नॉर्थमधला वाटतो. तेही मोठ्या शहरातला नाही. दिल्ली वगैरे तर नाहीच. ती नोट आणि नंतरचं बोलणं यावरून थोडा फिल्मी आणि थोडा सेंटि पण. आणि काय बरं? हां. इथल्याच एका पण नॉन-आयटी कंपनीत आहे बहुतेक. बहुतेक मेकॅनिकल. एकदा येताजाता ऐकलेलं.
काम चालू होतं. अधूनमधून ते आठवत होतं तरी ते सगळं बालिश वाटत होतं मला. आणि त्या पुढं काही घडलंही नव्हतं. विचार करून उत्तर वगैरे द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण प्रश्न काय हेच माहिती नव्हतं. त्याची अपेक्षा एक्स्प्रेस करणे एवढीच दिसत होती. आणि तसंही काय कोण कुठला मुलगा? अजून चार पोरींना हेच विचारलं असेल तर? कदाचित वी-डे फ्लॉप झाला असेल म्हणून आज हा उद्योग. कायतरी करून वि-डे ला काहितरी हॅपनिंग घडलं पाहिजे टाईप. जाऊ दे. मी हे सोडून द्यायचं ठरवलं.
तरी अधूनमधून आठवत होतं. आणी मोर दॅन एनिथिंग, "चिठ्ठी छोडो, खुद पलटो" हे आणि तेंव्हा तो किती जवळ उभा होता हे.

संध्याकाळी ऑफ कोर्स , शिबानीला सांगितलं नीट.
शिबानी अर्थात " धिस इज नॉट वॉट यु वाँट ना ? मेनि डेट्स , मिनिंगफुल कन्वर्सेशन्स, स्लोली अंडरस्टंडिंग इच आदर, मॅच्युअर चॉइसेस. हे सगळं संगितलं होतंस तू मला. "
" हो यार. आय नो. हा किडिश, इमोशनल आणि फ्रिवोलस वाटतोच आहे. हा काय फालतूपणा आहे. "
" खूप विचार नको करू. लीव इट. म्हणजे मला चिडवायला जागा ठेव तशी"

दुसर्‍या दिवशी क्लासला काही फार घडलं नाही. फक्त एका स्टेपला तो माझा पार्टनर होता तेंव्हा त्यानं मला " क्लासनंतर कॉफी प्यायला येतेस? थोडाच वेळ जाऊ या. मी तुला इथंच सोडतो परत. " हे विचारलं. मी नको म्हणाले.
मग पुढच्या प्रत्येक क्लासला तो एकदा माझ्यासमोर यायचा आणि हेच विचारायचा.

एक दिवस मी म्हटलं , ठिके, जाउन तर बघू या.

तो एकदम प्लेझंटली सरप्राईज्ड. मी अ‍ॅन्क्झायटीमधे भरपूर स्टेप्स चुकवल्या. त्याने एक्साईटमेंटमधे जास्त चांगला नाच केला.
मग क्लास झाल्यावर मी आमच्या गृपला बाय केलं आणि वर काहीतरी राहिलंय ते घेऊन येते आणि जाते असं सांगून वर आले आणि थोड्या वेळाने परत खाली पार्किंगमधे गेले. सगळी जनता गेली होती. आणि तो माझी वाट बघत त्याच्या कातिल रॉयल ब्लु कलरच्या बजाज पल्सरवर थांबलेला.

ड्रायवर पहिल्या मजल्यावर आणि मागची सीट दुसर्‍या मजल्यावर. मला विक्रम वेताळाचा जोक आठवला. पण एनिहाऊ, मी त्याच्यापाशी गेले. आता या पिलियन सीटवर बर्‍यापैकी ग्रेसफुली दिसत चढाई कशी करावी या विचारात असताना तो म्हणाला, "एक मिनिट, ये साईडसे आओ| " मी पाथवेवर गेले. त्यानं बाईक हलकी टिल्ट केली. दॅट वॉज मच इझीयर दॅन आय थॉट. मी त्याला न चिकटता बसायचा एक प्लॅन तिथल्या तिथं चॉक आऊट केला. आणि बाईक सुरू झाली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle