सृजनाच्या वाटा: मे २०१८ - कुटं कुटं जायाचं..?

महाराष्ट्र दिनाच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा!

आणि पालक-आयांना, काय मग लागला का निकाल? :winking:
आता शाळेचे रिझल्ट लागले म्हणजे खऱ्या अर्थाने धमाल, टेन्शन-फ्री सुट्टीला सुरुवात आहे. पण ही सुट्टी आणि आंबे सोडता मे महिना तसा फारच त्रासदायक ब्वा! घाम, चिकचिकाट, पाण्याचे प्रश्न... आणि हे प्रमाण शहरी भागात जरा जास्तच असतं. ह्या सगळ्यातून जरा छान सावलीत बसून गार वारा अनुभवायला एखादा वीकेंड कुठेतरी जायलाच हवं.

तुम्ही हुशार आहात त्यामुळे ह्यावेळच्या सृ.वाचे नाव, कुठेतरी जाण्याचा प्लॅन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा यांची सांगड तुम्ही एव्हाना घातली असणारच! शाब्बास :ड ह्यावेळच्या सृजनाच्या वाटा आपल्याला महाराष्ट्रातल्या कमी-अधिक तुडविल्या गेलेल्या पायवाटांवर घेऊन जाणारेत. महाराष्ट्र इतकं मोठं राज्य आहे, प्रत्येक जिल्ह्याची काही वेगळी ओळख आहे. पण भटकंतीबाबतीत कोकण समुद्रकिनारे आणि घाटावरचे गड किल्ले, थंड हवेची ठिकाणं सोडता फार कमी जागा माहीत असतात. महाराष्ट्रातल्या ह्या ऑफ-बिट जागांची ओळख, किंवा नेहमीच्या जागांची ऑफ-बिट ओळख करून घेण्यासाठी ह्या महिन्यात "मैत्रीण" तुम्हा सर्वांना विशेष आवाहन करत आहे.

तुम्हांला अश्या काही सुंदर, निवांत (किंवा ऍडव्हेंचरस), कुटुंबा वा मित्र-मैत्रिणींसोबत (किंवा एकटीने) फिरायला जाता येणाऱ्या, जास्त महाग नसलेल्या (किंवा "होऊ द्या खर्च" पण चालेल) जागा माहीत आहेत का? तुम्ही एक आदर्श मैत्रीण बनून त्या जागेची माहिती, फोटो, प्रवासवर्णन, ट्रिपची तयारी ह्या गोष्टी बाकी मैत्रिणींशी शेअर कराल का? म्हणजे कराच!! त्यापुढे जाऊन मैत्रीण-मैफिल/सहल ठरवलीत तरी चालेल Love

ह्या जागांविषयी लिहिताना सृजनाच्या वाटा विभागात नवीन लेख लिहा. उन्हाळ्यात जाण्यासारखी जागा नसेल तरीही त्या जागेबद्दल लिहू शकता. पावसाळा-हिवाळ्यासाठी आत्तापासून प्लॅनिंग करता येईल. चला तर मग मिलिंद गुणाजी मोड ऑन करून महाराष्ट्रातल्या भटकंतीला सुरुवात करूया.


लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा..

सनस्क्रीन घ्यायला विसरू नका!
Dirt Bike

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle